सुहास पाटील
दि इंडिया गव्हर्न्मेंट मिंट (IGM), मुंबई (सिक्युरिटी पिंट्रींग अॅण्ड मिंटींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) अंतर्गत एक युनिट) पुढील एकूण ६५ पदांची भरती.
(१) ज्युनियर टेक्निशियन (फिटर) – २४ पदे (अजा – ५, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – ११) (२ पदे प्रत्येकी दिव्यांग (D/ HH U DL/ DW)आणि माजी सैनिकांसाठी राखीव).
(२) टेक्निशियन (टर्नर) – ४ पदे (अज – १, खुला – ३).
(३) टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट) – ११ पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ७) (१ पद माजी सैनिकांसाठी राखीव).
(४) ज्यु. टेक्निशियन (मोल्डर) – ३ पदे (खुला).
(५) ज्यु. टेक्निशियन (हीट ट्रिटमेंट) – २ पदे (खुला).
(६) ज्यु. टेक्निशियन (फौंड्रीमॅन/ फरनेसमॅन) – १० पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५) (१ पद माजी सैनिकांसाठी राखीव).
(७) ज्यु. टेक्निशियन (ब्लॅकस्मिथ) – १ पद (खुला).
(८) ज्यु. टेक्निशियन (वेल्डर) – १ पद (खुला).
(९) ज्यु. टेक्निशियन (कारपेंटर) – १ पद (खुला).
पद क्र. १ ते ९ साठी ( i) पात्रता – (दि. १५ जुलै २०२३ रोजी) संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट.
( ii) वेतन श्रेणी – रु. १८,७८० – ६७,३९० इंडस्ट्रियल डिअरनेस अलाऊन्स ( कऊअ) पॅटर्न आणि इतर भत्ते.
( iii) वयोमर्यादा – दि. १५ जुलै २०२३ रोजी २५ वर्षे.
(१०) ज्यु. ऑफिस असिस्टंट ( B-t Level)- ६ पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, खुला – २).
(११) ज्यु. ब्युलियन असिस्टंट ( B-t Level)- २ पदे (अजा – १, अज – १).
पद क्र. १० व ११ साठी ( i) पात्रता – पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि कॉम्प्युटर टायिपग स्पीड इंग्लिश ४० श.प्र.मि./ हिंदूी ३० श.प्र.मि.
( i) वेतन श्रेणी – रु. २१,५४० – ७७,१७० IDA पॅटर्न इतर भत्ते.
( ii) वयोमर्यादा – २८ वर्षे.
कमाल वयोमर्यादेत सूट : इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे.
परीक्षा शुल्क : रजिस्ट्रेशन चार्जेस रु. ६००/- (खुला, इमाव, ईडब्ल्यूएससाठी), रु. २००/- (अजा/ अज/ दिव्यांगांसाठी).
निवड पद्धती : ज्यु. टेक्निशियन पदांसाठी – १२५ गुणांसाठी १०० प्रश्न, वेळ २ तासांची. लेखी परीक्षा (१) संबंधित ट्रेडवर आधारित ५० प्रश्न, ७५ गुण, (२) लॉजिकल रिझिनग – १० प्रश्न, (३) जनरल अवेअरनेस – १५ प्रश्न, (४) इंग्लिश लँग्वेज – १५ प्रश्न, (५) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड – १० प्रश्न. २ ते ५ साठी प्रत्येकी १ गुण. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
B-३ LEVEL पदांसाठी – प्रथम इंग्लिश/ हिंदूी टायिपग टेस्ट कॉम्प्युटरवर घेतली जाईल. जे उमेदवार टायिपग टेस्ट उत्तीर्ण करतील, त्यांना १६० गुणांची, १६० प्रश्नांसाठी २ तास कालावधीची लेखी परीक्षा द्यावी लागेल. (१) लॉजिकल रिझिनग, (२) जनरल अवेअरनेस, (३) इंग्लिश लँग्वेज, (४) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड प्रत्येकी ४० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास १ गुण.
चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल.
लेखी परीक्षा मुंबई/ नवी मुंबई, नाशिक, भोपाळ, दिल्ली, हैदराबाद, कोलकत्ता केंद्रांवर घेतली जाईल.
ऑनलाइन अर्ज www. igmmumbai. spmcil. Com या संकेतस्थळावर दि. १५ जुलै २०२३ पर्यंत करावेत.
इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP), (गृहमंत्रालय, भारत सरकार) महिला उमेदवारांची ‘हेड कॉन्स्टेबल (मिडवाईफ)’ पदांवर भरती.
