● इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स ( ITBP), गृह मंत्रालय, भारत सरकार पुरुष/महिला उमेदवारांची ‘सब-इन्स्पेक्टर (टेलिकम्युनिकेशन), हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) आणि कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन)’च्या एकूण ५२६ पदांवर भरती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१० टक्के पदे माजी सैनिकांसाठी राखीव आहेत. वेतन श्रेणी – सब-इन्स्पेक्टर लेव्हल-६, (रु. ३५,४०० – १,१२,४००) मूळ वेतन रु. ३५,४००/-; हेड कॉन्स्टेबल लेव्हल-४, (रु. २५,५०० – ८१,१००) मूळ वेतन रु. २५,५००/-; कॉन्स्टेबल पदासाठी लेव्हल-३ (रु. २१,७०० – ६९,१००) मूळ वेतन रु. २१,७००/-. महागाई भत्ता ५३% रेशन मनी, स्पेशल कॉम्पेन्सेटरी अलाऊन्स, मोफत निवास अथवा एचआरए ट्रान्सपोर्ट अलाऊन्स. एलटीसी, मोफत वैद्याकिय सुविधा इ. तसेच उमेदवारांना ‘ New Restructured Defined Contributory Pension Scheme’ (नविन पेंशन स्कीम) लागू असेल.
रिक्त पदांचा तपशिल –
(१) सब इन्स्पेक्टर (टेली कम्युनिकेशन) (ग्रुप-बी) – एकूण ९२ पदे.
पुरुष – ७८ पदे (अजा – १२, अज – ६, इमाव – २१, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ३१).
महिला – १४ पदे (अजा – १२, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६).
पात्रता – इ. रू. ( PCM/आयटी/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेशन)
किंवा B. C. A. किंवा इ. ए. (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इन्स्ट्रूमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/आयटी)
किंवा असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा इन्स्ट्रूमेंटेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रिकल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअर्स किंवा समतूल्य.
(२) हेड कॉन्स्टेबल (टेली कम्युनिकेशन) (ग्रुप-सी) – ३८३ पदे.
पुरुष – ३२५ पदे (अजा – ५०, अज – २६, इमाव – ९०, ईडब्ल्यूएस – ३६, खुला – १२३).
महिला – ५८ पदे (अजा – ९, अज – ५, इमाव – १६, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २२).
पात्रता – ( i) १२ वी उत्तीर्ण (फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषयांसह सरासरी ४५ टक्के गुण)
किंवा ( ii) १० वी आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट
किंवा ( iii) १० वी ( PCM विषयांसह) आणि इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन /इन्स्ट्रूमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग डिप्लोमा (३ वर्षं कालावधीसह).
(३) कॉन्स्टेबल (टेली कम्युनिकेशन) (ग्रुप-सी) – ५१ पदे.
पुरुष – ४४ पदे (अजा – ७, अज – २, इमाव – ११, ईडब्ल्यूएस – ५, खुला – १९).
महिला – ७ पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३).
पात्रता – १० वी उत्तीर्ण. इष्ट पात्रता – ( Desirable) आयटीआय किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स.
खालील पात्रताधारक उमेदवारांना बोनस गुण दिले जातील.
(१) टेलिकम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स संबंधित विषयातील पदवी – ५ गुण.
(२) टेलिकम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स संबंधित विषयातील डिप्लोमा – ३ गुण.
(३) टेलिकम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स संबंधित विषयातील आयटीआय सर्टिफिकेट – २ गुण.
(४) NCC ‘ उ’ सर्टिफिकेट. परीक्षेसाठी असलेल्या एकूण गुणांच्या ५%गुण.
(५) NCC ‘ B’ सर्टिफिकेट परीक्षेसाठी असलेल्या एकूण गुणांच्या ३% गुण.
(६) NCC ‘ अ’ सर्टिफिकेट. परीक्षेसाठी असलेल्या एकूण गुणांच्या २% गुण.
ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात बोनस गुणांसाठी निवड केली असेल, त्यांनाच बोनस गुण दिले जातील. यासाठी त्यांना कागदपत्र पडताळणीच्या वेळी संबंधित मूळ सर्टिफिकेट सादर करावे लागेल.
शारीरिक मापदंड – सर्व पदांसाठी – उंची – पुरुष – १७० सें.मी. (अनुसूचित जमाती – पुरुष – १६२.५ सें.मी.) महिला- १५७ सें.मी. (अज – १५० सें.मी.)), छाती – पुरुष – ८०-८५ सें.मी. हेड-कॉन्स्टेबल/कॉन्स्टेबल पदांसाठी – अज – ७६-८१ सें.मी. सब-इन्स्पेक्टर – अज – ७७-८२ सें.मी. दृष्टी – जवळची दृष्टी (चष्म्याशिवाय) – चांगला डोळा एन-६, खराब डोळा एन-९; दूरची दृष्टी (चष्म्याशिवाय) चांगला डोळा ६/६, खराब डोळा ६/९ (चष्मा किंवा इतर पद्धतीने केलेले visual correction चालत नाही.).
वयोमर्यादा – सब-इन्स्पेक्टर – २०-२५ वर्षे, हेड कॉन्स्टेबल – १०-२५ वर्षे, कॉन्स्टेबल – १८-२३वर्षे. कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, माजी सैनिक – सैन्य दलातील सेवाकाल ३ वर्षे.
पात्रता व वयोमर्यादेसाठी कटऑफ डेट आहे १४ डिसेंबर २०२४.
टॅटू – धार्मिक भावना दर्शविणारे डाव्या हातावरील ( Left forearm) आतील बाजूस (कोपर ते हात) असलेले कोपर ते हात यामधील भागाच्या १/४ आकारापेक्षा कमी आकाराचे टॅटू चालू शकतात.
