इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP), गृह मंत्रालय, भारत सरकार. पुरुष व महिला उमेदवारांची ‘कॉन्स्टेबल (अॅनिमल ट्रान्सपोर्ट/ हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर वेटेरिनरी), कॉन्स्टेबल (केनेलमॅन))’ च्या एकूण १२८ पदांवर भरती.

(१) कॉन्स्टेबल (अॅनिमल ट्रान्सपोर्ट) –११५ पदे पुरुष – ९७ पदे .

Career mantra UPSC exam science NCERT
करिअर मंत्र
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
mpsc Mantra Social Geography Civil Services Main Exam
mpsc मंत्र: सामाजिक भूगोल; राज्यसेवा मुख्य परीक्षा
Success Story of Dr Akram Ahmad
Success Story : इच्छा तेथे मार्ग! सहा लाख रुपयांची नोकरी सोडून शेतकऱ्याच्या मुलानं गाठलं परदेश; वाचा मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअप लाँच करणाऱ्याची यशोगाथा
Director Called Me Daughter and Raped said Actress
Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती
3rd September Panchang & Marathi Rashi Bhavishya
३ सप्टेंबर पंचाग: मंगळवारी १२ पैकी ‘या’ राशींसाठी जोडीदाराचा सल्ला ठरेल मोलाचा; आर्थिक बाजू, कौटुंबिक सुख तर कामात मिळेल यश; वाचा तुमचे भविष्य
4th September Panchang & Marathi Rashi Bhavishya
४ सप्टेंबर पंचांग: बुधाच्या राशी परिवर्तनामुळे कोणाला होईल लाभ? अडकलेले पैसे मिळतील तर ‘या’ राशींवर होईल सुखाचा वर्षाव
2nd September Panchang & Marathi Rashi Bhavishya
२ सप्टेंबर पंचांग: श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी कोणाचं भाग्य उजळणार? शिवयोग १२ पैकी ‘या’ पाच राशींच्या नशिबात प्रेम, धन, सुख देणार; वाचा तुमचे भविष्य

(२) कॉन्स्टेबल (Kennelman) – ४ पदे.

पद क्र. १ व २ साठी वेतन श्रेणी – लेव्हल-३ (रु. २१,७०० – ६९,१००) मूळ वेतन रु. २१,५००/- + महागाई भत्ता रु. १०,८५०/-. पद क्र. ३ साठी पे-लेव्हल – ४ (रु. २५,५०० – ८१,१००) मूळ वेतन रु. २५,५००/- + महागाई भत्ता रु. १२,७५०/-. याशिवाय रेशन मनी, स्पेशल कॉम्पेन्सेटरी अलाऊन्स, मोफत निवास अथवा एचआरए. ट्रान्सपोर्ट अलाऊन्स. एलटीसी, मोफत वैद्याकीय सुविधा इ. तसेच उमेदवारांना ‘ New Restructured Defined Contributory Pension Scheme’ (नवीन पेंशन स्कीम) लागू असेल. पात्रता : (१८ ऑगस्ट २०२४ रोजी) १० वी उत्तीर्ण.

(३) हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर वेटेरिनरी) – ९ पदे. पुरुष – ८ पदे (अजा – १, इमाव – ३, खुला – ४); महिला – १ पद (खुला).

पात्रता : (i) १२ वी, (ii) किमान १ वर्ष कालावधीचा पॅरा वेटेरिनरी कोर्स किंवा वेटेरिनरी डिप्लोमा किंवा (iii) वेटेरिनरीशी संबंधित उपचारात्मक किंवा लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट डिप्लोमा. १० टक्के पदे माजी सैनिकांसाठी राखीव आहेत.

वयोमर्यादा : (दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी) पद क्र. १ व २ साठी १८ ते २५ वर्षे, पद क्र. ३ साठी १८ ते २७ वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे).

शारीरिक मापदंड : उंची – पुरुष – १७ सें.मी., महिला – १५७ सें.मी. छाती – पुरुष – ८०८५ सें.मी. दृष्टी – जवळची दृष्टी (चष्म्याशिवाय) चांगला डोळा एन-६, खराब डोळा एन-९; दूरची दृष्टी (चष्म्याशिवाय) चांगला डोळा ६/६, खराब डोळा ६/९.

