सुहास पाटील
राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर लिमिटेड (RCF) (भारत सरकारचा उपक्रम). ट्रॉम्बे, मुंबई आणि थळ (अलिबाग), रायगडमधील ऑपरेटिंग युनिट्समध्ये अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत एकूण ४०८ ग्रॅज्युएट / टेक्निशियन / ट्रेड अॅप्रेंटिसेसची भरती.
(ए) ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस पदे – एकूण १५७ पदे. अॅप्रेंटिसशिप कालावधी – १२ महिने. (१) अकाऊंट्स एक्झिक्युटिव्ह – ५१ पदे. प्रशिक्षण कालावधी – १२ महिने. पात्रता – बी.कॉम्. बी.बी.ए./ इकॉनॉमिक्समधील पदवी. (२) सेक्रेटरिअल असिस्टंट – ७६ पदे. (३) रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव्ह (एचआर) – ३० पदे. पद क्र. २ व ३ साठी पात्रता : (कोणतीही शाखा) पदवी उत्तीर्ण. (इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक) प्रशिक्षण कालावधी – १२ महिने.
(बी) टेक्निशियन अॅप्रेंटिसेस – एकूण – ११५ पदे. प्रशिक्षण कालावधी – एक वर्ष. (१) डिप्लोमा केमिकल – ३० पदे. (२) डिप्लोमा सिव्हिल – ११ पदे. (३) डिप्लोमा कॉम्प्युटर – ६ पदे. (४) डिप्लोमा इलेक्ट्रिकल – २० पदे. (५) डिप्लोमा इन्स्ट्रमेंटेशन – २० पदे. (६) डिप्लोमा मेकॅनिकल – २८ पदे. पात्रता : पद क्र. (बी) १ ते ६ साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदविका उत्तीर्ण.
(सी) ट्रेड अॅप्रेंटिसेस – एकूण १३६ पदे. (१) अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट (AOCP) – १०४ पदे. प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष. पात्रता : (दि. १ एप्रिल २०२२ रोजी) बीएस्सी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स किंवा बायोलॉजी विषयांसह उत्तीर्ण. (२) बॉयलर अटेंडंट – ३ पदे. (३) इलेक्ट्रिशियन – ४ पदे. पद क्र. २ व ३ साठी पात्रता – १० वी (विज्ञान आणि गणित विषयासह) उत्तीर्ण. (४) हॉर्टिकल्चर असिस्टंट – ६ पदे. पात्रता: १० वी उत्तीर्ण. पद क्र. २ ते ४ साठी प्रशिक्षण कालावधी : २ वर्षे. (५) इन्स्ट्रमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट) – ३ पदे. पात्रता : बीएस्सी (फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयासह). प्रशिक्षण कालावधी : १२ महिने. (६) लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लांट) – १३ पदे. पात्रता : बीएस्सी (पीसीएम अथवा बी) उत्तीर्ण. प्रशिक्षण कालावधी : १२ महिने. (७) मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी) – ३ पदे. पात्रता : १२ वी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयांसह) उत्तीर्ण. प्रशिक्षण कालावधी : १५ महिने. सर्व पदांसाठी पात्रता परीक्षा किमान सरासरी ५० गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अंतिम वर्षांच्या गुणांची टक्केवारी किंवा शेवटच्या दोन सेमिस्टर्सच्या गुणांची टक्केवारी) (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना किमान ४५ गुण आवश्यक) कॅटेगरीनिहाय रिक्त पदांचा तपशील – एकूण ४०८ पदे (अजा – ६१, अज -३०, इमाव -११०, ईडब्ल्यूएस् -४०, खुला – १६७) सर्व पदांसाठी पात्रता परीक्षा दि. १ जानेवारी २०२१ किंवा त्यानंतर उत्तीर्ण असणे आवश्यक. वयोमर्यादा : (दि. १ एप्रिल २०२३ रोजी) सर्व पदांसाठी १८ ते २५ वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०वर्षे) दरमहा स्टायपेंड : १० वी/१२ वी पात्रता असणाऱ्या ट्रेड अॅप्रेंटिसेस पदांसाठी रु. ७,०००/-. टेक्निशियन अॅप्रेंटिसेस किंवा डिप्लोमाधारक पात्रता पदांसाठी रु. ८,०००/-. ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस/पदवी पात्रता असलेल्या पदांसाठी रु. ९,०००/-.
निवड पद्धती : पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांची गुणवत्ता यादी बनविली. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविले जाईल. कागदपत्रांच्या पडताळणीतून योग्य ठरलेल्या उमेदवारांना अॅप्रेंटिस ट्रेनी पदावर नेमणूक दिली जाईल, त्यांना १ आठवडय़ाचा कालावधी जॉइन करण्यासाठी देण्यात येईल. दिलेल्या वेळेच्या पूर्वी निवडलेले उमेदवार जॉइन झाले नाहीत तर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. निवडलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादी बनविली जाईल. CGPA/ CPIकिंवा इतर ग्रेड्सचे परसेंटेजमध्ये रूपांतर करण्याचे संबंधित युनिव्हर्सिटी/ इन्स्टिटय़ूशनकडील सर्टिफिकेट रिपोर्टिगच्या वेळी सादर करणे आवश्यक. फउा च्या संबंधित युनिट्सच्या ५० कि.मी. परिघात राहणाऱ्या उमेदवारांना (i) अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. (ii) त्यांना प्राधान्य देण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी ट्रेड अॅप्रेंटिसेस पदांसाठी https:// apprenticeshipindia. org/ candidate- registration/; टेक्निशिअन अॅप्रेंटिसेस पदांसाठी https:// www. mhrdnats. gov. in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक. ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस पदांसाठी रजिस्ट्रेशन RCF जॉइन झाल्यानंतर केले जाईल.
ऑनलाइन अर्ज www. rcfltd. Com या संकेतस्थळावर दि. ७ नोव्हेंबर २०२३ (सायं. ५ वाजे)पर्यंत करावेत( Recruitment ; Engagement of Apprentices – 2023-24; I accept; Apply Online; Upload Coloured photograph ( upto 75 KB size) and signature ( upto 25 KB) scanned copies jpg/ jpeg format; save/ submit; Print) अर्जासोबत (फोटोग्राफ व सही वगळता) इतर कोणतेही कागदपत्रे अपलोड करावयाची नाहीत.
शंकासमाधानासाठी apprentice2023 @rcfltd. com या ई-मेलवर संपर्क साधा.
suhassitaram@yahoo.com