निवड पद्धती – PET/ PST च्यावेळी उमेदवारांची बायोमेट्रिक ओळख पटविली जाईल. त्यांनी ऑनलाईन अर्जाची आणि अॅडमिटकार्डची प्रिंटआऊट सादर करणे आवश्यक. फेज-१ – शारीरिक क्षमता चाचणी ( PET) (फक्त पात्रता स्वरूपाची) पुरुष – १.६ कि.मी. अंतर ७.३० मिनिटांत धावणे, १०० मीटर अंतर १६ सेकंदांत धावणे, लांब उडी – ११ फूट, उंच उडी – ३ १/२ फूट. महिला – ८०० मीटर अंतर ४ मि. ४५ सेकंदांत धावणे; १०० मीटर अंतर १८ सेकंदांत धावणे. लांब उडी – ९ फूट, उंच उडी – ३ फूट (१०० मीटर अंतर धावण्याची स्पर्धा फक्त सब-इन्स्पेक्टर पदांसाठीच आहे.) लांब उडी आणि उंच उडीसाठी ३ प्रयत्न दिले जातील.
शारीरिक मापदंड चाचणी ( PST) – उमेदवारांची उंची, वजन आणि छाती (फक्त पुरुष उमेदवारांची) मोजली जाईल. उमेदवार अपात्र ठरल्यास त्याच दिवशी प्रीसायडिंग ऑफिसरकडे लेखी अपिल करू शकतात.
फेज-२ कॉन्स्टेबल पदासाठी लेखी परीक्षा (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे) १०० प्रश्न/१०० गुण, वेळ २ तास. (जनरल इंग्लिश किंवा जनरल हिंदी – २० प्रश्न, जनरल अवेअरनेस – २५ प्रश्न, रिझनिंग अॅबिलिटी – २५ प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ३० प्रश्न.
हेड कॉन्स्टेबल – १०० ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न (१० २ ( PCM) लेव्हलवरील) एकूण १०० गुण, वेळ २ तास. (जनरल इंग्लिश किंवा जनरल हिंदी – २० प्रश्न, जनरल अवेअरनेस – १५ प्रश्न, रिझनिंग अॅबिलिटी – १५ प्रश्न, फिजिक्स – २० प्रश्न, केमिस्ट्री – १० प्रश्न, मॅथ्स – २० प्रश्न).
सब-इन्स्पेक्टर – पेपर-१ १०० ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न – १०० गुण, वेळ २ तास (जनरल इंग्लिश किंवा जनरल हिंदी – ३० प्रश्न, जनरल अवेअरनेस – ३५ प्रश्न, रिझनिंग अॅबिलिटी – ३५ प्रश्न).
पेपर-२ १०० प्रश्न, ऑब्जेक्टिव्ह टाईप १०० प्रश्न, वेळ २ तास (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल या ८ विषयांवर प्रत्येकी १० प्रश्न, कम्युनिकेशन – २० प्रश्न).
प्रत्येक प्रश्नास १ गुण. (चुकीच्या उत्तरासांठी गुण वजा केले जाणार नाहीत.) उत्तरतालिका ( Answer Key) लेखी परीक्षा पूर्ण झाल्यावर ( ITBP च्या https:// recruitment. itbpolice. nic. in या संकेतस्थळावर) अपलोड केल्या जातील.
फेज-३ – लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना कागदपत्र पडताळणी ( DV) साठी बोलाविले जाईल. लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार कॅटेगरीनिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन ( DME) आणि रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन ( RME) साठी बोलाविले जाईल.
फेज-४ – डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन ( DME) होईल. अपात्र ठरल्यास Annexure- VII मध्ये अर्ज करून रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन ( RME) २४ तासांच्या आत मागता येईल.
PET/ PST, लेखी परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड ऑनलाइन https:// recruitment. itbpolice. nic. in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील. निवड झालेल्या उमेदवारांना बेसिक ट्रेनिंग आणि इतर कोर्सेस दिले जातील. निवडलेल्या उमेदवारांना २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.
निवडलेल्या उमेदवारांना ITBPF मध्ये किमान १० वर्षे सेवा द्यावी लागेल. १० वर्षांची सेवा पूर्ण व्हायच्या आत उमेदवाराला राजीनामा द्यावयाचा असेल तर त्यांना ३ महिन्यांसाठी मिळालेल्या वेतना एवढी रक्कम परत करावी लागेल किंवा ट्रेनिंगसाठी झालेला खर्च परत द्यावा लागेल.
उमेदवारांनी रिक्रूटमेंट सेंटरवर १ ते २ दिवस राहण्याची व्यवस्था स्वत करावी लागेल. अजा/अज उमेदवारांनी Annexure- I, इमाव उमेदवारांनी Annexure- II आणि Annexure- IIA, Bडब्ल्यूएस उमेदवारांनी Annexure- III, उंची/छाती मोजमापात सूट घेवू इच्छिणाऱया उमेदवारांनी Annexure- V मधील नमुन्यातील दाखले सादर करणे आवश्यक.
शंकासमाधानासाठी हेल्पलाईन नंबर – ०११-२४३६९४८२/२४३६९४८३, ई-मेल आयडी – comdtrect@itbp. gov. in
अर्जाचे शुल्क – कॉन्स्टेबल/हेड कॉन्स्टेबल – रु. १००/-, सब-इन्स्पेक्टर – रु. २००/-.
ऑनलाइन अर्ज https:// recruitment. itbpolice. nic. in या संकेतस्थळावर १४ डिसेंबर २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.