आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर’ म्हणून बी.डी.एस. पात्रताधारक उमेदवारांना सामिल होण्याची संधी. एकूण रिक्त पदे – ३ (पुरुष – २७ पदे, महिला – ३ पदे).
पात्रता – बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी पदवी उत्तीर्ण (अंतिम वर्षात किमान सरासरी ५५ टक्के गुण आवश्यक) (उमेदवारांनी दि. ३० जून २०२४ पर्यंत BDS साठीची अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण केली असावी.) किंवा एमडीएस परीक्षा उत्तीर्ण. (फक्त १८ मार्च, २०२४ रोजी झालेल्या NEET ( MDS) २०२४ परीक्षेला बसलेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र आहेत.) उमेदवार डेंटल काऊन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत असावा. ५ वर्षे कालावधीचा (इंटर्नशिपचा यात समावेश नाही.) BDS अभ्यासक्रम करणाऱया उमेदवारांनी आपली ४ थ्या व ५ व्या वर्षाची मार्कशीट जोडणे आवश्यक.
वयोमर्यादा – दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी ४५ वर्षेपर्यंत.
शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १५७ सें.मी. महिला – १५२ सें.मी.
वजन – पुरुष – ४९.५ कि.ग्रॅ. महिला – ४२ कि.ग्रॅ.
निवड पद्धती – NEET ( MDS) २०२४ मधील गुणवत्तेनुसार उमेदवार इंटरह्यूसाठी १:१० प्रमाणात शॉर्ट लिस्ट केले जातील.
इंटरह्यू – आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड् ऑफिसर्सची निवड इंटरह्यूमधील कामगिरीवर आधारित केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची वैद्याकीय चाचणी केली जाईल. मेडिकल फिटनेस गाईडलाईन्स/ पॅरामीटर्स www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जर उमेदवार वैद्याकिय चाचणीत मेडिकली अपात्र ठरला तर उमेदवारास अपिल मेडिकल बोर्ड ( AMB) कडे अपिल करता येईल.
निवडलेल्या उमेदवारांना/ सिव्हीलियन डेंटल सर्जन्सना आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये कॅप्टन या रँकवर शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाईल.
सर्व्हिसचा कालावधी – SSC ऑफिसर्सचा कार्यकाळ ५ वर्षांचा असेल. जो आणखीन ९ वर्षांनी वाढविला जाऊ शकतो. (दोन अवधींसाठी प्रथम ५ वर्षांसाठी नंतर ४ वर्षांसाठी) एकत्रितपणे कार्यकाळ १४ वर्षांचा असेल.
प्रोबेशन – SSC ऑफिसर्स १२ महिन्यांच्या प्रोबेशनवर असतील.
निवडलेल्या उमेदवारांना पूर्व ज्येष्ठता ( Antedate Seniority) ६ महिने ते ३६ महिन्यांपर्यंत मिळू शकते. पूर्व ज्येष्ठतासाठीचा दावा जॉईन झाल्यापासून एक वर्षाच्या आत करावयाचा असतो.
ट्रेनिंग – SSC ग्रँट झालेल्या ऑफिसर्सना १३ आठवड्यांच्या ट्रेनिंगसाठी AMC Centre and College, लखनौ येथे पाठविले जाईल.
डिपार्टमेंटल परमनंट कमिशन ( DPC) – २ वर्षांची सर्व्हिस झालेले SSC ऑफिसर्स DPC साठी पात्र ठरतात. (जर त्यांचे वय ३० वर्षेपर्यंत ( BDS पात्रताधारक) आणि ३५ वर्षेपर्यंत ( MDS पात्रताधारक) असेल तर)
प्रमोशन्स – SSC ऑफिसर एन्ट्री लेव्हलला ‘कॅप्टन’ रँकवर असतो तो ‘मेजर’ रँकपर्यंत (नेव्ही/एअरफोर्समधील समतूल्य रँकवर) प्रमोशन ४ १/२ वर्षांच्या सर्व्हिसनंतर मिळवू शकतो आणि ११ १/२ वर्षांच्या सर्व्हिसनंतर ‘लेफ्टनंट कर्नल’ पदोन्नती मिळवू शकतो. MDS पात्रताधारक SSC ऑफिसर्सना ३६ महिन्यांची अँटीडेट सिनिऑरिटी मिळते. त्यामुळे ते १ १/२ वर्षांतच सबस्टॅटिव्ह मेजर पदावर पदोन्नतीस पात्र होतात.
वेतन – SSC ऑफिसर कॅप्टन पदावर डिफेन्स पे-मॅट्रिक्स पे-स्केल लेव्हल १०बी (रु. ६१,३००/- – १,९३,९००/-) वर तैनात केले जातात. त्यांना रु. १५,५००/- मिलिटरी सर्व्हिस पे दिला जातो.
नॉन-प्रॅक्टिसिंग अलाऊन्स ( NPA) म्हणून मूळ वेतनाच्या २० टक्के रक्कम दिली जाते. अंदाजे वेतन दरमहा रु. १,१५,०००/- अधिक इतर भत्ते दिले जातात.
अर्जाचे शुल्क – Application Processing Fee ( APF) रु. २००/-.
ऑनलाईन अर्ज www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर दि. ५ जून २०२४ पर्यंत करू शकतात. ( Notice for Army Dental Corps) अर्जासोबत उमेदवारांनी माहिती पुस्तिकेत दिल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
शंकासमाधानासाठी ई-मेल tuskers @nic. in वर संपर्क साधावा. फोन नं. ०११-२१४११०६४ (सोमवार ते शुक्रवार) (सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत).