ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) (डिपार्टमेंट ऑफ कन्झ्यूमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, भारत सरकार अंतर्गत वैधानिक मंडळ). BIS मुख्यालय दिल्ली आणि देशभरातील BIS ऑफिसेसमध्ये पुढील एकूण ३४७ ग्रुप-सी/बी/ए पदांची थेट भरती.

(I) ग्रुप ‘सी’मधील पदे (वेतन श्रेणी लेव्हल-४ (रु. २५,५०० – ८१,०००)) अंदाजे वेतन दरमहा रु. ५०,५००/-. वयोमर्यादा – २७ वर्षे.

(१) सिनियर सेक्रेटरिएट असिस्टंट – १२८ पदे (५ पदे दिव्यांग कॅटेगरी VI – २, HI – २, ID MI – १ साठी राखीव) (१२ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

पात्रता : पदवी (उमेदवारांना प्रत्येकी १५ मिनिटे कालावधीच्या पुढील कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट द्याव्या लागतील.) (i) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट (२००० की डिप्रेशन्स), (ii) मायक्रोसॉफ्ट Excel वरील स्प्रेड शीट टेस्ट, (iii) मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट टेस्ट.

(२) स्टेनोग्राफर – १९ पदे (१ पद दिव्यांग कॅटेगरी VI साठी राखीव) (१ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

पात्रता : पदवी (उमेदवारांना (i) नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कमधील लेव्हल-५ पर्यंतची कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट आणि (ii) शॉर्ट हँड टेस्ट (इंग्लिश/ हिंदी शॉर्टहँड) ८० श.प्र.मि. वेगाने (ट्रान्सक्रिप्शनसाठी इंग्लिशकरिता ५० मिनिटे व हिंदीकरिता ६५ मिनिटे) द्यावी लागेल. (परवानगी योग्य चुका (permissible mistakes ५ टक्के)) जर पुरेसे उमेदवार उत्तीर्ण न झाल्यास ही अट १० टक्के पर्यंत शिथिल केली जाईल.

(३) सिनियर टेक्निशियन – १८ पदे (१ पद दिव्यांग कॅटेगरी HI साठी राखीव) (१ पद माजी सैनिकांसाठी राखीव).

(i) कारपेंटर – ७ पदे.

(ii) वेल्डर – १ पद (खुला).

(iii) प्लंबर – २ पदे.

(iv) फिटर – ५ पदे .

(vi) इलेक्ट्रिशियन/ वायरमन – ३ पदे.

पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण, (ii) संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट (वेल्डर पदासाठी उमेदवारांनी इंडियन स्टँडर्ड्सप्रमाणे वेल्डर्स क्वालिफाईंग टेस्ट उत्तीर्ण केलेली असावी.) (iii) २ वर्षांचा संबंधित ट्रेडमधील कामाचा अनुभव किंवा संबंधित ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट.

(II) ग्रुप ‘सी’मधील पद (वेतन श्रेणी लेव्हल-२ (रु. १९,९०० – ६३,२००)) अंदाजे वेतन दरमहा रु. ३७,०००/-. वयोमर्यादा – २७ वर्षे.

(४) ज्यु. सेक्रेटरिएट असिस्टंट – ७८ पदे (२ पदे दिव्यांग कॅटेगरी HI, IDMI साठी प्रत्येकी १ पद राखीव) (७ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

पात्रता : (i) पदवी उत्तीर्ण, (ii) कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट (पात्रता स्वरूपाची), (iii) कॉम्प्युटरवरील टायपिंग स्पीड टेस्ट – इंग्लिश ३५ श.प्र.मि. (१०५० KDPH) किंवा हिंदी ३० श.प्र.मि. (९००० KDPH).

(५) टेक्निशियन – १ पद (खुला).

पात्रता – (i) १० वी उत्तीर्ण, (ii) इलेक्ट्रिशियन/ वायरमन ट्रेडमधील आयटीआय किंवा नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट.

(III) ग्रुप ‘बी’मधील पदे (वेतन श्रेणी लेव्हल-६ (रु. ३५,४०० – १,१२,४००)) अंदाजे वेतन दरमहा रु. ६८,०००/-. वयोमर्यादा – ३० वर्षे.

(६) पर्सोनल असिस्टंट – २७ पदे (२ पदे दिव्यांग कॅटेगरी VI/ HI साठी प्रत्येकी १ पद राखीव).

पात्रता : पदवी उत्तीर्ण (उमेदवारांना (i) नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कमधील लेव्हल-६ पर्यंतची कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट आणि (ii) शॉर्ट हँड टेस्ट (हिंदी किंवा इंग्लिश) (डिक्टेशन १०० श.प्र.मि. ट्रान्सक्रिप्शन – इंग्रजी – ४५ मिनिटे/हिंदी – ६० मिनिटे) द्यावी लागेल. (परवानगीयोग्य चुका ५ टक्के, पुरेसे उमेदवार उत्तीर्ण न झाल्यास ही अट १० टक्के पर्यंत शिथिल केली जाईल.)

