सुहास पाटील

नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड (NSCL) (मिनिस्ट्री ऑफ अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅण्ड फार्मर्स वेल्फेअर अंतर्गत भारत सरकारचा एक उपक्रम) (Advt. No. RECTT/1/ NSC/2023). NSCL च्या कॉर्पोरेट ऑफिस (नवी दिल्ली) रिजनल/ एरिया ऑफिसेस आणि देशभरात स्थित फाम्र्समध्ये पुढील पदांची सरळसेवा भरती. एकूण रिक्त पदे – ८९.

Mumbai provision of Rs 200 crore has made from SIDBI for startups in state
राज्यात नावीन्यता शहरांची स्थापना, स्टार्टअपसाठी २०० कोटी, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
MHADA to invite applications for comprehensive list Application process from January 15 to 31 mumbai news
म्हाडा बृहतसूचीसाठी मागविणार अर्ज; १५ ते ३१ जानेवारीदरम्यान अर्ज प्रक्रिया; सोडतीद्वारे मूळ भाडेकरूंना घरांचे वितरण
principal posts , Reservation , MPSC,
अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर एमपीएससीने आरक्षण काढून टाकले, आता सर्व पदे खुल्या वर्गासाठी
ESIC Recruitment 2025
ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
Investiture Ceremony Indian Army , Indian Army,
व्यावसायिकतेत लष्कर शिखरावर
underground Ulhasnagars old electricity system is fulfilled with 16 84 crore funding approved
उल्हासनगरातील विद्युत वितरण यंत्रणा भूमीगत होणार; केंद्रीय योजनेतून १६ कोटींचा निधी, मात्र खोदकामामुळे त्रास वाढण्याची भीती

(१) ट्रेनी (अ‍ॅग्रिकल्चर) – ४० पदे (अजा – ९, अज – २, इमाव – १०, ईडब्ल्यूएस – १०, खुला – ९) (इमाव, अजा/ अज, दिव्यांग कॅटेगरी HH व MD साठी असलेल्या पदांपैकी प्रत्येकी १ पद बॅकलॉगमधील आहे.) (३ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

(२) ट्रेनी (मार्केटिंग) – ६ पदे (अजा – १, अज – २, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १) (१ पद दिव्यांग कॅटेगरी VH साठी राखीव).

(३) ट्रेनी क्वालिटी कंट्रोल – ३ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).

(४) ट्रेनी अ‍ॅग्रि स्टोअर्स – १२ पदे (इमाव – ६, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ३) (दिव्यांग कॅटेगरी VH आणि HH साठी प्रत्येकी १ पद राखीव) (१ पद माजी सैनिकांसाठी राखीव).

पात्रता : (दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी) पद क्र. १ ते ४ साठी बी.एस्सी. (अ‍ॅग्रिकल्चर) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि कॉम्प्युटर (एम.एस. ऑफिस) चे ज्ञान अनिवार्य.

(५) ट्रेनी स्टेनोग्राफर – ५ पदे (अज – १ (बॅकलॉग), इमाव – ३ (बॅकलॉग), खुला – १).

पात्रता : (i) १२ वी आणि ऑफिस मॅनेजमेंटमधील ३ वर्षांचा डिप्लोमा (स्टेनोग्राफीसह) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा पदवी किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि स्टेनोग्राफी सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.

(६) मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) – १५ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ७) (अज, इमाव, दिव्यांग कॅटेगरी HH साठीचे प्रत्येकी १ पद बॅकलॉगमधील).

पात्रता : बी.एस्सी. (अ‍ॅग्री) आणि एम.बी.ए. (मार्केटिंग/ अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट) किंवा एम.एस्सी. (अ‍ॅग्री) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि कॉम्प्युटरचे ज्ञान (एमएस – ऑफिस) अनिवार्य.

(७) मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) – १ पद (खुला). पात्रता – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि कॉम्प्युटरचे ज्ञान (एमएस -ऑफिस) अनिवार्य.

(८) मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हील इंजिनीअरिंग) – १ पद (खुला).

पात्रता : सिव्हील इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि कॉम्प्युटरचे ज्ञान अनिवार्य.

(९) ज्युनियर ऑफिसर- I (लिगल) – ४ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).

पात्रता : कायदा विषयातील पदवी लीगल मॅटर्स हाताळण्याचा १ वर्षांचा अनुभव.

(१०) ज्युनियर ऑफिसर- I (व्हिजिलन्स) – २ पदे (खुला).

पात्रता : पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.

वेतन/ स्टायपेंड : दरमहा – ट्रेनी पदांसाठी स्टायपेंड रु. २३,६६४/- दरमहा. मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी रु. ५५,६८०/- दरमहा. ज्युनियर ऑफिसर पदांसाठी वेतन श्रेणी (IDA) रु. २२,००० – ७७,०००. अंदाजे वेतन दरमहा रु. ३७,२२४/- (एचआरए वगळता).

वयोमर्यादा : दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी ट्रेनी/ मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी २७ वर्षे; ज्युनियर ऑफिसर पदांसाठी ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)

निवड पद्धती : मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी स्टेज-१ – लेखी परीक्षा यातून स्टेज-२ – इंटरह्यू आणि कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवार निवडले जातील. स्टेज-३ – लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूचे गुण एकत्र करून गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल.

लेखी परीक्षेतील गुणांना ७० टक्के वेटेज आणि इंटरव्ह्यूसाठी ३० टक्के वेटेज दिले जाईल.

इतर पदांसाठी – स्टेज-१ – लेखी परीक्षा (कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट). स्टेज-२ – लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार ट्रेनी स्टेनोग्राफर पदांसाठी लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट (स्टेनोग्राफी) उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले जाईल. स्टेज-३ – लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार किंवा लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट (स्टेनोग्राफर) मधील गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल. मॅनेजमेंट ट्रेनीजनी १ वर्षांची ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यास त्यांना असिस्टंट मॅनेजर पदावर (वेतन श्रेणी रु. ४०,००० – १,४०,) कायम केले जाईल.

ट्रेनीजनी १ वर्षांची ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यास त्यांना ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ (वेतन श्रेणी रु. १७,००० – ६०,) पदावर कायम केले जाईल.

अर्जाचे शुल्क : रु. ५००/- अधिक जीएस्टी आणि प्रोसेसिंग फी आणि पेमेंट गेटवे चार्जेस अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना अर्जाचे शुल्क माफ आहे. परंतु त्यांना प्रोसेसिंग फी आणि पेमेंट गेटवे चार्जेस भरावे लागतील. पोस्ट कॅटेगरी- I(मॅनेजमेंट ट्रेनी, ज्युनियर ऑफिसर) आणि पोस्ट कॅटेगरी- II ट्रेनी पदांसाठी प्रत्येक कॅटेगरीमधील पदांसाठी एक अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्जासोबत उमेदवारांनी रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो; स्वाक्षरी आणि अर्जाच्या लिंकवर नमूद केलेल्या प्रमाणपत्रांच्या स्वयंसाक्षांकीत प्रती अपलोड करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज  www. indiaseeds. Com या संकेतस्थळावर दि. १० ऑक्टोबर २०२३ पर्यंत करावेत.\

पोलीस पाटील पदभरती – २०२३. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक अंतर्गत उपविभागीय कार्यालय क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये पोलीस पाटील पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ६६६. नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय कोणत्या गावासाठी कोणत्या संवर्गातील रिक्त पदे – आरक्षित आहेत, याचा तपशील https:// nashik. ppbharti. inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उपविभागनिहाय पोलीस पाटील पदांचा तपशील –

(१) मालेगाव उपविभाग – ६३ पदे (अजा – १२, विमाप्र – ३, विजा-अ – २, भज-ब – २, भज-क – ३, भज-ड – ३, इमाव – २३, ईडब्ल्यूएस – ६, खुला – ९).

