एआय इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL), ओल्ड एअरपोर्ट, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००२९ ( Ref. No. AIESL/ WR- HR/2024 dt. 25.06.2024). एअरक्राफ्ट टेक्निशियन्स आणि ट्रेनी एअरक्राफ्ट टेक्निशियन पदांची ठरावीक मुदतीकरिता करार पद्धतीने भरती. एकूण रिक्त पदे १००.
(१) एअरक्राफ्ट टेक्निशियन (B1)/ ट्रेनी टेक्निशियन (B1) (मेंटेनन्स अँड ओव्हरहॉल शॉप्स) ७२ पदे.
पात्रता – (दि. १ जून २०२४ रोजी) एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंग डिप्लोमा/ DGCA मान्यताप्राप्त संस्थेकडील एअरक्राफ्ट मेटेनन्स इंजिनीअरिंग सर्टिफिकेट (मेकॅनिकल स्ट्रीमधील) किंवा मेकॅनिकल/ एअरोनॉटिकल इंजिनीअरिंग किंवा समतुल्य डिप्लोमा किंवा माजी सैनिकांसाठी संबंधित ट्रेडमधील DGCA मान्यताप्राप्त पात्रता.
(२) एअरक्राफ्ट टेक्निशियन (B2)/ ट्रेनी टेक्निशियन (B2) २८ पदे.
पात्रता – DGCA मान्यताप्राप्त संस्थेकडील एव्हिऑनिक्स स्ट्रीममधील अटए डिप्लोमा/सर्टिफिकेट किंवा इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/ रेडिओ/ इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा इंडियन एअरफोर्समध्ये ऊॅउअ मान्यताप्राप्त संबंधित ट्रेडमधील इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा इंडियन नेव्हीमधील DGCA मान्यताप्राप्त एअरक्राफ्ट इलेक्ट्रिकल आर्टिफिसर/एअर इलेक्ट्रिकल रेडिओ आर्टिफिसर किवा समतूल्य पात्रता,
सर्व पात्रता परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेल्या असाव्यात. (अजा/ अजसाठी ५५ टक्के गुण)
दोन्ही पदांसाठी अनुभव एअरक्राफ्ट मेंटेनन्स /ओव्हर हॉल्व शॉपमधील किमान १ वर्षाचा एव्हिएशन अनुभव आवश्यक किंवा एअरक्राफ्ट मेंटेनन्स ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिस सर्टिफिकेट किंवा ट्रेनी टेक्निशियन कामाचा किमान ६ महिन्यांचा अनुभव.
वयोमर्यादा – (दि. १ जून २०२४ रोजी) खुला/ईडब्ल्यूएस ३५ वर्षे, इमाव ३८ वर्षे, अजा/अज ४० वर्षे.
कराराचा कालावधी सुरुवातीला उमेदवार ५ वर्षाच्या कालावधीसाठी नेमले जातील. त्यानंतर अकएरछ कंपनीची गरज आणि उमेदवारांची कामगिरी पाहून करार आणखी ५ वर्षांसाठी वाढविला जावू शकतो.
वेतन – एअरक्राफ्ट टेक्निशियन रु. २७,९४०/- दरमहा
स्टायपेंड ट्रेनी एअरक्राफ्ट टेक्निशियन रु. १५,०००/- दरमहा, ज्या उमेदवारांकडे १ वर्षापेक्षा कमी अनुभव आहे, त्यांना ६ महिन्यांकरिता ट्रेनी टेक्निशियन पदावर नेमणूक दिली जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवार ५ वर्षाच्या कालावधीसाठी एअरक्राफ्ट टेक्निशियन पदावर नियमित केले जावू शकतात.
निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना प्री-इंटरव्यू फॉरमॅलिटिजसाठी ई-मेलद्वारे सूचित केले जाईल. उमेदवारांची निवड स्किल टेस्ट ट्रेंड टेस्ट आणि टेक्निकल असेसमेंट व पर्सोनल इंटरव्यू घेवून केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना प्री-एम्प्लॉयमेंट मेडिकल टेस्ट द्यावी /लागेल.
ऑनलाइन अर्ज www. aiest. in/ Careers या संकेतस्थळावर दि. २५ जून २०२४ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जाची प्रिंटआऊट आवश्यक त्या कागदपत्रांसह प्री-इंटरव्यू फॉरमॅलिटिजच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.