इंडियन नेव्हीमध्ये अविवाहित पुरुष व अविवाहित महिला उमेदवारांची इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी एन्ट्रीमधील (एक्झिक्युटिव्ह ब्रँच) शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळविण्यासाठी जून २०२५ पासून सुरू होणारा स्पेशल नेव्हल ओरिएंटेशन कोर्सकरिता इंडियन नेव्हल अॅकॅडमी, (INA) इझिमाला, केरळ येथे प्रवेश.
पदाचे नाव – SSC Executive (Information Technology) – एकूण रिक्त पदे – १५.
पात्रता : एम.एससी./ बी.ई./ बी.टेक./ एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/ सॉफ्टवेअर सिस्टीम/ सायबर सिक्युरिटी/ सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन अँड नेटवर्कींग/ कॉम्प्युटर सिस्टीम अँड नेटवर्कींग / डेटा अॅनालायटिक्स/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स) किंवा एम.सी.ए. (कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीमधील बी.सी.ए./ बी.एस्सी. पदवीसह) आणि १० वीला किंवा १२ वीला इंग्लिश विषयात किमान ६० टक्के गुण मिळालेले असावेत. तसेच पात्रता परीक्षेत किमान सरासरी ६० टक्के गुण आवश्यक.
शारीरिक मापदंड : उंची – पुरुष – १५७ सें.मी., महिला – १५२ सें.मी. वजन : उंची आणि वय यांचे प्रमाणात वजन असावे. (पुरुष व महिला) ज्यांचे वय २० ते ३० वर्षे दरम्यानचे आहे आणि
(i) उंची १५२ सें.मी. असलेले उमेदवारांसाठी किमान वजन ४३ कि.ग्रॅ. व कमाल वजन ५३ कि.ग्रॅ.
(ii) १५७/१५८ सें.मी. उंचीसाठी – किमान वजन ४६ कि.ग्रॅ. व कमाल वजन ५७ कि.ग्रॅ. असावे.
वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी २००० ते १ जुलै २००५ दरम्यानचा असावा.
निवड पद्धती : SSB इंटरव्ह्यूकरिता उमेदवार शॉर्ट लिस्ट करताना (१) बी.ई./ बी.टेक. पात्रता धारकांचे/अंतिम वर्षाच्या उमेदवारांचे ५व्या सेमिस्टरपर्यंतचे सरासरी गुण पाहिले जातात. (२) पदव्युत्तर पदवीधारकांचे M. Sc./ M. C. A./ M. Tech. सर्व सेमिस्टर्सचे सरासरी गुण पाहिले जातील.
पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षातील उमेदवारांचे प्री-फायनल वर्षाची गुणवत्ता पाहिली जाईल.
दि. १ जून २०२२ किंवा त्यानंतर मिळविलेले नेव्हल/ आर्मी/ एअर विंगचे NCC- C सर्टिफिकेट (किमान बी ग्रेडसह) उमेदवारांना SSB साठी निवडताना किमान ५ टक्के गुणांची सूट दिली जाईल.
SSB इंटरव्ह्यूनंतर मेडिकल टेस्ट घेतली जाईल. SSB इंटरव्ह्यूची विस्तृत माहिती इंडियन नेव्हीच्या www. joinindiannavy. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ट्रेनिंग : निवडलेल्या उमेदवारांना सब-लेफ्टनंट पदावर ६ आठवड्यांच्या नेव्हल अॅकॅडमी, इझिमाला येथे नेव्हल ओरिएंटेशन कोर्ससाठी पाठविले जाईल. त्यानंतर प्रोफेशनल ट्रेनिंग नेव्हल शिप्स आणि ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट्समध्ये दिले जाईल. फक्त अविवाहित उमेदवारच ट्रेनिंगसाठी पात्र आहेत.
वेतन : मूळ वेतन रु. ५६,१००/- इतर भत्ते मिळून अंदाजे वेतन दरमहा रु. १,२५,०००/-.
प्रोबेशन कालावधी : २ वर्षांचा असेल, जो सबलेफ्टनंट रँक मिळाल्या दिवसापासून सुरू होऊन २ वर्षांचा असेल किंवा इनिशियल ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत असेल.
नेमणुकीचा कालावधी : निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला १० वर्षांसाठी नेमणूक दिली जाईल. उमेदवाराची कामगिरी/मेडिकल फिटनेस इ. पाहून नेमणुकीचा कालावधी २ २ वर्षांसाठी वाढविला जाईल.
रजिस्ट्रेशन आणि ऑनलाइन अर्ज www. joinindiannavy. gov. in या संकेतस्थळावर दि. २९ डिसेंबर ते १० जानेवारी २०२५ दरम्यान करता येईल. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक.