स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ६०० ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांची भरती. (अजा – ८७, अज – ४३ १४, इमाव – १५८, ईडब्ल्यूएस् – ५८, खुला – २४०) दिव्यांग उमेदवारांसाठी ६८ पदे राखीव. यातील ४४ पदे बॅकलॉगमधील आहेत.
पात्रता : (दि. ३ एप्रिल २०२५ रोजी) पदवी (कोणत्याही शाखेतील).
वयोमर्यादा : (दि. १ एप्रिल २०२४ रोजी) २१ ते ३० वर्षे
निवड पद्धती: फेज-१ – ऑनलाइन प्रीलिमिनरी एक्झामिनेशन (दि. ८ ते १५ मार्च २०२५ दरम्यान)
फेज-२ – मुख्य परीक्षा एप्रिल/मे, २०२५ मध्ये घेतली जाईल. फेज-३ – सायकोमेट्रिक टेस्ट – Personality Profiling करिता उमेदवारांची सायकोमेट्रिक टेस्ट मे/जून २०२५ मध्ये घेतली जाईल.
ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी केंद्र : औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/ टटफ.
पूर्व परीक्षेचा निकाल एप्रिल २०२५ मध्ये, मुख्य परीक्षेचा निकाल मे/जून २०२५ मध्ये आणि अंतिम निकाल मे/जून २०२५ मध्ये जाहिर केला जाईल.
परीक्षा शुल्क : खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस् – रु. ७५०/-.
निवडलेल्या उमेदवारांना बँकींग नॉलेजचे बेसिक ट्रेनिंगसाठीच्या ऑनलाइन कोर्स रुजू होण्यापूर्वी पूर्ण करावा लागेल. त्यांना प्रोबेशनरी ऑफिसर पदावर २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज https:// bank. sbi/ web/ careers/ current- openings या संकेतस्थळावर दि. १६ जानेवारी, २०२५ पर्यंत करावेत.
शंकासमाधानासाठी हेल्पडेस्क फोन नं. ०२२-२२८२०४२७. (कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत) ई-मेल http:// cgrs. ibps. in मेलच्या सब्जेक्टमध्ये लिहा ‘Recruitment of Probationary Officers in State Bank of India – 2024’
suhaspatil237 @gmail. com