युनियन बँक ऑफ इंडियात अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत अॅप्रेंटिसेसची भरती. एकूण पदे – २६९१. महाराष्ट्रातील रिक्त पदे – २९६ (अजा – २९, अज – २६, इमाव – ७९, ईडब्ल्यूएस – २९, खुला – १३३ (१२ पदे दिव्यांग कॅटेगरी HI/ OC/ VI/ ID साठी प्रत्येकी ३ पद राखीव)). गोवा राज्यातील पदे – १९

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पात्रता : दि. ५ मार्च २०२५ रोजी पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण. पदवी परीक्षा १ एप्रिल २०२१ नंतर उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा : दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी २० ते २८ वर्षे.

अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षाचा असेल. ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना दरमहा रु. १५,०००/- स्टायपेंड दिला जाईल.

निवड पद्धती : (i) ऑनलाइन वस्तुनिष्ठ प्रकारची लेखी परीक्षा (१) जनरल/फिनान्शियल अवेअरनेस, (२) जनरल इंग्लिश, (३) क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग अॅप्टिट्यूड, (४) कॉम्प्युटर नॉलेज. प्रत्येकी २५ प्रश्न, २५ गुण, कालावधी प्रत्येकी १५ मिनिटे, एकूण १०० प्रश्न, वेळ ६० मिनिटे.

(ii) टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज – उमेदवारांनी ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज केला आहे त्या राज्यातील स्थानिय भाषेची परीक्षा द्यावी लागेल. (ज्या उमेदवारांनी १० वी/१२ वीला संबंधित राज्यातील स्थानिय भाषा अभ्यासली असेल त्याचा पुरावा सादर केल्यास त्यांना लँग्वेज टेस्ट द्यावयाची गरज नाही.)

राज्यनिहाय कॅटेगरीनुसार मेरिट लिस्ट उमेदवारांच्या लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार बनविली जाईल. प्रतिक्षा यादीसुद्धा बनविली जाईल. उमेदवाराचे वैद्याकिय फिटनेस तपासून मगच नेमणूक दिली जाईल. अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची असेसमेंट टेस्ट घेतली जाईल. उमेदवारांना अॅप्रेंटिसशिप पोर्टल आणि NATS पोर्टल https:// nats. education. gov. in/ studenttype. php ( Student Register/ Student Login वर आपले नाव यापूर्वी रजिस्टर केले नसेल तर रजिस्टर करावे लागेल.

उमेदवारांना रजिस्ट्रेशन करताना काही अडचणी आल्यास त्यांनी NATS पोर्टल https:// nats. education. gov. in/ assets/ manual/ studentmanual. pdf वरील Help Manual मधील सूचना वाचाव्यात.

अर्जाचे शुल्क : खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस – रु. ८००/-.

उमेदवारांना ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज करावयाचा आहे, त्या राज्यातील ३ जिल्ह्यांचा पसंतीक्रम नोंदवायचा आहे. (मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, अहमदनगर, अमरावती, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे)

शंकासमाधानासाठी apprentice@unionbankofindia. bank किंवा info@bfsissc. com यावर संपर्क साधावा.

उमेदवारांना नेमून दिलेल्या दिवशी व वेळी स्वत:चा camera enabled desktop किंवा Laptop किंवा tablet किंवा smart plune वापरून ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल. अॅप्रेंटिसशिप पोर्टलवर अपलोड केलेला आयडी प्रूफ उमेदवारांना परीक्षेच्या वेळी स्क्रीनवर दाखवावा लागेल. विस्तृत माहिती आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक www. unionbankofindia. co. in किंवा https:// bfsissc. com या वेबसाईटवरील Careers Section मध्ये उपलब्ध आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ मार्च २०२५.

मुलाखतीला जाण्याआधीची तयारी

आजच्या लेखात आपण प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्व चाचणीच्या दिवशी किंवा त्याच्या काही दिवस आधी काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याचा विचार करूया.

आयओसीएल’मध्ये संधि

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. (IOCL) आपल्या ५ झोन्समधील पाइपलाइन डिव्हीजन्समध्ये ४५७ अॅप्रेंटिस पदांची भरती.

ट्रेड व झोननिहाय रिक्त पदे –

वेस्टर्न रिजन पाइप लाइन्स (WRPL) – १३६ पदे;

ईस्टर्न रिजन पाइप लाइन्स (ERPL) – १२२ पदे;

नॉदर्न रिजन पाइप लाइन्स (NRPL) – ११९ पदे;

सदर्न रिजन पाइप लाइन्स (SRPL) – ३५ पदे;

साऊथ ईस्टर्न रिजन पाइप लाइन्स (SERPL) – ४५ पदे.

( I) वेस्टर्न रिजन पाईप लाईन्स (WRPL) – १३६ पदे.

(१) टेक्निशियन अॅप्रेंटिस – मेकॅनिकल – गुजरात – २२, राजस्थान – १२, महाराष्ट्र – ३.

पात्रता : (दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग डिप्लोमा

(२) टेक्निशियन अॅप्रेंटिस – इलेक्ट्रिकल – गुजरात – २२, राजस्थान – १२, महाराष्ट्र – ३.

पात्रता : इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा.

(३) टेक्निशियन अॅप्रेंटिस – टेली कम्युनिकेशन अँड इन्स्ट्रूमेंटेशन – गुजरात – २१, राजस्थान – १२, महाराष्ट्र – ३.

पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनीअरिंग किंवा अलाईड इंजिनीअरिंग डिप्लोमा.

उमेदवारांनी पात्रता परीक्षा दि. २८ फेब्रुवारी २०२० नंतर किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. उच्च पात्रताधारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत. वेस्टर्न रिजन पाइप लाइन्स (WRPL) संबंधित शंका wrplapprentice@indianoil. in या ई-मेल आयडीवर Trade Code लिहून पाठवाव्यात. वयोमर्यादा : दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी १८-२४ वर्षे.

अॅप्रेंटिसशिपचा कालावधी : १२ महिने.

स्टायपेंड : अॅप्रेंटिसेसना नियमाप्रमाणे दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

निवड पद्धती : पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवड यादी बनविली जाईल.

अर्ज करण्याची मुदत दि. ३ मार्च २०२५ पर्यंत.

suhaspatil237 @gmail. com