सुहास पाटील

इंडियन आर्मीमध्ये अविवाहीत पुरुष/ महिला उमेदवारांकरिता एप्रिल, २०२४ पासून ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी ( OTA), चेन्नई येथे सुरू होणाऱ्या SSC (Tech ) ट्रेनिंग कोर्ससाठी प्रवेश. एकूण १९४ पदे.
(एसएससी (टेक) पुरुष – ६२ वा कोर्स – १७५ पदे, एसएससी (टेक) महिला – ३३ वा कोर्स – १९ पदे, संरक्षण दलातील सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा – २ पदे) रिक्त पदांचा तपशील इंजीनिअरींग स्ट्रीमनुसार पुढीलप्रमाणे –
(१) सिव्हील इंजीनिअरींग/ बिल्डींग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी/आर्किटेक्चर – पुरुष – ४७ पदे, महिला – ४ पदे.
(२) कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनिअरींग/ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/ M. Sc.कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी – पुरुष – ४२ पदे, महिला – ६ पदे.
(३) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन/इन्स्ट्रमेंटेशन – पुरुष – १७ पदे, महिला – २ पदे.
(४) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन/ फायबर ऑप्टिक्स/ टेली कम्युनिकेशन/ मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड मायक्रोवेव्ह/ ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स/ सॅटेलाईट कम्युनिकेशन – पुरुष – २६ पदे, महिला – ३ पदे.
(५) मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल/ इंडस्ट्रियल/ इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चिरग/ इंडस्ट्रियल इंजिनिअरींग अॅण्ड मॅनेजमेंट/ वर्कशॉप टेक्नॉलॉजी/ एअरोनॉटिकल/एअरोस्पेस/ एव्हिऑनिक्स – पुरुष – ३४ पदे, महिला – ४ पदे.
(६) Misc.इंजीनिअरींग – प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी/ रिमोट सेिन्सग/ बॅलिस्टिक्स/ फूड टेक्नॉलॉजी/ अॅग्रिकल्चर/ मेटॅलर्जिकल/ बायोटेक/ टेक्स्टाईल इंजीनिअरींग इ. – पुरुष – ९ पदे.

ESIC Recruitment 2025
ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Job Opportunity Recruitment at State Bank
नोकरीची संधी: स्टेट बँकेत भरती
RRB Ministerial and Isolated Categories Recruitment 2025
Indian Railway Recruitment 2025: RRBमध्ये १०३६ पदांसाठी होणार भरती! लवकर करा अर्ज, जाणून घ्या शेवटची तारीख
Image of a woman trainer in a gym or swimming pool
Women Trainers In Gym : जिम, जलतरण तलावांमध्ये महिला प्रशिक्षक बंधनकारक, प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
Railway Opens 4,232 Apprentice Vacancies For 10th Pass Students, No Written Exam Required
रेल्वेमध्ये १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
Sunayana won gold medal in womens bodybuilding competition
खेडेगावातून थेट जागतिक भरारी, महिला काँस्टेबलची वृत्ती करारी
BEL Recruitment 2025 Opportunity to get job without examination on apprenticeship posts in Bharat Electronics Limited, interview will be held on these dates
Walk-In-Interview : BELमध्ये अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, मुलाखतीला हजर राहा अन् नोकरी मिळवा, जाणून घ्या कोण करू शकते अर्ज?

पात्रता : SSC ( Tech) मेन/ वुमन पदांसाठी – संबंधित विषयातील इंजीनिअरींग किंवा समतूल्य पदवी उत्तीर्ण.
(अंतिम वर्षांत शिकणारे उमेदवार जे अंतिम परीक्षा १ एप्रिल, २०२४ पर्यंत उत्तीर्ण करू शकतील, अर्ज करण्यास पात्र आहेत.)
संरक्षण दलातील सेवेत असताना कामी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवांसाठी – ( i) SSC ( W) ( Non Tech) ( Non UPSC)- १ पद. पात्रता – पदवी (कोणतीही शाखा), ( ii) SSC ( W) ( Tech)- १ पद. पात्रता – बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा).
वयोमर्यादा : (दि. १ एप्रिल २०२४ रोजी) २०-२७ वर्षे (उमेदवाराचा जन्म दि. २ एप्रिल १९९७ ते १ एप्रिल २००४ दरम्यानचा असावा.) संरक्षण दलातील सेवेत कामी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा – ३५ वर्षेपर्यंत.

निवड पद्धती : पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांपर्यंतच्या गुणवत्तेनुसार किंवा अंतिम वर्षांत शिकणाऱ्या उमेदवारांच्या ६ व्या सेमिस्टपर्यंतच्या गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर, वाटप केलेल्या सिलेक्शन सेंटरचे नाव कळविले जाईल. त्यानंतर उमेदवारांनी वेबसाईटवर लॉगइन करून एसएसबीची तारीख निश्चित करावी. (फस्र्ट कम फस्र्ट बेसिस) अलाहाबाद, भोपाळ, बंगलोर, कापूरथळा या सिलेक्शन सेंटरवर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची सायकॉलॉजिस्ट, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर आणि इंटरह्यूइंग ऑफिसर यांचेकडून एसएसबी इंटरव्ह्यू घेतला जाईल.
ट्रेनिंग : निवडलेल्या उमेदवारांना शॉर्ट सव्र्हिस कमिशन ‘लेफ्टनंट’ पदावर नेमले जाईल व त्यांना प्रोबेशनवर ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी, चेन्नई येथे ४९ आठवडय़ांचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यास उमेदवारांना मद्रास युनिव्हर्सिटीकडून ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अॅण्ड स्टट्रेजिक स्टडिज’ दिला जाईल. लेफ्टनंट पदावर २ वर्ष सेवा पूर्ण केल्यावर कॅप्टन पदावर बढती दिली जाईल. ६ वर्ष पूर्ण केल्यावर ‘मेजर’ पदावर बढती मिळेल. १३ वर्षे पूर्ण केल्यावर लेफ्नंट कर्नल पदावर बढती मिळेल. ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना रु. ५६,१००/- स्टायपेंड दिले जाईल. लागू असलेले इतर भत्ते ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर दिले जातील. ट्रेनिंगनंतर मिळणारे वेतन अंदाजे १ लाख रुपये असेल. १० वर्षांच्या सव्र्हिसनंतर ज्या उमेदवारांना पर्मनंट कमिशन मिळवायचे असेल त्यांना पात्र असल्यास पर्मनंट कमिशनसाठी विचार केला जाईल. ज्यांना पर्मनंट कमिशन मिळणार नाही असे उमेदवार सव्र्हिस कालावधी वाढून मिळण्यासाठी मागणी करू शकतात. शंकासमाधानासाठी www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या Feedback/ Query या ऑप्शनवर संपर्क साधावा. ऑनलाइन अर्ज www. joinindianarmy. nic. In या संकेतस्थळावर दि. १९ जुलै २०२३ (१५.०० वाजे)पर्यंत करावेत.

Story img Loader