(२) येवला उपविभाग – ६१ पदे. येवला तालुका – ३० पदे (अजा – ६, विमाप्र – ३, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – १, इमाव – १६, खुला – १). नांदगाव तालुका – ३१ पदे (अजा – १२, विमाप्र – १, विजा-अ – १, भज-ब – ४, इमाव – १३).

(३) चांदवड उपविभाग – ५९ पदे. देवळा तालुका – १६ पदे (अजा – ४, अज – ३, भज-ब – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – १, खुला – २). चांदवड तालुका – ४३ पदे (अजा – ११, विजा- अ – ४, भज- ब – १, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ४, खुला – ११).

(४) दिंडोरी उपविभाग – ११६ पदे. दिंडोरी तालुका – अनुसूचित क्षेत्रातील पदे (पेसा) – ४७ (अज). पेठ तालुका – अनुसूचित क्षेत्रातील पदे (पेसा) – ६० (अज); अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदे – ९ (अज – २, विजा-अ – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).

(५) बागलाण उपविभाग – ५७ पदे (अजा – ४, अज – २७, विमाप्र – १, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १३).

(६) नाशिक उपविभाग – २२ पदे.

(७) निफाड उपविभाग – ६९ पदे (अजा – १७, विमाप्र – ३, इमाव – २७, ईडब्ल्यूएस – ७, खुला – १५).

(८) कलवण उपविभाग – ११९ पदे. कलवण तालुका – ५८ पदे (अज – ५७, इमाव – १). सुरगणा तालुका – ६१ पदे (अज).

(९) इगतपुरी- त्र्यंबकेश्वर उपविभाग- १०० पदे. इगतपुरी तालुका – ४८ पदे (अजा – ७, अज – २८, भज-ब – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ५). त्र्यंबकेश्वर तालुका – ५२ पदे (अज – ५१, भज- क – १).

पात्रता : दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण.

वयोमर्यादा : (दि. २६ सप्टेंबर २०२३ रोजी) २५ पेक्षा कमी नसावे व ४५ पेक्षा जास्त नसावे.

अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असावा. (अर्जदाराने शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, इतर ओळखपत्र, स्वयंघोषणापत्र किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिद्ध होते अशा कोणत्याही एका पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक.)

अर्जदाराने अर्जामध्ये स्वत:चा ई-मेल व मोबाइल नंबर नमूद करणे अनिवार्य.

अर्जदार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक. अर्जदार याची अर्हता दिनांकास दोनपेक्षा जास्त अपत्य नसावीत.

मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरिता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकाऱ्याने जारी (निर्गमित) केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.

इमाव, विमाप्र, विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड या प्रवर्गातील अर्जदार यांनी भरती कालावधीकरिता वैध असलेले उन्नत आणि प्रगत गटात यामध्ये मोडत नसल्याचे (नॉन-क्रिमी लेयर) प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.

निवड पद्धती : लेखी परीक्षा – ८० गुण, तोंडी परीक्षा – २० गुण, एकूण १०० गुण. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण ८० गुण. लेखी परीक्षा १० वीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यात सामान्यज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इ. विषयांचा समावेश असेल. लेखी परीक्षेत किमान ३६ गुण (४५ टक्के) प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण मिळालेल्या पर्याप्त प्रमाणातील अर्जदारांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल.

लेखी परीक्षेसाठी उत्तरे लिहिण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळय़ा शाईचा बॉलपेन वापरावा.

दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास (१) पोलीस पाटलांचे वारस (पती, पत्नी आणि दोन मुले), (२) अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्च शैक्षणिक अर्हता धारण करणारे अर्जदार, (३) माजी सैनिक अर्जदार यांना प्राधान्य देण्यात येईल.

ऑनलाइन अर्ज करताना शैक्षणिक अर्हता कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे, विहीत नमुन्यातील पासपोर्ट आकाराचा फोटो व सही स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – रु. ६००/-; आरक्षित/आर्थिक घटक प्रवर्गासाठी रु. ५००/-. ऑनलाइन अर्ज https:// nashik. ppbharti. in या संकेतस्थळावर दि. ८ ऑक्टोबर २०२३ (१७.४५ वाजे)पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com

Story img Loader