● कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ( KRCL), बेलापूर, नवी मुंबई ( Advt. No. CO-१३०३२/४१२०१८- PERS(२२४५१) dt. ०९.०५.२०२४) पुढील एकूण ४२ पदांची ठरावीक मुदतीकरिता करार पद्धतीने वॉक-इन इंटरह्यू घेवून भरती.

(१) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल – १५ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८) (वॉक-इन इंटरह्यू दि. १० जून २०२४).

job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Night special local for the convenience of employees voters Mumbai news
कर्मचारी, मतदारांच्या सोयीसाठी रात्रकालीन विशेष लोकल धावणार
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
flying squads, Thane district code of conduct , assembly election
ठाणे : आचार संहितेच्या काळात २३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त; लाखो लिटर दारू; ६ कोटींचे मोफत वाटप साहित्य; १ कोटींचे अंमली पदार्थ

पात्रता – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनीअरींग पदवी/ पदविका.

कामाचे स्वरूप – KRCL मार्फत कार्यान्वित असलेले रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन आणि इतर प्रोजेक्ट्सवरील कामाची देखरेख आणि पर्यवेक्षण.

अनुभव – पद क्र. १ साठी डिप्लोमाधारकांसाठी संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव.

(२) टेक्निकल असिस्टंट/ इलेक्ट्रिकल – १५ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८) (वॉक-इन इंटरह्यू दि. १९ जून २०२४).

पात्रता – कोणत्याही ट्रेडमधील आयटीआय कोर्स उत्तीर्ण.

कामाचे स्वरूप – KRCL च्या रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन कामाचा किंवा इतर प्रोजेक्ट्सवरील काम.

अनुभव – इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्सचे ऑपरेशन/ रिपेअर्स/ मेंटेनन्स कामाचा ३ वर्षांचा अनुभव.

(३) डिझाईन असिस्टंट/ इलेक्ट्रिकल – २ पदे (खुला) (वॉक-इन इंटरह्यू दि. १४ जून २०२४).

पात्रता – ड्राफ्ट्समन इलेक्ट्रिकल ट्रेडमधील आयटीआय किंवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा. ( AutoCAD असल्यास प्राधान्य)

(४) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट/ सिव्हील – ४ पदे (वॉक-इन इंटरह्यू दि. १४ जून २०२४).

पात्रता – सिव्हील इंजिनीअरिंग पदवील अथवा पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

अनुभव – डिप्लोमाधारकांना रेल्वे प्रोजेक्ट प्लानिंग/फिल्ड सर्व्हे/अ बनविणे/बिल्डींगमधील सिव्हील इंजिनीअरिंग कामाचे पर्यवेक्षण इ. कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.

(५) AEE/ Contract – ३ पदे (खुला) (वॉक-इन इंटरह्यू दि. २१ जून २०२४).

पात्रता – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिग्री अथवा डिप्लोमा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

अनुभव – रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट्स (ओव्हर हेड इक्विपमेंट्स/ पॉवर सप्लाय इ. कामाचा किमान ६ वर्षांचा अनुभव डिग्रीधारकांसाठी आणि ८ वर्षांचा अनुभव डिप्लोमाधारकांसाठी आवश्यक.)

वयोमर्यादा – सर्व पदांसाठी ४५ वर्षे.

वेतन श्रेणी – पद क्र. १, ३ व ४ साठी पे-मॅट्रिक्स लेव्हल – ६, रु. ३५,४००/-, अंदाजे वेतन दरमहा रु. ६६,०००/-.

पद क्र. २ साठी PML – ४ रु. २५,५००/, अंदाजे वेतन दरमहा रु. ५०,०००/-.

पद क्र. ५ साठी AAE/ Contract साठी PML – १० रु. ५६,१००/-, अंदाजे वेतन दरमहा रु. १,०७,०००/-.

निवड पद्धती – वॉक-इन इंटरह्यूच्या वेळी उमेदवारांनी आपले नाव संबंधित KRCL च्या अधिकाऱयाकडे रजिस्टर करावे. ग्रुप डिस्कशन किंवा इतर पद्धतीने उमेदवार शॉर्ट लिस्ट केले जातील. त्यांना इंटरह्यू द्यावा लागेल. इंटरह्यूमधील कामगिरीवर आधारित गुणवत्ता यादी बनविली जाईल. इंटरह्यूचे ठिकाण – Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector uq, Seawoods ( W.), Navi Mumbai.

ट्रेनी पायलट पदांची भरती

● भारत सरकार, कॅबिनेट सेक्रेटरिएट – ‘ट्रेनी पायलट (ग्रुप-ए गॅझेटेड, नॉन-मिनिस्ट्रीयल)’ पदांची भरती. एकूण रिक्त पदे – १५.

पात्रता – १२ वी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि डायरेक्टोरेट जनरल सिव्हील एव्हिएशन ( DGCA) यांचेकडील कमर्शियल पायलट लायसन्स किंवा हेलिकॉप्टर पायलट कमर्शियल लायसन्स.

वयोमर्यादा – दि. १० जून २०२४ रोजी २०-३० वर्षे. (इमाव – ३३ वर्षे, अजा/अज – ३५ वर्षे)

दरमहा वेतन – रु. १,५२,०००/-.

निवड पद्धती – ट्रेनी पायलट पदांच्या निवडीकरिता DGCA मार्फत घेतलेल्या फ्लाईट क्रू लायसन्स एक्झामिनेशन ( FCLE) मध्ये पुढील विषयांतील गुण विचारात घेतले जातील. (१) एअर नेव्हिगेशन, (२) एअर रेग्युलेशन, (३) एअर मेटीओरॉलॉजी, (४) टेक्निकल जनरल आणि (५) टेक्निकल स्पेसिफिकेशन FCLE मधील ५०० पैकी मिळालेल्या एकूण गुणांना ५ ने भागून येणारे गुण १०० पैकी समजले जातील. रिक्त पदांच्या ५ पट उमेदवारांना गुणवत्ता यादीनुसार इंटरह्यूकरिता बोलाविले जाईल.

अंतिम निवड FCLE मधील १०० पैकी गुण पायलट अॅप्टिट्यूड रिलेटेड सायकोमेट्रिक टेस्ट (फक्त पात्रता स्वरूपाची) आणि २५ गुणांचा इंटरह्यूमधून मिळालेले एकूण गुण यांच्या आधारे केली जाईल. अर्जाचा विहीत नमुना एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. ११-१७ मे २०२४ च्या अंकामध्ये पान क्र. २० वर दिलेला आहे. विहीत नमुन्यातील अर्ज अ-४ आकाराच्या कागदावर काळ्या किंवा निळ्या शाईने इंग्लिश कॅपिटल ( Block) लेटर्समध्ये पूर्ण भरून पुढील पत्त्यावर दि. १० जून २०२४ पर्यंत साध्या पोस्टाने पोहोचतील असे पाठवावेत.

Post Bag No. ३००३, Lodhi Road, Head Post Office, New Delhi – ११० ००३.

अर्जाच्या लिफाफ्यावर ‘ Application for the post of Trainee Pilot’ असे स्पष्ट अक्षरात लिहावे.

अर्जासोबत स्वयंसाक्षांकीत केलेल्या पुढील संबंधित प्रमाणपत्रांच्या प्रती जोडाव्यात.

(१) वय, (२) शैक्षणिक अर्हता, (३) DGCA च्या सेंट्रल एक्झामिनेशन ऑर्गनायझेशन मार्फत दिले गेलेले व्हॅलिड कमर्शियल लायसन्स, अनुभव इ.