(७) असिस्टंट सेक्शन ऑफिसर – ४३ पदे.

पात्रता : पदवी उत्तीर्ण (उमेदवारांना (i) नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कमधील लेव्हल-६ पर्यंतची कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट (पात्रता स्वरूपाची) आणि (ii) कॉम्प्युटर प्रोफिशियन्सीमधील क्वालिफाईंग स्किल टेस्ट द्यावी लागेल.)

(८) असिस्टंट (कॉम्प्युटर एडेड डिझाईन) १ पद (खुला).

पात्रता : विज्ञान शाखेतील पदवी आणि ५ वर्षांचा Auto CAD मधील अनुभव आणि टायपोग्राफीचे कामचलाऊ ज्ञान किंवा संबंधित डिसिप्लिनमधील ड्राफ्ट्समनशिप किंवा सिव्हील/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा आणि AutoCAD मधील ५ वर्षांचा अनुभव व संबंधित डिसिप्लिनमधील ड्राफ्ट्समनशिप.

(९) टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी) – २७ पदे .

(i) मेकॅनिकल – १३ पदे.

पात्रता – मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान ६० टक्के गुण.

(ii) केमिकल – १२ पदे .

पात्रता – बी.एस्सी. (केमिस्ट्री) किमान ६० टक्के गुण.

(iii) मायक्रोबायोलॉजी – २ पदे (खुला).

पात्रता : बी.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी) किमान ६० टक्के गुण. (IV) ग्रुप ‘ए’मधील पदे (वेतन श्रेणी लेव्हल-१० (रु. ५६,१०० – १,७७,५००)) अंदाजे वेतन दरमहा रु. १,१०,०००/-. वयोमर्यादा – ३५ वर्षे.

(१०) असिस्टंट डायरेक्टर (अॅडमिनिस्ट्रेशन अँड फिनान्स) १ पद (ईडब्ल्यूएस) (३ वर्षांचा अनुभव आवश्यक).

(११) असिस्टंट डायरेक्टर (माकेटिंग अँड कन्झ्युमर अफेअर्स) १ (इमाव).

(१२) असिस्टंट डायरेक्टर (हिंदी) १ पद (खुला).

पात्रता : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि संबंधित कामाचा (शासकीय/ निमशासकीय/ स्वायत्त संस्थेमधील) ५ वर्षांचा/ ३ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादेत सूट : इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/ १३/ १५ वर्षे. ग्रुप ‘सी’ पदांसाठी विधवा/ घटस्फोटीत/ कायद्याने विभक्त महिलांसाठी वयोमर्यादा – ३५ वर्षे. (खुला/ ईडब्ल्यूएस्) आणि ४० वर्षे (अजा/ अज))

निवड पद्धती : पद क्र. १ ते ८ साठी ऑनलाइन परीक्षा आणि स्किल टेस्ट, पद क्र. १० ते १२ साठी ऑनलाइन परीक्षा आणि इंटरह्यू. सर्व पदांसाठी ऑनलाइन परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह टाईप १५० प्रश्न, १५० गुण, वेळ १२० मिनिटे) अंदाजे नोव्हेंबर २०२४ मध्ये होईल. चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.

परीक्षा केंद्र : मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे/ MMR, नाशिक, पुणे, नागपूर, छ. संभाजी नगर, पणजी इ.

ऑनलाइन परीक्षा स्किल टेस्टसाठीची सूचना उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर्ड ई-मेल आणि/ किंवा एसएमएसद्वारे मोबाइलवर दिली जाईल. BIS वेबसाईट www. bis. gov. in वरून कॉललेटर डाऊनलोड करता येतील.

अर्जाचे शुल्क : ग्रुप ‘ए’ पदांसाठी (पद क्र. १० ते १२ साठी) रु. ८००/-, इतर पदांसाठी रु. ५००/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला उमेदवारांना अर्जाचे शुल्क माफ आहे.) माजी सैनिकांसाठी फक्त ग्रुप ‘सी’च्या पदांसाठी (पद क्र. १ ते ५ साठी) फी माफ आहे.

ऑनलाईन अर्ज www. bis. gov. in या संकेतस्थळावर दि. ९ सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ (००.०० वाजे)पर्यंत करता येतील. (अ) अॅप्लिकेशन रजिस्ट्रेशन, (ब) पेमेंट ऑफ फी, (क) डॉक्युमेंट स्कॅन अँड अपलोड, ((i) रंगीत फोटोग्राफ ४.५ x ३.५ सें.मी., (ii) स्वाक्षरी (फक्त काळ्या शाईमध्ये केलेली), (iii) डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी (impression) (काळ्या किंवा निळ्या शाईमधील), (iv) स्व-हस्ताक्षरात लिहिलेले घोषणा पत्र (Declaration)).