सुहास पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी) (NIN) पुणे (आयुष मंत्रालय, भारत सरकार), बापू भवन, मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड (ताडीवाला रोड), पुणे – ४११००१ संस्थेमार्फत १ वर्ष कालावधीचे पूर्ण वेळ मोफत प्रॅक्टिकल आणि करिअर ओरिएंटेड ट्रेनिंग कोर्स ‘निसर्गोपचार व योग उपचार सहाय्यक प्रशिक्षण’ (Treatment Assistant Training Course (TATC) निसर्गोपचार हॉस्पिटल्स, वेलनेस सेंटर्स आणि स्पा इंडस्ट्रीसाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी चालविले जाते. प्रवेश क्षमता – ८०. आजपर्यंत ३१ बॅचेस TATC च्या पूर्ण झाल्या आहेत. TATC हा निशुल्क कोर्स आहे.

निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रु. ५,०००/- स्टायपेंड ट्रेनिंग दरम्यान दिले जाईल.

पात्रता : १० वी उत्तीर्ण. (१२ वी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाईल.)

किमान वयोमर्यादा : १८ वर्षं पूर्ण.

अर्जाचे शुल्क : अर्जाचा विहीत नमुना आणि प्रॉस्पेक्ट्स NIN च्या https:// ninpune. ayush. gov. in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून पूर्ण भरलेला अर्ज ‘ The Director, National Institute of Naturopathy’ यांचे नावे पुणे येथे देय असलेला रु. ५०/- च्या डिमांड ड्राफ्टसह पाठवावेत. डीडी ऐवजी पुढील अकाऊंटमध्ये रु. ५०/- ट्रान्सफर करून पाठविता येतील. Bank of Baroda – Wadia College Branch. Name of A/ c. Holder – The Director, National Institute of Naturopathy. A/ c. No. – 09080100001166. IFSC Code – BARBq WADPOO (5 th caracter is zero.)

निवड पद्धती : ऑक्टोबर महिन्यामध्ये NIN च्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. तसेच प्रमुख वर्तमानपत्रांत TATC मधील प्रवेशासाठी जाहिरात दिली जाते. उमेदवारांची दि. ७ आणि ८ डिसेंबर २०२३ रोजी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल व कोर्स सुरू होण्याची तारीख निवडलेल्या उमेदवारांना NIN च्या वेबसाईटवर सूचित केली जाईल.

स्टायपेंड : उमेदवाराने कोर्स पूर्ण करण्यापूर्वी सोडल्यास त्यांना मिळालेले स्टायपेंड १२ टक्के दंडात्मक व्याजासह ७ दिवसांच्या आत भरावे लागतील.

प्रवेश घेते वेळी उमेदवारांना रु. ५,०००/- संस्थेकडे अनामत रक्कम ‘Director, National Institute of Naturopathy’ यांच्या नावे काढलेला डीडी (जो पुणे येथे देय असेल) भरावी लागेल. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यास अनामत रक्कम परत केली जाईल.

ट्रेनीजची १०० टक्के उपस्थिती कोर्स दरम्यान अपेक्षित आहे. (आजारपणाचे कारण व कोर्स को-ऑर्डिनेटरने मंजूर केलेल्या रजा वगळता)

निवडलेल्या उमेदवारांना NIN चे ओळखपत्र (ID Card) आणि अॅप्रॉन दिले जाईल. जे त्यांनी NIN कँपसमध्ये घालणे अनिवार्य आहे.

दैनंदिनी (Daily Diary), प्रॅक्टिकल रेकॉर्ड्स, लॉग बुक्स, त्यांची सामान्य वागणूक आणि कामगिरीवर आधारित ट्रेनीजचे इंटर्नल असेसमेंट केले जाईल. ज्याचा रिपोर्ट दर दोन महिन्यांनी विद्यार्थ्यांसाठीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केला जाईल.

मुलाखत (Viva) आणि प्रात्यक्षिक परीक्षा प्रत्येक विषयासाठीची कोर्सच्या शेवटाला घेतली जाईल. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यास ट्रेनीजना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल.

