बँक ऑफ बडोदा ( BOB) मध्ये अॅप्रेंटिसेस अॅक्ट १९६१ अंतर्गत ४००० अॅप्रेंटिसेसची भरती. राज्यनिहाय रिक्त पदे –

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र (मराठी) – ३८८

(अजा – ३८, अज – ३४, इमाव – १०४, ईडब्ल्यूएस – ३८, खुला – १७४) (१५ पदे अपंगांसाठी राखीव) (अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, रायगड, सोलापूर प्रत्येकी १० पदे) मुंबई – १२२, मुंबई उपनगर – १०३, पुणे – ४०, ठाणे – ३७, पालघर – ६).

गोवा (मराठी कोकणी) – १०

गुजरात (गुजराती) – ५७३, कर्नाटक (कन्नड) – ५३७, मध्य प्रदेश (हिंदी) – ९४, तेलंगणा (तेलुगू, ऊर्दू) – १९३, छत्तीसगड (हिंदी) – ७६, आंध्र प्रदेश (तेलुगू, ऊर्दू) – ५९, दादरा नगर हवेली (गुजराती, कोकणी, मराठी) – ७ इ.

पात्रता – १ फेब्रुवारी २०२५ रोजी पदवी (कोणत्याही शाखेतील) १ फेब्रुवारी २०२१ नंतर उत्तीर्ण.

वयोमर्यादा – १ फेब्रुवारी २०२५ रोजी २०-२८ वर्षे

स्टायपेंड दरमहा – रु. १५,०००/- मेट्रो/शहरी शाखा; रु. १२,०००/- ग्रामीण/अर्धशहरी शाखा.

निवड पद्धती – ( i) ऑनलाइन परीक्षा, ( ii) कागदपत्र पडताळणी, ( iii) टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह परीक्षा – १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे. (जनरल/फिनान्शियल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग अॅप्टिट्यूड, कॉम्प्युटर नॉलेज, जनरल इंग्लिश प्रत्येकी २५ प्रश्न) (परीक्षेचे माध्यम इंग्लिश/हिंदी) (चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.)

NATS पोर्टलवर रजिस्ट्रेशन झाल्यावर https:// nats. education. gov. in/ student_ type. php वर वser ID आणि पासवर्ड वापरून लॉगइन करून अॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज करावा.

रजिस्ट्रेशनच्या वेळी काही अडचण आल्यास NAPS पोर्टलवरील https:// www. apprenticeshipindia. gov. in k Candidates ला भेट द्या. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत – ११ मार्च २०२५.

एल अँड टी’त स्कॉलरशिप

एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कार्यक्षम कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मॅनेजर बनण्याची संधी. एल अँड टीबिल्ड इंडिया स्कॉलरशीप २०२५

● प्रोग्रामचे नाव – ‘एम.टेक इन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट थ्रू एल अँड टी बिल्ड इंडिया स्कॉलरशिप’. जून २०२५ पासून सुरू होणार कोर्स. (कोर्स कालावधी – २ वर्षं)

● आयआयटी मद्रास/आयआयटी दिल्ली/एनआयटीके सुरथकल/एनआयटी तिरुचिरापल्लीमध्ये पूर्ण वेळ २ वर्षांच्या M. Tech. (कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट) पदवी कोर्ससाठी प्रवेश.

● कोर्स एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून प्रायोजित केला जाईल, कोर्सची फी एल अँड टी कंपनीकडून भरली जाईल. उमेदवारांना हॉस्टेल फी आणि मेस फी स्वत: भरावी लागेल.

● प्रोग्राम दरम्यान उमेदवारांना दरमहा रु. १३,४००/- विद्यावेतन दिले जाईल.

● कोर्स दरम्यान उमेदवारांना एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्रोजेक्ट साईट्सवर प्रत्यक्ष प्रोजेक्ट करण्याची संधी. यासाठी एल अँड टी बिल्ड इंडिया स्कॉलरशिपच्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन मिळेल.

● कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना एल अँड टी कन्स्ट्रक्शनमध्ये सामावून घेतले जाईल.

● पात्रता – बी.ई./बी.टेक्. (कोअर सिव्हील इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) च्या अंतिम वर्षाचे उमेदवार ज्यांचा निकाल २०२५ पर्यंत लागणार आहे. ज्यांना आतापर्यंत किमान सरासरी ७० टक्के गुण मिळाले आहेत (१० पैकी ७ सीजीपीए). इतर इंजिनीअरिंग डिसिप्लिनचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र नाहीत. ज्या उमेदवारांनी २०२४ किंवा त्यापूर्वी पदवी उत्तीर्ण केलेली आहे असे उमेदवार पात्र नाहीत.

● निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची दि. ३० मार्च २०२५ रोजी लेखी परीक्षा (टेक्निकल आणि अॅप्टिट्यूड परीक्षा) घेतली जाईल. एप्रिल २०२५ दरम्यान इंटरह्यू घेतले जातील. यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांना मे २०२५ मध्ये स्कॉलरशिप लेटर प्रदान केले जातील. निवड झालेल्या उमेदवारांना कोर्स जॉईन होण्यापूर्वी रु. १२ लाखाचे हमीपत्र सही करावे लागेल.

शंकासमाधानासाठी BIS@LARSENTOUBRO. COM वर संपर्क साधा.

● अर्ज कसा करावा – ऑनलाइन अर्ज www. lntecc. com या संकेतस्थळावर careers लिंकमधून ‘ Apply now for Build India Scholarship 2023 वर क्लिक करून करून दि. १२ मार्च २०२५ पर्यंत करावा.

भरती प्रक्रियेदरम्यान एल अँड टी कोणत्याही प्रकारची फी घेत नाही.

suhaspatil237 @gmail. Com

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity recruitment at bank of baroda amy