निवड पद्धती : PET/ PST च्यावेळी उमेदवारांची बायोमेट्रिक ओळख पटविली जाईल. फेज-१ – शारीरिक क्षमता चाचणी (PET) (फक्त पात्रता स्वरूपाची) पुरुष – १.६ कि.मी. अंतर ७.३० मिनिटांत धावणे, लांब उडी – ११ फूट, उंच उडी – ३१/२ फूट.

महिला – ८०० मीटर अंतर ४.४५ मिनिटांत धावणे; लांब उडी – ९ फूट, उंच उडी – ३ फूट. लांब उडी आणि उंच उडीसाठी ३ प्रयत्न दिले जातील.

शारीरिक मापदंड चाचणी (PST) : पुरुष उमेदवारांची उंची, वजन आणि छाती मोजली जाईल. महिला उमेदवारांची उंची आणि वजन मोजले जाईल. उमेदवार अपात्र ठरल्यास त्याचदिवशी अपिल करू शकतात.

पद क्र. १ साठी फेज-२ लेखी परीक्षा (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे) १०० प्रश्न/ १०० गुण, वेळ १२० मिनिटे. (जनरल इंग्लिश, जनरल हिंदी) (१) जनरल नॉलेज – २५ प्रश्न, (२) प्राथमिक अंकगणिताचे ज्ञान – २५ प्रश्न, (३) अॅनालायटिकल अॅप्टिट्यूड अँड अॅबिलिटी टू ऑब्जर्व्ह अँड डिस्टींग्वीश पॅटर्न्स – २५ प्रश्न, (४) इंग्लिश किंवा हिंदीचे ज्ञान – २५ प्रश्न.

पद क्र. २ व ३ साठी फेज-२ – लेखी परीक्षा १०० ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न १०० गुण, वेळ २ तास. (जनरल अवेअरनेस – ५ प्रश्न, क्वांटिटेटिव्ह/रिझनिंग – ५ प्रश्न, जनरल इंग्लिश/हिंदी – १० प्रश्न आणि संबंधित विषयावर आधारित ८० प्रश्न) (कॉन्स्टेबल (खहहात्सह) पदांसाठी Dog Handling आणि Kennel Management वर आधारित; हेड कॉन्स्टेबल (ड्रेस वेटेरिनरी) पदांसाठी वेटेरिनरी मेडिसिन आणि ट्रिटमेंट यावर आधारित) (चुकीच्या उत्तरासांठी गुण वजा केले जाणार नाहीत.) उत्तरतालिका (Answer Key) लेखी परीक्षा पूर्ण झाल्यावर (ITBP च्या https:// recruitment. itbpolice. nic. in या संकेतस्थळावर) अपलोड केल्या जातील. फेज-३ – लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी रिक्त पदांच्या १० पट उमेदवार ५० गुणांच्या ट्रेड टेस्टसाठी बोलाविले जातील. ट्रेड टेस्ट निकष संबंधित जाहिरातीमध्ये दिलेले आहेत.

फेज-४ – कागदपत्र पडताळणी – लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार कॅटेगरीनिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. कागदपत्र पडताळणीनंतर डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन (DME) होईल. अपात्र ठरल्यास रिह्यू मेडिकल एक्झामिनेशन (RME) २४ तासांच्या आत मागता येईल.

PET/ PST, लेखी परीक्षासाठी अॅडमिट कार्ड ऑनलाइन https:// recruitment. itbpolice. nic. in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.

