सुहास पाटील
सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) मध्ये ‘काँस्टेबल/ फायर (पुरुष)’च्या एकूण १,१३० पदांची भरती. राज्य/ केंद्रशासित प्रदेशनिहाय रिक्त पदांचे वाटप केलेले आहे. महाराष्ट्र राज्यासाठी एकूण रिक्त पदे – ७२. पूर्ण राज्याकरिता एकूण ६१ पदे (अजा – ६, अज – ६, इमाव – १६, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २७) आणि नक्षल/ मिलिटन्सी एरिया (गडचिरोली आणि गोंदिया जिल्हे) एकूण ११ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५) उमेदवारांनी डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक.

पात्रता : (दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी) १२ वी (विज्ञान) विषयांसह किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा : (दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी) १८२३ वर्षे. (उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर २००१ ते ३० सप्टेंबर २००६ दरम्यानचा असावा.)

कमाल वयोमर्यादेत सूट (इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, माजी सैनिक – सेनादलातील सेवा ३ वर्षे)

वेतन श्रेणी : पे-लेव्हल – ३ (रु. २१,७०० – ६९,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४३,८००/-.

निवड पद्धती : शारीरिक क्षमता चाचणी (PET), शारीरिक मापदंड चाचणी (PST), कागदपत्र पडताळणी (DV), लेखी परीक्षा आणि वैद्याकीय तपासणी यांचा समावेश असेल.

(I) शारीरिक क्षमता चाचणी ( PET)/शारीरिक मापदंड चाचणी (PST)/ कागदपत्र पडताळणी (DV) –

ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना रोल नंबर दिला जाईल आणि त्यांना विविध केंद्रांवर घेतल्या जाणाऱया PET/ PST/ DV साठी अॅडमिट कार्ड जारी केले जाईल. हाईट बार टेस्टमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांना PET मधील धावण्याची टेस्ट द्यावी लागेल. त्यानंतर PST पूर्वी त्यांचे बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन केले जाईल. (डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा ( LTI)/उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा ( RTI)/बोटांचे ठसे) माजी सैनिकांना PET द्यावी लागणार नाही.

(अ) PET – ५ कि.मी. अंतर २४ मिनिटांत धावून पूर्ण करणे.

(ब) PST – ( i) उंची १७० सें.मी. (आदिवासी ( Tribal) उमेदवारांसाठी १६२.५ सें.मी.), ( ii) छाती ८०-८५ सें.मी. (आदिवासी उमेदवारांसाठी ७७-८२ सें.मी.)

अनुसूचित जमाती (आदिवासी) उमेदवारांना जातीचा दाखला ( Annexure- III) सादर करावा लागेल.

वजन : उंची आणि वय यांच्या प्रमाणात (वैद्याकीय मानांकानुसार) असावे.

PET आणि PST फक्त पात्रता स्वरूपाच्या असतील.

(क) कागदपत्र पडताळणी (DV) : ( I) लेखी परीक्षा ( OMR/ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) मोड) ऑब्जेक्टिव्ह टाईप १०० प्रश्न, १०० गुणांसाठी, वेळ १२० मिनिटे. (ए) जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, (बी) जनरल नॉलेज अँड अवेअरनेस, (सी) इलेमेंटरी मॅथेमॅटिक्स, (डी) इंग्लिश/ हिंदी प्रत्येकी २५ प्रश्न. परीक्षेचे माध्यम हिंदी/इंग्लिश. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. प्रश्नांची काठीण पातळी १२ वीच्या स्तरावरील असेल. परीक्षेची तारीख उमेदवारांना CISF वेबसाईटX https:// cisfrectt. cisf. gov. in वरून कळविण्यात येईल.

लेखी परीक्षेनंतर उत्तरतालिका ( Answer Keys) CISF च्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जातील. याबाबत काही हरकती असल्यास प्रत्येक प्रश्नास रु. १००/- भरून उमेदवार त्या CISF च्या वेबसाईटवर मांडू शकतात. उमेदवारांनी नोंदलेल्या हरकतींची छाननी करून उत्तरतालिकांना अंतिम रूप दिले जाईल.

PET/ PST/ DV आणि लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन (DME) साठी (रिक्त पदांच्या दुप्पट उमेदवार) निवडले जातील.

मेरिट लिस्ट : PET/ PST/ DV/ लेखी परीक्षा/ DME मधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची राज्य आणि कॅटेगरीनिहाय गुणवत्ता यादी लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार बनविलेली गुणवत्ता यादी CISF च्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.

परीक्षा शुल्क : रु. १००/-. (अजा/अज/माजी सैनिक (आरक्षणासाठी पात्र असलेले) यांना फी माफ आहे.)

अर्जासोबत ही जाहिरात प्रसिद्ध झाल्या दिवसापासून ३ महिन्यांच्या आत काढलेला रंगीत फोटोग्राफ (ज्यावर फोटो काढल्याची तारीख दर्शविली असेल), स्वाक्षरी (सिग्नेचर) आणि १० उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि १२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक.

परीक्षेच्या ठिकाणी येताना उमेदवारांनी तसेच तीन रंगीत फोटोग्राफ आणि फोटो आयडेंटिटी (ID) प्रूफ (जसे की आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत आणणे आवश्यक.

PET/ PST/ DV, लेखी परीक्षा आणि DME/ RME साठीचे ई-अॅडमिट कार्ड CISF च्या वेबसाईटवर अपलोड केले जातील. ते त्यांनी डाऊनलोड करून घ्यावीत.

शंकासमाधानासाठी हेल्पलाईन नंबर ०११-२४३६६४३१/ २४३०७९३३ वर १०.०० ते १८.०० वाजे दरम्यान संपर्क साधावा.

निवड प्रक्रियेच्या वेगवेगळ्या स्तरांवर उमेदवारांनी २-३ दिवस राहण्याच्या तयारीने यावे. ऑनलाईन अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती वेबसाईटवरील जाहिरातीमधील Annexure- I आणि Annexure- II मध्ये दिलेली आहे.

ऑनलाइन अर्ज CISF वेबसाईट https:// cisfrectt. cisf. gov. in वर दि. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत करावेत. (अर्जामध्ये उमेदवाराने आपले नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख, १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र दाखविल्याप्रमाणे लिहिणे अनिवार्य आहे.)