ट्रेनीजना आठवड्याच्या ६ दिवस दोन शिफ्ट्समध्ये चालणाऱ्या प्रॅक्टिकल सेशन्सला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. (१ ली शिफ्ट सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत किंवा २ री शिफ्ट दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत) ठरावीक कालावधीनंतर प्रशिक्षणार्थींना शिफ्ट आणि डिपार्टमेंट बदलून दिले जाईल.

TATC कोर्समध्ये प्रात्यक्षिकांवर अधिक भर असेल व थियरी फक्त २० टक्केच असेल.

निसर्गोपचारासाठी ‘उपचार सहाय्यक’ घडविण्याचे काम NIN मध्ये केले जाते. TATC कोर्सचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे – (१) फिलॉसॉफी ऑफ नेचर क्युअर, (२) मसाज (प्रॅक्टिकल व थिअरी), (३) अॅनाटॉमी अॅण्ड फिजिऑलॉजी, (४) योगा थेरपी आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग, (५) हायड्रोथेरपी, (६) मड थेरपी, (७) डाएट अॅण्ड न्यूट्रिशन, (८) फास्टींग (उपवास), (९) मॅग्नेटो थेरपी, (१०) क्रोमो थेरपी, (११) अॅक्युप्रेशर, (१२) फिजिओथेरपी, (१३) क्लिनिकल ट्रेनिंग अॅण्ड नर्सिंग केअर, (१४) इंग्लिश कम्युनिकेशन स्किल.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : (१) एसएससी प्रमाणपत्र, (२) १२ वी प्रमाणपत्र, (३) वयाचा पुरावा, (४) आधारकार्ड/ रेशन कार्ड इ. ओळखपत्र, (५) अॅड्रेस प्रुफ – आधारकार्ड/ रेशनकार्ड इ., (६) जातीचा दाखला (लागू असल्यास).

विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज स्कॅन करून आवश्यक त्या स्कॅन केलेल्या कागदपत्रांसह tatc. admission@gmail. com या ई-मेलवर दि. ५ डिसेंबर २०२३ पर्यंत पाठवावेत किंवा पुढील पत्त्यावर समक्ष पोहोचवावेत.

‘ National Instiutte of Naturopathy, Ministry of AYUSH, Govt. of India, Bapu Bhavan, Matoshree Ramabai Ambedkar Road (Tadiwala Road), Pune – 411001.’

मुलाखतीची तारीख दि. ७ आणि ८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यंत.

अधिक माहिती https:// ninpune. ayush. gov. in या संकेतस्थळावर (Courses & gt; Treatment Assistant Training Course) उपलब्ध आहे. फोन नं. ०२०-२६०५९६८२/ ३/ ४/ ५. ई-मेल – tact. admission@gmail. com

नोकरीची संधी

आयडीबीआय बँक (IDBI Bank) (Advt. No. १०/२०२३-२४) ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड- ड ‘एक्झिक्युटिव्ह – सेल्स अॅण्ड ऑपरेशन्स (एरड)’ पदांची करार पद्धतीने भरती. एकूण रिक्त पदे – २,१००

(I) ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड- ड – ८०० पदे (अजा – १२०, अज – ६०, इमाव – २१६, ईडब्ल्यूएस – ८०, खुला – ३२४) (३६ पदे दिव्यांग (कॅटेगरी VH – ९, HH – ९, OH – ९, MD/ ID – ९) साठी राखीव)

(II) एक्झिक्युटिव्ह – सेल्स अॅण्ड ऑपरेशन्स – १,३०० पदे (अजा – २००, अज – ८६, इमाव – ३२६, ईडब्ल्यूएस – १३०, खुला – ५५८) (५२ पदे दिव्यांग (कॅटेगरी VH – १३, HH – १३, OH – १३, MD/ ID – १३) साठी राखीव). निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला करार पद्धतीने १ वर्षासाठी नेमणूक दिली जाईल. उमेदवाराची समाधानकारक कामगिरी आणि नेमून दिलेल्या अनिवार्य ई-सर्टिफिकेशन्स पूर्ण केल्यास कराराचा कालावधी एक-एक वर्षाने वाढवून जास्तीत जास्त २ वर्षांसाठी वाढविला जाऊ शकतो.

