इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) (भारत सरकारचा उपक्रम) (रिफायनरीज आणि पाईप लाईन्स डिव्हीजन)मध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांची भरती.
(I) IOCL पाईप लाईन्स डिव्हीजनच्या देशभरातील लोकेशन्समध्ये पुढील ५०० नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांची भरती.
२०२) इंजिनीअरिंग असिस्टंट (मेकॅनिकल) ग्रेड- IV (मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल) – ८ पदे (गुजरात ५ पदे) (१ पद दिव्यांगसाठी राखीव).
२०१) इंजिनीअरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) ग्रेड- IV (इलेक्ट्रिकशल/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स) – १५ पदे (गुजरात ६ पदे, महाराष्ट्र – १).
२०३) इंजिनीअरिंग असिस्टंट (T & I) ग्रेड- IV (इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन अँड Allied disciplines) – १५ पदे (गुजरात ६ पदे).
पद क्र. २०१ ते २०३ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान ५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/ दिव्यांग – ४५ टक्के गुण)
४०१) टेक्निकल अटेंडंट- I ग्रेड- I – २९ पदे (गुजरात – १२ पदे).
पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियन/ फिटर/ टर्नर/ वायरमन/ मेकॅनिक डिझेल/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक इ. ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट.
(II) IOCL रिफायनरी डिव्हीजन्सच्या गुजरात, मथूरा, पानिपत, पॅरादिप इ. रिफायनरीजमध्ये पुढील एकूण भरती. (पद क्र. २०४ ते २०६ साठी महिला उमेदवारांचा विचार केला जाईल.)
२०१) ज्यु. इंजिनीअरिंग असिस्टंट- IV (प्रोडक्शन) – १९८ पदे (गुजरात – ४०).
पात्रता : (दि. ३१ जुलै २०२४ रोजी) केमिकल/ पेट्रोकेमिकल/ रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा इ. रू. (मॅथ्स/ फिजिक्स/ केमिस्ट्री किंवा इंडस्ट्रियल केमिस्ट्री).
२०२) ज्यु. इंजिनीअरिंग असिस्टंट- IV (P & U) – ३३ पदे (गुजरात – ३).
पात्रता : मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा फिटर ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट किंवा B.Sc. (मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा इंडस्ट्रियल केमिस्ट्री) आणि सेकंड क्लास बॉयलर कॉम्पिटन्सी सर्टिफिकेट किंवा समतूल्य बॉयलर अटेंडंट ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट.
२०३) ज्यु. इंजिनीअरिंग असिस्टंट- IV (P & U – O & M) – २२ पदे (पानिपत – १६, पॅरादिप – ६).
२०४) ज्यु. इंजिनीअरिंग असिस्टंट- IV (इलेक्ट्रिकल)/ ज्यु. टेक्निकल असिस्टंट- IV – २५ पदे.
पद क्र. २०३ व २०४ साठी पात्रता – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा.
२०५) ज्यु. इंजिनीअरिंग असिस्टंट- IV (मेकॅनिकल)/ ज्यु. टेक्निकल असिस्टंट- IV – ५० पदे (गुजरात – १२) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी PL- OH- OA/ OL).
पात्रता : मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा फिटर ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट.
२०६) ज्यु. इंजिनीअरिंग असिस्टंट- IV (इन्स्ट्रूमेंटेशन)/ ज्यु. टेक्निकल असिस्टंट- IV – २४ पदे (गुजरात – ३) (२ पद दिव्यांग कॅटेगरी PH- HH साठी राखीव).
पात्रता : इन्स्ट्रूमेंटेशन अँड अलाईड इंजिनीअरिंग डिप्लोमा.
२०७) ज्यु. क्वालिटी कंट्रोल अॅनालिस्ट- IV – २१ पदे (गुजरात – २ – दिव्यांग कॅटेगरी १ – PV- VH आणि १ – MD साठी राखीव) (१ पद दिव्यांग कॅटेगरी PH- HH साठी राखीव).
पात्रता : B.Sc. (फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री/ इंडस्ट्रियल केमिस्ट्री).
२०८) ज्यु. इंजिनीअरिंग असिस्टंट- IV (फायर अँड सेफ्टी) – २७ पदे (गुजरात – ६).
पात्रता : १० वी आणि NFSC नागपूरकडील सब-ऑफिसर कोर्स किंवा समतूल्य पात्रता आणि अवजड वाहन (HMV) चालविण्याचा परवाना.
शारीरिक मापदंड : उंची – १६५ सें.मी. (अनुसूचित जमाती – १६० सें.मी.); छाती – ८१-८६ सें.मी.; वजन – ५० कि.ग्रॅ.; दृष्टी – चांगला डोळा – ६/६, खराब डोळा – ६/१२; रंगांधळेपण/ रातांधळेपण नसावे.
सर्व पदांसाठी उमेदवारांना डिप्लोमा/ B.Sc. मध्ये सरासरी किमान ५० टक्के गुण आवश्यक. (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना ४५ टक्के गुण आवश्यक.)
अनुभव : रिफायनरीमधील सर्व पदांसाठी (पद क्र. २०२ ज्यु. इंजिनीअरिंग असिस्टंट- IV (P & U) पद वगळता) संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
पाईपलाईन्स डिव्हिजन्समधील पदांसाठी अनुभव आवश्यक नाही.
वयोमर्यादा : दि. ३१ जुलै २०२४ रोजी १८ ते २६ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/ १३/ १५ वर्षे) संबंधित कामाचा अनुभव असल्यास कमाल वयोमर्यादेमध्ये १ वर्षाची सूट देण्यात येईल. बॉयलर कॉम्पिटन्सी सर्टिफिकेट धारण करणाऱया उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत २ वर्षांची सूट देण्यात येईल.
वेतन श्रेणी : इंजिनीअरिंग असिस्टंट/ ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट पदांसाठी रु. २५,००० – १,०५,०००; पद क्र. ४०१ टेक्निकल अटेंडंट- I पदांसाठी रु. २३,००० – ७८,०००/-.
निवड पद्धती : लेखी परीक्षा – कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) आणि स्किल/ प्रोफिशिअन्सी/फिजिकल टेस्ट (SPPT).
लेखी परीक्षा – सप्टेंबर २०२४ मध्ये घेतली जाईल. ऑब्जेक्टिव्ह टाईप १०० प्रश्न प्रत्येकी १ गुणासाठी एकूण १०० गुण, वेळ १२० मिनिटे. (७५ प्रश्न संबंधित विषयावर आधारित) आणि १५ प्रश्न (न्यूमरिकल अॅबिलिटी आणि १० प्रश्न जनरल अवेअरनेस यावर आधारित).
चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार SPPT साठी निवडले जातील. जी फक्त पात्रता स्वरूपाची असेल. SPPT मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी बनविली जाईल.
प्री-एम्प्लॉयमेंट मेडिकल फिटनेस मध्ये फिट ठरलेल्या उमेदवारांना नेमणूक दिली जाईल.
कागदपत्र पडताळणी : ऑनलाइन अर्जासोबत वय, शैक्षणिक अर्हता, कॅटेगरी इ. च्या पुराव्यासाठीची कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत. कागदपत्र पडताळणी रढढळ पूर्वी केली जाईल.
अर्जाचे शुल्क : रु. ३/-. (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.)
विस्तृत जाहिरात www. iocl. com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अॅडमिट कार्ड IOCL च्या रिक्रूटमेंट पोर्टलवर दि. १० सप्टेंबर २०२४ पासून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील.
शंकासमाधानासाठी हेल्प डेस्क नं. ९५१३६३१७१३ (१०.०० ते १७.०० वाजे दरम्यान कार्यालयीन दिवशी).
ऑनलाइन अर्ज www. iocl. com या वेबसाईटवर दि. २१ ऑगस्ट २०२४ (२३.५५ वाजे) पर्यंत करावेत. (रंगीत फोटोग्राफ (20-50 KB JPG Format) आणि स्वाक्षरी (काळ्या रंगाच्या शाईने केलेली) (10-20 KB JPG Format)) मध्ये स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक.
अॅप्रेंटिसेसची भरती
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), मार्केटिंग डिव्हिजन, चेन्नई. (Advt. No. IOCL/ MKTG/ APPR/ २०२४-२५) सदर्न रिजनमधील कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा इ. व देशभरातील IOCL च्या लोकेशन्समध्ये अॅप्रेंटिसेसच्या एकूण ४०० पदांची भरती.
(१) ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस – पात्रता : (दि. ३१ जुलै २०२४ रोजी) B.A./ B.B.A./ B.Com./ B.Sc. पदवी किमान सरासरी ५० टक्के गुण (अजा/ अज /दिव्यांग – ४५ टक्के गुण) उत्तीर्ण. एकूण – ४०० पदे. आंध्र प्रदेश – ३०, कर्नाटक – १५, तेलंगणा – ३०, तमिळनाडू – ८५, केरळ – ४०.
