महाराष्ट्र राज्यातील २३ जिल्हा समादेशक, होमगार्ड यांच्या कार्यालयांतर्गत होमगार्ड नोंदणीचे आयोजन केले आहे. याविषयीची विस्तृत माहिती https:// maharashtracdhg. gov. in/ mahahg/ login1. php https:// maharashtracdhg. gov. in/ mahahg/ enrollmentform. php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
होमगार्ड पात्रतेचे निकष :
शैक्षणिक पात्रता : किमान १० वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता : उंची पुरुष १६२ सें.मी. महिला १५० सें.मी.
वय : दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी २० वर्षे पूर्ण ते ५० वर्षांच्या आत.
आवश्यक कागदपत्र :
(१) रहिवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपत्र
(२) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
(३) जन्मदिनांक पुराव्याकरिता १० वी बोर्ड प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला
(४) तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र
(५) खासगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र
(६) ३ महिन्यांचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
निवड पद्धती :
शारीरिक क्षमता चाचणी :
(अ) धावणे पुरुष १६०० मी. धावणे (५ मि. १० सेकंदांपर्यंत २० गुण, प्रत्येक २० सेकंदांपेक्षा जास्त वेळेसाठी २ गुण कमी केले जातील.) महिला ८०० मी. धावणे (२ मि. ५० सेकंदांपर्यंत २५ गुण, प्रत्येक १० सेकंदांपेक्षा जास्त वेळेसाठी २ गुण कमी दिले जातील.)
(ब) गोळाफेक पुरुष ८.५० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त १० गुण; प्रत्येक ०.६० मीटर अंतरासाठी १ गुण कमी दिला जातील. ३.१० मीटरपेक्षा कमी गुण. महिला ६.०० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त १० गुण; प्रत्येक ०.५० मीटर अंतरासाठी २ गुण कमी दिले जातील.
(क) तांत्रिक अर्हता गुण – एकूण १० गुण
(१) आयटीआय प्रमाणपत्र
(२) खेळामध्ये (किमान जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा) प्राविण्य
(३) माजी सैनिक (डिस्चार्ज कार्ड आवश्यक)
(४) एन.सी.सी. बी प्रमाणपत्र
(५) एन.सी.सी.-सी प्रमाणपत्र
(६) नागरी संरक्षण सेवेत तीन प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र
(७) जड वाहनचालक परवाना
वरीलपैकी १ अट पूर्ण करीत असल्यास २ गुण, २ अटी ३ गुण, ३ अटी ४ गुण, ४ अटी ५ गुण, ५ अटी ७ गुण, ६ अटी- ८ गुण. सर्व अटी पूर्ण करीत असल्यास १० गुण दिले जातील.
कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकीत प्रती अर्जासोबत जोडाव्यात. सर्व अर्जाची छाननी केल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख जाहीर करणेत येईल. अर्ज क्रमांकानुसार कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीसाठी येताना उमेदवाराने स्वत: मूळ कागदपत्र, त्यांच्या स्वयंसाक्षांकीत प्रती आणि दोन फोटो घेवून यावे. उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.
नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सूचना होमगार्ड नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे, तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो, त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यांतील अर्ज बाद ठरतील. एका उमेदवाराला आधारकार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
होमगार्ड नोंदणीचे अर्ज
https:// maharashtracdhg. gov. in/ mahahg/ login1. php किंवा https:// maharashtracdhg. gov. in/ mahahg/ enrollmentform. php या संकेतस्थळावर इंग्रजी भाषेमधून भरावेत. HGs Enrollment या मेनूमधून ONLINE ENROLLMENT FORM हा सबमेनू निवडावा. सर्वप्रथम जिल्हा select करावा. त्यानंतर आपण ज्या पोलीस ठाणेच्या हद्दीत राहतो मेनविभाग ज्या होमगार्ड पथकामध्ये येतो, ते पथक आणि पोलीस ठाणे सिलेक्ट करा. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनूमध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर अलिकडच्या काळात काढलेला एक फोटो चिकटवावा. मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वत: पेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये.
ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख आणि कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीची तारीख काही जिल्ह्याच्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. इतर जिल्ह्यांतील जाहिरातीप्रमाणे कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीची तारीख नंतर कळविण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : सातारा जिल्ह्यासाठी ३१ जुलै २०२४ (संध्या. ५.०० वाजेपर्यंत); अमरावती – ३ ऑगस्ट २०२४; चंद्रपूर, सिंधुदुर्ग – १० ऑगस्ट २०२४; पुणे – ११ ऑगस्ट २०२४; रत्नागिरी, जळगाव, धुळे, हिंगोली, धाराशीव, वाशिम, नंदूरबार, गडचिरोली, सांगली, नाशिक व कोल्हापूर – १४ ऑगस्ट २०२४; वर्धा – १५ ऑगस्ट २०२४; बीड, भंडारा, रायगड व लातूर – १६ ऑगस्ट २०२४; यवतमाळ – १७ ऑगस्ट २०२४.