● एअरपोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (AAI ), नवी दिल्ली ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल)’ पदांची थेट भरती.

एकूण रिक्त पदे – ३०९ (अजा – ५५, अज – २७, इमाव – ७२, ईडब्ल्यूएस – ३०, खुला – १२५) (७ पदे दिव्यांग कॅटेगरी-सी ( AAV) साठी राखीव).

पात्रता – बी.एससी. (फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स) किंवा कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवी. (फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषय पदवी स्तरावर अभ्यासलेले असावेत.)

वयोमर्यादा – (दि. २४ मे २०२५ रोजी) २७ वर्षे. वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे

वेतन – ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (ग्रुप-बी: ए१ लेव्हल) (रु. ४०,००० – १,४०,०००) अंदाजे वेतन रु. १३ लाख प्रतीवर्ष (सीटीसी).

निवड पद्धती – उमेदवारांना कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट ( CBT) साठी बोलाविले जाईल. CBT चा दिनांक वेबसाईटवर नंतर जाहीर केला जाईल. परीक्षेचा अभ्यासक्रम Advt. No. ०२/२०२५/ CHQ च्या Syllabus Column मध्ये अपलोड केला जाईल. CBT मध्ये चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमधील कामगिरीनुसार पुढील भरती प्रक्रियेसाठी उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील. शॉर्टलिस्टेड उमेदवारांचे रोल नंबर AAI वेबसाईटवर जाहीर केले जातील. यासाठी आणि कॉल लेटर डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांनी अअक वेबसाईट/त्यांचा रजिस्टर्ड ई-मेल आयडी नियमितपणे तपासणे आवश्यक आहे. CBT देशभरातील विविध प्रमुख शहरांमधील केंद्रांवर घेतली जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. १,०००/- (जीएसटीसह) फक्त ऑनलाइन मोडने भरावयाचे आहेत. (अजा/अज/ दिव्यांग/महिला उमेदवारांना फी माफ आहे.) तसेच अअक मध्ये १ वर्ष कालावधीची अ‍ॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या उमेदवारांना फी माफ आहे. ऑनलाइन अर्जासोबत JPG/ JPEG Format मध्ये स्कॅन करून अपलोड करावयाची कागदपत्रे (यासाठी अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठीच्या सूचना वाचाव्यात.)

(१) फोटोग्राफ (पांढरी पार्श्वभूमी असलेला पासपोर्ट आकाराचा) (३ महिन्यांपूर्वी काढलेला नसावा.)

(२) पांढऱया कागदावर काळ्या शाईने केलेली स्वाक्षरी.

ऑनलाइन अर्ज www. aai. aero या वेबसाईटवरील ‘Careers’ टॅबमधून दि. २५ एप्रिल ते २४ मे २०२५ पर्यंत करावेत.

suhaspatil237@gmail.com