सुहास पाटील

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP), गृह मंत्रालय, भारत सरकार. पुरुष व महिला उमेदवारांची ‘ट्रेड्समन कॉन्स्टेबल (टेलर अँड कॉब्लर)’ च्या एकूण ५१ पदांवर भरती.

AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Job Opportunity Recruitment at State Bank
नोकरीची संधी: स्टेट बँकेत भरती
Railway Opens 4,232 Apprentice Vacancies For 10th Pass Students, No Written Exam Required
रेल्वेमध्ये १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
BEL Recruitment 2025 Opportunity to get job without examination on apprenticeship posts in Bharat Electronics Limited, interview will be held on these dates
Walk-In-Interview : BELमध्ये अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, मुलाखतीला हजर राहा अन् नोकरी मिळवा, जाणून घ्या कोण करू शकते अर्ज?
SBI SCO Recruitment 2025
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या
rbi junior engineer recruitment loksatta news
नोकरीची संधी : आरबीआयमध्ये कनिष्ठ अभियंत्यांची भरती
CBSE Recruitment 2025: Registration for 212 Superintendent & Junior Assistant posts
१२ वी पास तरुणांसाठी नव्या वर्षात सरकारी नोकरीची संधी; CBSE मध्ये २१२ रिक्त जागांसाठी भरती, अर्ज कुठे अन् कसा कराल?

(१) कॉन्स्टेबल टेलर – १८ पदे पुरुष – १६ पदे (अज – ७, ईडब्ल्यूएस – २, खुला – ७). महिला – २ पदे (अज – १, खुला – १).

(२) कॉन्स्टेबल (कॉब्लर) – ३३ पदे. पुरुष – २८ (अजा – १, अज – ९, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १५); महिला – ५ (अज – २, खुला – ३). १० टक्के पदे माजी सैनिकांसाठी राखीव आहेत.

वेतन श्रेणी : लेव्हल-३ (रु. २१,७०० – ६९,१००) मूळ वेतन रु. २१,५००/- अधिक महागाई भत्ता रु. १०,८५०/- अधिक रेशन मनी, स्पेशल कॉम्पेन्सेटरी अलाऊन्स, मोफत निवास अथवा एचआरए. ट्रान्सपोर्ट अलाऊन्स. एलटीसी, मोफत वैद्याकिय सुविधा इ. तसेच उमेदवारांना ‘New Restructured Defined Contributory Pension Scheme’ (नवीन पेंशन स्कीम) लागू असेल.

पात्रता : (१८ ऑगस्ट २०२४ रोजी) (i) १० वी उत्तीर्ण, (ii) संबंधित ट्रेडमधील कामाचा २ वर्षांचा अनुभव

किंवा (iii) संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट आणि संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव

किंवा (iv) संबंधित ट्रेडमधील २ वर्षं कालावधीचा आयटीआय डिप्लोमा.

वयोमर्यादा : (दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी) १८ ते २३ वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे).

शारीरिक मापदंड : उंची – पुरुष – १६७.५ सें.मी. (अनुसूचित जमाती – १६२.५ सें.मी.), महिला – १५७ सें.मी. (अज – १५ सें.मी.) छाती – पुरुष – ८०८५ सें.मी. (अज – ७६८१ सें.मी.) दृष्टी – जवळची दृष्टी (चष्म्याशिवाय) चांगला डोळा एन-६, खराब डोळा एन-९; दूरची दृष्टी (चष्म्याशिवाय) चांगला डोळा ६/६, खराब डोळा ६/९.

टॅटू : धार्मिक भावना दर्शविणारे डाव्या हातावरील (Left forearm) आतील बाजूस (कोपर ते हात) असलेले कोपर ते हात यामधील भागाच्या १/४ आकारापेक्षा कमी आकाराचे टॅटू चालू शकतात.

निवड पद्धती : PET/ PST च्यावेळी उमेदवारांची बायोमेट्रिक ओळख पटविली जाईल. फेज-१ – शारीरिक क्षमता चाचणी ( PET) (फक्त पात्रता स्वरूपाची) पुरुष – १.६ कि.मी. अंतर ७.३० मिनिटांत धावणे, लांब उडी – ११ फूट, उंच उडी – ३१/२ फूट.

महिला – ८०० मीटर अंतर ४.४५ मिनिटांत धावणे; लांब उडी – ९ फूट, उंच उडी – ३ फूट.

लांब उडी आणि उंच उडीसाठी ३ प्रयत्न दिले जातील.

शारीरिक मापदंड चाचणी (PST) : पुरुष उमेदवारांची उंची, वजन आणि छाती मोजली जाईल. महिला उमेदवारांची उंची आणि वजन मोजले जाईल. उमेदवार अपात्र ठरल्यास त्याचदिवशी अपिल करू शकतात.

फेज-२ – लेखी परीक्षा (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे) ५० प्रश्न/ ५० गुण, वेळ ५० मिनिटे. (जनरल इंग्लिश, जनरल हिंदी)

(१) जनरल नॉलेज – १५ प्रश्न, (२) प्राथमिक अंकगणिताचे ज्ञान – १० प्रश्न, (३) अॅनालायटिकल अॅप्टिट्यूड अँड अॅबिलिटी टू ऑब्जर्व्ह अँड डिस्टींग्वीश पॅटर्न्स – १५ प्रश्न, (४) इंग्लिश किंवा हिंदीचे ज्ञान – १० प्रश्न (चुकीच्या उत्तरासांठी गुण वजा केले जाणार नाहीत.) उत्तरतालिका (Answer Key) लेखी परीक्षा पूर्ण झाल्यावर (ITBP ¨¹FF https:// recruitment. itbpolice. nic. in या संकेतस्थळावर) अपलोड केल्या जातील.

फेज-३ लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी रिक्त पदांच्या १० पट उमेदवार ५० गुणांच्या ट्रेड टेस्टसाठी बोलाविले जातील. ट्रेड टेस्ट निकष संबंधित जाहिरातीमध्ये दिलेले आहेत.

लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार कॅटेगरीनिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. कागदपत्र पडताळणीनंतर डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन (DME) होईल. अपात्र ठरल्यास रिह्यू मेडिकल एक्झामिनेशन (RME) २४ तासांच्या आत मागता येईल.

PET/ PST, लेखी परीक्षासाठी अॅडमिट कार्ड ऑनलाइन ँttps:// recruitment. itbpolice. nic. in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.

शंकासमाधानासाठी हेल्पलाईन नंबर – ०११-२४३६९४८२/ २४३६९४८३, ई-मेल आयडी – comdtrect@itbp. gov. in

अर्जाचे शुल्क : रु. १००/- (खुला, इमाव, ईडब्ल्यूएसचे पुरुष उमेदवारांसाठी). अजा/ अज/ महिला/ माजी सैनिक यांना अर्जाचे शुल्क माफ आहे.

ऑनलाईन अर्ज https:// recruitment. itbpolice. nic. in या संकेतस्थळावर दि. १८ ऑगस्ट २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.

Story img Loader