(२) टेक्निशियन अॅप्रेंटिस – एकूण – १५ पदे. (कर्नाटक – १५, आंध्र प्रदेश – २, तेलंगणा – २, केरळ – ३, तमिळनाडू आणि पुदूचेरी – २०).
(i) मेकॅनिकल, (ii) इलेक्ट्रिकल, (iii) इन्स्ट्रूमेंटेशन, (iv) सिव्हील, (v) इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, (vi) इलेक्ट्रॉनिक्स.
पात्रता : संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान सरासरी ५० टक्के गुण. (अजा/ अज/ दिव्यांग – ४५ टक्के गुण)
(३) ट्रेड अॅप्रेंटिस – एकूण – ९५ पदे. (कर्नाटक – ७, आंध्र प्रदेश – ३, तेलंगणा – ३, केरळ – २, तमिळनाडू आणि पुदूचेरी – ८). (i) फिटर, (ii) इलेक्ट्रिशियन, (iii) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, (iv) इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, (v) मशिनिस्ट.
पात्रता : संबंधित ट्रेडमधील NCVT/ SCVT मान्यताप्राप्त आयटीआय सर्टिफिकेट.
उमेदवारांनी पात्रता परीक्षा ३१ जुलै २०२१ नंतर उत्तीर्ण केलेली असावी.
उच्च अर्हतेचे शिक्षण घेणारे/ प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
वयोमर्यादा : दि. ३१ जुलै २०२४ रोजी १८ ते २४ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; दिव्यांग – १०/ १३/ १५ वर्षे)
अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी : (सर्व अॅप्रेंटिसेससाठी) १२ महिने. अॅप्रेंटिसेसना नियमानुसार स्टायपेंड दरमहा दिले जाईल. स्टायपेंडमधील ५० टक्के रक्कम बोर्ड ऑफ अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग (BOAT) यांचेमार्फत आणि ५० टक्के रक्कम IOCL मार्फत दिली जाईल. इडअळ मार्फत स्टायपेंड उमेदवाराच्या आधारकार्ड लिंक्ड् बँक अकाऊंटमध्ये जमा केली जाईल.
निवड पद्धती : ऑनलाइन पद्धतीने लेखी परीक्षा १०० गुणांसाठी, MCQ ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न.
ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस पदासाठी जेनरिक अॅप्टिट्यूड (क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूडसह) – रिझनिंग अॅबिलिटी; बेसिक इंग्लिश लँग्वेज स्किल्स.
इतर पदांसाठी – टेक्निकल नॉलेज (संबंधित डिसिप्लिनवर आधारित) जनरिक अॅप्टिट्यूड (क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूडसह); रिझनिंग अॅबिलिटी, बेसिक इंग्लिश लँग्वेज स्किल्स.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित राज्यातील बोर्डाकडे आपले नाव रजिस्टर करून एन्रोलमेंट नंबर मिळवावा.
ट्रेड अॅप्रेंटिसेस (आयटीआय) पदांसाठी – रिजनल डायरेक्टोरेट ऑफ अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग (RDAT) http:// apprenticeshipindia. org/ candidate- registration
टेक्निशियन अॅप्रंटिस आणि ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस पदांसाठी – https:// nats. education. gov. in/ student_ register. php
ऑनलाइन अर्ज https:// www. iocl. com/ apprenticeships या संकेतस्थळावर दि. १९ ऑगस्ट २०२४ (२३.५५ वाजे)पर्यंत करावेत.
अर्जासोबत (१) १० वीचे प्रमाणपत्र, (२) शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र व गुणपत्रक (आयटीआय/ डिप्लोमा/ पदवी) लागू असेल ते, (३) विहीत नमुन्यातील जातीचा दाखला (लागू असल्यास), (५) अपंगत्वाचा दाखला (लागू असल्यास), (६) जात वैधता प्रमाणपत्र (महाराष्ट्रासाठी लागू आहे.), (७) विहीत नमुन्यातील ईडब्ल्यूएस दाखला, (८) बँकेचा रद्द केलेला चेक किंवा बँक पासबुकचे पहिले पान, (९) पॅनकार्ड (या कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकीत प्रती pdf/ jpg format size 200 KB पर्यंत), (१०) काळ्या शाईने केलेली स्वाक्षरी (फाईल साईज 50 KB पर्यंत), (११) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटोग्राफ (फाईल साईज 50 KBपर्यंत) (स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत).