बँक नोट पेपर मिल इंडिया प्रा.लि. ( BNPMPL), म्हैसूर. (SPMCIL – भारत सरकारचा एक उपक्रम आणि BRBNMPL – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक उपकंपनी यांचा एक संयुक्त उपक्रम) ( Employment Notification No. ०१/.२०२४ dt. ३०.०५.२०२४) BNPMIPL मध्ये ‘प्रोसेस असिस्टंट ग्रेड-१ (टेक्निकल/नॉन-टेक्निकल) (नॉन-एक्झिक्युटिव्ह कॅडर)’ पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ३९. डिसिप्लिननुसार रिक्त पदांचा तपशिल –
(I) प्रोसेस असिस्टंट ग्रेड- क टेक्निकल (नॉन-एक्झिक्युटिव्ह) – एकूण ३५ पदे.
(१) मेकॅनिकल – १० पदे (अजा – २, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).
पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि फिटर/ मशिनिस्ट/ टर्नर/ मेकॅनिक/ मशिन टूल मेंटेनन्स/ टूल अँड डायमेकर ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट ( NTC) किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(२) इलेक्ट्रिकल – ४ पदे (इमाव – १, खुला – ३). पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट (NTC) किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग डिप्लोमा किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(३) इलेक्ट्रॉनिक्स – ५ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ३).
पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक/ मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स/ मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट (NTC) किंवा इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(४) केमिकल – ६ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).
पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)/ लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लांट)/इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट) ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट (NTC) किंवा केमिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
पद क्र. १ ते ४ करिता आयटीआय पात्रताधारक उमेदवारांकडे प्रोडक्शन/ ऑपरेशन/ प्रोसेस कंट्रोल/ मॅन्युफॅक्चरिंग कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. संबंधित ट्रेडमधील अॅप्रेंटिसशिप केली असल्यास १ वर्षाचा कालावधी अनुभव म्हणून समजला जाईल.
(५) पल्प अँड पेपर – ६ पदे (अजा – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३).
पात्रता : पेपर अँड पल्प टेक्नॉलॉजी/ वुड अँड पेपर टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(६) सिव्हील – २ पदे (अज – १, खुला – १). पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि ड्राफ्ट्समन सिव्हील ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रिमधील २ वर्षांचा अनुभव किंवा सिव्हील इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(७) केमिस्ट्री – २ पदे. पात्रता – बी.एससी. (केमिस्ट्री) किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
( II) प्रोसेस असिस्टंट ग्रेड- I (नॉन-टेक्निकल) – एकूण ४ पदे.
(१) अकाऊंट असिस्टंट – २ पदे. पात्रता – बी.कॉम. किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(२) ऑफिस असिस्टंट – २ पदे. पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
सर्व पदांसाठी अजा/अजच्या उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के ची सूट.
वयोमर्यादा : १८ – २८ वर्षे (इमाव – ३१ वर्षे, अजा/अज – ३३ वर्षे, दिव्यांग – ३८ वर्षे).
पात्रता, वयोमर्यादा आणि अनुभव यासाठी कट ऑफ डेट आहे ३० जून २०२४.
वेतन : पे-लेव्हल – २, मूळ वेतन रु. २४,५००/- अधिक इतर भत्ते, अंदाजे वेतन रु. ४४,१२०/- दरमहा.
निवड पद्धती : ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट आणि ट्रेड टेस्ट/ स्किल टेस्ट. ऑनलाइन टेस्टमध्ये क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग अँड जनरल अवेअरनेस यावरील प्रत्येकी २० प्रश्न, एकूण ६० प्रश्न, वेळ ८० मिनिटे आणि प्रोफेशनल/ टेक्निकल नॉलेज/संबंधित विषयावर आधारित असे एकूण ४० प्रश्न, ४० गुणांसाठी, वेळ ४० मिनिटे. एकूण १०० प्रश्न, १०० गुण, वेळ १२० मिनिटे. नॉन-टेक्निकल अकाऊंट असिस्टंट पदासाठी अकाऊंटींग नॉर्म्स आणि ऑफिस असिस्टंट पदांसाठी इंग्लिश लँग्वेज यावरील ४० प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
अर्जाचे शुल्क : अजा/अज/दिव्यांग रु. २००/- (फक्त इंटिमेशन चार्जेस); इतर उमेदवारांसाठी रु. ६००/-. (परीक्षा शुल्क इंटिमेशन चार्जेस)
ऑनलाइन अर्ज www. bnpmindia. com या संकेतस्थळावर दि. ३० जून २०२४ पर्यंत करावेत. ( Apply online-; Registration-; Payment of fees-; scanning and uploading of documents) ( colour photograph-; Signature-; Left hand thumb impression-; hand written declaration)