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड- ड पदावरील २ वर्षांची सेवा यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर त्यांना बँकेत गरज असल्यास निवड प्रक्रिये सामोरे जाऊन असिस्टंट मॅनेजर ग्रेड- अ पदावर कायम केले जाईल. एक्झिक्युटिव्ह सेल्स अॅण्ड ऑपरेशन्स पदावरील ३ वर्षांचा कराराचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यास निवड प्रक्रिये मार्फत उमेदवार ‘असिस्टंट मॅनेजर’ (ग्रेड-ओ) पदावर बँकेत कायम केले जाऊ शकतात.

पात्रता : १ नोव्हेंबर २०२३ रोजी (I) ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड- ड – पदवी कोणतीही शाखा (खुला/ इमाव) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण, अजा/ अजसाठी ५५ टक्के गुण. (II) एक्झिक्युटिव्ह – सेल्स अॅण्ड ऑपरेशन्स (ESO) – मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पदवी.

वयोमर्यादा : दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी २० ते २५ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, माजी सैनिक – ५ वर्षे)

दरमहा वेतन : (I) ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदांसाठी वार्षिक वेतन रु. ६.१४ लाख ते रु. ६.५० लाख. (II) एक्झिक्युटिव्ह – सेल्स अॅण्ड ऑपरेशन्स (ESO) पदांसाठी दरमहा एकत्रित वेतन पहिल्या वर्षी – रु. २९,०००/-; दुसऱ्या वर्षी रु. ३१,०००/-; तिसऱ्या वर्षी रु. ३४,०००/-.

निवड पद्धती : दोन्ही पदांसाठी भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाइन टेस्ट, कागदपत्र पडताळणी (DV) आणि भरतीपूर्व वैद्याकिय तपासणी (PRMT) यांचा समावेश असेल. याव्यतिरिक्त ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड- ड पदांसाठी ढफटळ पूर्वी पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जाईल.

ऑनलाइन टेस्ट : (१) लॉजिकल रिझनिंग, डेटा अॅनालिसिस अॅण्ड इंटरप्रिटेशन – ६० प्रश्न, (२) इंग्लिश लँग्वेज – ४० प्रश्न, (३) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ४० प्रश्न, (४) जनरल/इकॉनॉमी/ बँकिंग अवेअरनेस/ कॉम्प्युटर/ आयटी – ६० प्रश्न.

प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण २०० प्रश्न, २०० गुण, एकत्रित वेळ २ तास. उमेदवारांना प्रत्येक टेस्टमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण किंवा ०.२५ गुण वजा केले जातील.

ऑनलाइन टेस्ट ESO पदांसाठी दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी व ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदांसाठी दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी घेतली जाईल.

ऑनलाइन अर्जासोबत फोटो, सिग्नेचर, Thumb Impression आणि Hand Written Declaration स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक. (यासाठी Annexure- I मधील सूचना वाचाव्यात.)

अर्जाचे शुल्क : (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांसाठी रु. २००/-) (फक्त इंटिमेशन चार्जेस); इतर उमेदवारांसाठी रु. १,०००/- (इंटिमान चार्जेससह).

प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग (PET) : अजा/ अज/ इमाव उमेदवारांसाठी भरती पूर्व प्रशिक्षण (PET) बँक ऑनलाइन अथवा ऑफलाइन मोडने आयोजित करणार आहे. PET साठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात तशी निवड करणे आवश्यक. PET चे ठिकाण अथवा लिंक, तारीख, वेळ इ. माहिती उमेदवारांना ई-मेल/ SMS द्वारे कळविण्यात येईल.

ऑनलाइन अर्ज www. idbibank. in या संकेतस्थळावर दि. ६ डिसेंबर २०२३ पर्यंत करावेत. (l Careers/ Current Openings; Recruitment of Junior Assistant Manager (JAM) Grade- O & Executives Sales & Operations (on Contract) 2023-24’; Apply Online)

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity national institute of naturopathic medicine treatment assistant training course amy
Show comments