अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नवी दिल्ली, आपल्या २० सहयोगी संस्था आणि केंद्र सरकारच्या ८ संस्थांमधील ग्रुप-बी व ग्रुप-सी मधील शिक्षकेतर कर्मचारी पदांच्या भरतीकरिता कॉमन रिक्रूटमेंट एक्झामिनेशन (CRE-२०२५) घेणार आहे. या CRE मधून उमेदवार एकूण ६६ ग्रुप्समधील पदांसाठी पात्र ठरणार आहेत. यातील काही ग्रुप्समधील पदे अशाप्रकारे –

(१) डाएटिशियन – एकूण २४. (२) असिस्टंट/अॅडमिन ऑफिसर- एकूण ८९.

Job Opportunity 234 Vacancies in HPCL career news
नोकरीची संधी: ‘एचपीसीएल’मध्ये २३४ रिक्त पदे
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Chandrakant Khaire On Shiv Sena Shinde group
Chandrakant Khaire : ‘शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपाल पदाची ऑफर’, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
success story of sahil pandita once washed vessels now owning business of 2 crores dvr 99
“भांडी घासली, टॉयलेट साफ केलं”, नोकरी करताना मिळायचे मोजकेच पैसे, पण आता उभारली कोटींची कंपनी; वाचा डोळ्यात पाणी आणणारा प्रवास
कृत्रिम प्रतिज्ञेच्या: डेटा अॅनॅलिटिक्स
mpsc 1333 post exam
नोकरीची संधी: लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेद्वारे भरती
Interview Stress Job Placement Interview career news
पहिले पाऊल: मुलाखतीचा ताण
दूरदेशीच्या ज्ञानवाटा : अमेरिकेतील प्रवेश परीक्षा

(३) लोवर डिव्हीजन क्लर्क – एकूण १७८.

(४/५/६) ज्यु. इंजिनीअर (सिव्हील/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल) एकूण ५९.

(८) इलेक्ट्रिशियन/वायरमन – एकूण २५. (१५) ज्युनियर अकाऊंट्स ऑफिसर – एकूण ३०.

(१९) लॅब अटेंडंट – एकूण ६१२. (२०) हॉस्पिटल अटेंडंट – एकूण ६०९.

(२१) डिसेक्शन हॉल अटेंडंट – एकूण १४. (२२) ईसीजी टेक्निशियन – एकूण १२६.

(२८) टेक्निकल असिस्टंट – एकूण २५३. (२९) ज्यु. रेडिओग्राफर – एकूण २९०.

(३०) डेंटल टेक्निशियन – एकूण ६९. (३७) फार्मासिस्ट (आयुर्वेदिक) एकूण २७.

(४३) ज्यु. फिजिओथेरापिस्ट – एकूण ४६. (४६) ड्रायव्हर (ओजी) एकूण १२.

(४७) मेडिकल सोशल वर्कर – एकूण ७४.

(५२) पर्सोनल असिस्टंट/स्टेनोग्राफर इ. एकूण १९२.

(५३) फार्मा केमिस्ट/फार्मासिस्ट इ. एकूण १६९. (५४) नर्सिंग ऑफिसर – एकूण ८१३.

(५५) सॅनिटरी इन्स्पेक्टर – एकूण ४१.

(६२) असिस्टंट स्टोअर्स ऑफिसर/स्टोअर किपर इ. एकूण ८४.

(६४) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन – एकूण २३४.

वयोमर्यादा : पद ग्रुप क्र. १, २८, ४७, ५५ साठी ३५ वर्षे; पद ग्रुप क्र. २, ४, ५, ६, ८, १५, २१, ४३, ५४, ६२ साठी ३० वर्षे; पद ग्रुप क्र. ३, २०, ४६, ५२, ५३ साठी २७ वर्षे; पद ग्रुप क्र. १९, २२, २९, ३०, ३७, ६४ साठी २५ वर्षे.

कमाल वयोमर्यादेत सूट : इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे.

निवड पद्धती : ऑब्जेक्टिव्ह टाईप (एमसीक्यू) १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास ४ गुण, एकूण ४०० गुणांसाठी वेळ ९० मिनिटे. (२५ प्रश्न जनरल नॉलेज आणि अॅप्टिट्यूड; ७५ प्रश्न संबंधित विषयावर (डोमेन) आधारित) प्रश्नपत्रिका ५ सेक्शन्समध्ये विभागलेली असेल. २० प्रश्नांच्या प्रत्येक सेक्शनसाठी १८ मिनिटांचा कालावधी दिला जाईल. बहुतेक प्रश्न इंग्रजी भाषेतून असतील. काही पदांसाठी मात्र प्रश्न हिंदी/इंग्रजी भाषेतून विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील. काही पदांसाठी स्किल टेस्ट ठराविक केंद्रांवरच घेतली जाईल.

अॅडमिट कार्ड : www. aiimsexams. ac. in या वेबसाईटवरून परीक्षेच्या ३ दिवस अगोदर डाऊनलोड करता येतील. परीक्षा केंद्र (शहर) मात्र ७ दिवस अगोदर जाहीर केले जाईल.

परीक्षा केंद्र : उमेदवारांनी परीक्षेसाठी आपला परीक्षाकेंद्राचा पसंतीक्रम निवडायचा आहे. ज्या ग्रुपसाठी परीक्षा घ्यावयाची आहे, त्याकरिता ५०० पेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास उमेदवारांचा पसंतीक्रम डावलून परीक्षा दिल्ली केंद्रावर घेतली जाईल. उमेदवारांना तसे परीक्षेच्या १० दिवस अगोदर सूचित केले जाईल.

अर्जाचे शुल्क : खुला/इमाव – रु. ३,०००/-; अजा/अज/ईडब्ल्यूएस – रु. २,४००/-. दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे. पदांसाठीचा पसंतीक्रम : वेगवेगळ्या सहयोगी संस्थांमधील पदांकरिता परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून नंतर घेतला जाईल. यासाठी दिलेल्या मुदतीनंतर उमेदवारांना तसा पसंतीक्रम देता येणार नाही.

कॉमन रिक्रूटमेंट एक्झामिनेशन ( CRE) २०२४ साठी ऑनलाइन अर्ज www. aiimsexams. ac. in या संकेतस्थळावर ३१ जानेवारी २०२५ पर्यंत करावेत.

suhaspatil237 @gmail. com

Story img Loader