शंकासमाधानासाठी हेल्पलाईन नंबर – ०११-२४३६९४८२/२४३६९४८३, ई-मेल आयडी – comdtrect@itbp. gov. in

अर्जाचे शुल्क : रु. १००/- (खुला, इमाव, ईडब्ल्यूएसचे पुरुष उमेदवारांसाठी). अजा/ अज/ महिला/ माजी सैनिक यांना अर्जाचे शुल्क माफ आहे. ऑनलाइन अर्ज https:// recruitment. itbpolice. nic. in या संकेतस्थळावर दि. १० सप्टेंबर २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील संधि

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), सामान्य प्रशासन विभाग (जाहिरात क्र. MPR/७८१४ dt. १४.०८.२०२४). बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थानेवरील गट-क मधील ‘कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम लिपिक)’ पदांची सरळसेवा भरती. एकूण रिक्त पदे – १८४६.

पदाचे नाव : कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम लिपिक) – (वर्ग-क) – १८४६ पदे.

दिव्यांग उमेदवारांसाठी ४ टक्के जागा राखीव.

पात्रता : (दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी) (i) १० वीची परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण. (ii) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला/ विज्ञान/ वाणिज्य/ विधी किंवा तत्सम पदवी प्रथम प्रयत्नात किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. ज्या विद्यापीठांमध्ये ग्रेडींग सिस्टीमने गुण दर्शविले जातात, त्यांच्या गुणांची टक्केवारी पुढीलप्रमाणे काढली जाईल. (अ) 7 point grading system साठी सर्व विषयांच्या गुणांची एकत्रित टक्केवारी गणण्यात येईल. (ब) 10 point grading system साठी टक्केवारी = 7.1 into CGPA (Cumulative Grade Point Average) ११ (टक्केवारीची गणना वरील सूचनांप्रमाणे अपूर्णांकात आल्यास पुढील पूर्णांकात गणण्यात येईल.) (iii) उमेदवार इ. १० वीची माध्यमिक शालांत परीक्षा १०० गुणांचा मराठी व १०० गुणांचा इंग्रजी विषय घेवून उत्तीर्ण असावा. (iv) मराठी व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि. वेगाची शासनाचे प्रमाणपत्र. (v) संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम; वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इ. विषयी उत्तम ज्ञान. १५ वर्षे सैनिकी सेवा झालेले माजी सैनिक जे १० वी उत्तीर्ण असतील किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्रधारक असतील ते या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा : दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण. अमागास – ३८ वर्षेपर्यंत; मागासवर्गीय/ खेळाडू/ अनाथ/ आदुघ – ४३ वर्षेपर्यंत; दिव्यांग/ भूकंपग्रस्त/ प्रकल्पग्रस्त/ स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य – ४५ वर्षेपर्यंत; अंशकालीन – ५५ वर्षेपर्यंत; माजी सैनिक – सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी ३ वर्षे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादेची अट नाही. तथापि त्यांनी खाते प्रमुखाचे अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करणे अनिवार्य राहील.

निवड पद्धती : बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाचा राहील, परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इ. १२ वी) समान राहील. (१) मराठी भाषा व व्याकरण, (२) इंग्रजी भाषा व व्याकरण, (३) सामान्य ज्ञान, (४) बौद्धिक चाचणी प्रत्येकी २५ प्रश्न. प्रत्येक प्रश्नास २ गुण, एकूण १०० प्रश्न, २०० गुण, वेळ १०० मिनिटे. उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक.

इंग्रजी भाषा व व्याकरण ही ऑनलाइन परीक्षा इंग्रजी भाषेतून तसेच मराठी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांची परीक्षा मराठी भाषेतून घेतली जाईल. मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही. अंतिम निवड ऑनलाइन लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल. निवड यादी https:// portal. mcgm. gov. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

ऑनलाइन परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – रु. १,०००/-; मागासवर्गीय – रु. ९००/- ऑनलाइन मोडने भरता येतील.

ऑनलाइन अर्ज https:// portal. mcgm. gov. in/ for prospects/ Careers- AII/ Recruitment/ chief personal officer या संकेतस्थळावर दि. ९ सप्टेंबर २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.

शंकासमाधानासाठी कॉलसेंटर भ्रमणध्वनी क्र. ९५१३२५३२३३ (सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत (दुपारी १.३० ते २.३० जेवणाची वेळ वगळता) (सोमवार ते शनिवार)) संपर्क साधा.