एकूण रिक्त पदे : ८१ (अजा – १२, अज – ६, इमाव – २२, ईडब्ल्यूएस – ७, खुला – ३४).
वेतन श्रेणी : पे-लेव्हल – ४ (रु. २५,५०० – ८१,१००) + महागाई भत्ता आणि इतर भत्ते अंदाजे दरमहा वेतन रु. ४०,०००/-.
पात्रता : ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) ऑक्झिलरी नर्सिग मिडवायफरी कोर्स उत्तीर्ण, ( iii) केंद्र सरकार/ राज्य सरकारच्या नर्सिग काऊन्सिलकडे नोंदणी.
वयोमर्यादा : (दि. ८ जुलै २०२३ रोजी) १८ ते २५ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. ९ जून १९९८ ते ८ जुलै २००५ दरम्यानचा असावा.) (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे.)
निवड पद्धती : अॅडमिट कार्ड उमेदवारांना ऑनलाइन उपलब्ध करून दिले जातील. शारीरिक क्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मापदंड चाचणी (PST) च्या ठिकाणी हजर होताना उमेदवारांनी ऑनलाइन अर्जाची पिंट्रआऊट आणि अॅडमिट कार्ड घेऊन येणे आवश्यक.
( i) फेज- क – शारीरिक क्षमता चाचणी (PET) – ८०० मीटर अंतर ४ मि. ४५ सेकंदांत धावणे, लांब उडी – ९ फूट, उंच उडी – ३ फूट (लांब उडी आणि उंच उडीसाठी ३ संधी दिल्या जातील.) ढएळ फक्त पात्रता स्वरूपाची असेल.
शारीरिक मापदंड चाचणी ( PST) : उंची – १५७ सें.मी., अनुसूचित जमातीसाठी १५० सें.मी., दृष्टी – दूरची दृष्टी (चष्म्याशिवाय) – चांगला डोळा – ६/६, खराब डोळा – ६/९.
( ii) PET/ PST मध्ये पात्र ठरलेले उमेदवारांना अॅडमिट कार्ड ऑनलाइन जारी केले जाईल.
( iii) फेज- II – लेखी परीक्षा – १०० गुणांची लेखी परीक्षा OMR बेस्ड किंवा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ( CBT) घेतली जाईल. ज्यात (१) जनरल इंटेलिजन्स अॅण्ड रिझिनग, (२) जनरल अवेअरनेस, (३) न्यूमरिकल अॅप्टिटय़ूड, (४) इंग्लिश/ हिंदूी कॉम्प्रिहेन्शन प्रत्येकी १० प्रश्न, १० गुणांसाठी, (५) ट्रेड/ प्रोफेशनशी संबंधित – ६० प्रश्न, ६० गुण. एकूण १०० गुण, वेळ २ तास.
ट्रेड/ प्रोफेशनशी संबंधित प्रश्नांमध्ये (i) कम्युनिटी हेल्थ नर्सिग, (ii) प्रायमरी हेल्थ केअर नर्सिग, (iii) चाईल्ड हेल्थ नर्सिग, (iv) मिडवायफरी, (v) कम्युनिटी हेल्थ आणि हेल्थ सेंटर मॅनेजमेंट या विषयांचा समावेश असेल.
फेज- III : कागदपत्र पडताळणी.
प्रॅक्टिकल एक्झामिनेशन – कागदपत्र पडताळणीत उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांची प्रॅक्टिकल टेस्ट घेतली जाईल. ( i) Vice- Voce – ४० गुण, ( ii) इन्स्ट्रमेंट्स ओळखणे – ३० गुण, ( iii) प्रोसिजर्स – ३० गुण, एकूण १०० गुण. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन फक्त पात्रता स्वरूपाची असेल.
मेरिट लिस्ट : लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार कॅटेगरीनिहाय गुणवत्ता यादी बनविली जाईल.
(उमेदवारांची डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन (DME) घेतली जाईल. उमेदवार रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशनसाठी Annexure- VII प्रमाणे २४ तासांच्या आत अपिल करू शकतात.)
शंकासमाधानासाठी ई-मेल आयम्डी comdtrect@itbp. gov. in हेल्पलाईन नं. ०११-२४३६९४८२/ २४३६९४८३
परीक्षा शुल्क : या जागा महिला उमेदवारांसाठी असल्यामुळे कोणतीही फी भरावयाची नाही. ऑनलाइन अर्ज ६६६. www. recruitment. itbpolice.nic.in या संकेतस्थळावर ८ जुलै २०२३ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.