आयडीबीआय बँक लिमिटेड (IDBI Bank Ltd.) ‘ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड-ओ – जनरालिस्ट’ आणि ‘स्पेशालिस्ट अॅग्री असेट ऑफिसर ( AAO)’ पदांची भरती. (Advt. No. १०/२०२४-२५ दि. २० ऑक्टोबर २०२४) ( A) ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड-ओ ‘जनरालिस्ट’ – एकूण रिक्त पदे – ५००.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झोननिहाय रिक्त पदांचा तपशील – (कंसात राज्य आणि स्थानीय भाषा दिल्या आहेत.)

(१) मुंबई – (महाराष्ट्र – स्थानिय भाषा – मराठी) – १२५ पदे (अजा – १८, अज – ९, इमाव – ३३, ईडब्ल्यूएस – १२, खुला – ५३) (५ पदे दिव्यांग कॅटेगरी VH – १, HH – १, OH – २, MD/ ID – १ साठी राखीव).

(२) नागपूर – (महाराष्ट्र – स्थानिय भाषा – मराठी) – ५० पदे (अजा – ७, अज – ३, इमाव – १३, ईडब्ल्यूएस – ५, खुला – २२) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी VH – १, MD/ ID – १ साठी राखीव).

(३) पुणे – (गोवा-महाराष्ट्र – स्थानिय भाषा – कोंकणी, मराठी) – ६० पदे (अजा – ९, अज – ४, इमाव – १६, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २५) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी HH – १, OH – १ साठी राखीव).

(४) अहमदाबाद – (दादरा नगर हवेली/ दमण दीव/ गुजरात – स्थानिय भाषा – गुजराती) ७०.

(५) बेंगलुरू – (कर्नाटक – स्थानीय भाषा – कन्नाडा) ६५.

(६) चंदीगड – ५.

(७) चेन्नई – ५०.

(८) कोची – ३०.

पात्रता : (दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) किमान ६० गुणांसह उत्तीर्ण (खुला, इमाव, ईडब्ल्यूएस), अजा/ अज/ दिव्यांग – ५५ टक्के गुण.

पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी काढताना ‘ fraction of percentage to be ignored’ उदा. ५५.९९ टक्के गुणांसाठी ५५ टक्के गुणच विचारात घेतले जातील. सरासरी टक्केवारी काढतना सर्व विषयांतील (major/ minor/ subsidiary/ ancillary/ elective/ qualifying etc.) गुण विचारात घेतले जातील.

(B) ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड-ओ ‘स्पेशालिस्ट अॅग्रि असेट ऑफिसर (AAO)’ – एकूण रिक्त पदे – १०० (अजा – १५, अज – ९, इमाव – २६, ईडब्ल्यूएस – १०, खुला – ४०) (४ पदे दिव्यांग कॅटेगरी VH, HH, OH, MD/ ID साठी प्रत्येकी १ पद राखीव) (ही पदे संपूर्ण देशभरातील आहेत).

पात्रता : ४ वर्षं कालावधीची बी.एससी./ बी.टेक./ बी.ई. (अॅग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, अॅग्रिकल्चर इंजिनिअरींग, फिशरी सायन्स/ इंजिनिअरींग, अॅनिमल हजबंडरी, वेटरिनरी सायन्स, फॉरेस्ट्री, डेअरी सायन्स/ टेक्नॉलॉजी, पिस्सीकल्चर, अॅग्रो फॉरेस्ट्री, सेरिकल्चर) पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा : (दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी) २०२५ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/ १३/ १५ वर्षे)

वेतन : रु. ६.१४ लाख ते रु. ६.५० लाख प्रति वर्ष (सीटीसी).

नेमलेल्या उमेदवारांना IDBI बँकेची नवीन पेन्शन स्कीम लागू असेल.

प्रोबेशन : कालावधी १ वर्षाचा असेल.

निवड पद्धती : ऑनलाइन टेस्ट (OT), कागदपत्र पडताळणी (DV), पर्सोनल इंटरव्ह्यू (PI) आणि भरतीपूर्व मेडिकल टेस्ट (PRMT) यांचा समावेश असेल.

ऑनलाइन टेस्ट : डिसेंबर २०२४/जानेवारी २०२५ मध्ये आयोजित केली जाईल. (१) लॉजिकल रिझनिंग, डेटा अॅनालिसिस अँड इंटरप्रिटेशन – ६० प्रश्न, वेळ ४० मिनिटे. (२) इंग्लिश लँग्वेज – ४० प्रश्न, वेळ २० मिनिटे. (३) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ४० प्रश्न, वेळ ३५ मिनिटे. (४) जनरल इकॉनॉमी/ बँकिंग अवेअरनेस/ कॉम्प्युटर/ आयटी – ६० प्रश्न, वेळ २५ मिनिटे.

प्रत्येक प्रश्नास १ गुण असेल. एकूण २०० गुण, २०० प्रश्न, वेळ २ तास.

AAO पदांसाठी ५ वा विषय – प्रोफेशनल नॉलेज – ६० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे. प्रत्येक सेक्शनमध्ये पात्रतेसाठी नेमून दिलेले किमान गुण (कटऑफ गुण) इंटरव्ह्यूकरिता शॉर्टलिस्ट होण्याकरिता प्राप्त करणे आवश्यक आहे. चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. इंटरव्ह्यू १०० गुणांसाठी घेतले जातील. इंटरव्ह्यूमधून पात्र होण्यासाठी किमान ५० टक्के गुण मिळविणे आवश्यक.

जोवर इंटरव्ह्यूची प्रक्रिया पूर्ण होत नाही आणि अंतिम निवड यादी बनविली जात नाही तोवर उमेदवारांचे ऑनलाइन टेस्टमधील गुण जाहीर केले जाणार नाहीत.

ऑनलाइन अर्जासोबत Annexure- I मध्ये सूचित केल्याप्रमाणे (i) फोटोग्राफ, (ii) स्वाक्षरी, (iii) thumb impression, (iv) handwritten declaration स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक.

उमेदवारांना फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येईल.

अर्जाचे शुल्क : रु. २५०/- अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांसाठी (फक्त इंटिमेशन चार्जेस), इतर उमेदवारांसाठी रु. १,०५०/-. ऑनलाइन पेमेंट झाल्यावर e- Receipt जनरेट होईल. जर e- Receipt जनरेट झाली नाही तर उमेदवारांनी प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड घालून पेमेंटची प्रक्रिया पुन्हा करावी.

PET साठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात नोंद करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज www. idbibank. in या संकेतस्थळावर दि. ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत करावेत. (Careers/ Current Openings gt; ‘ Recruitment of Junior Assistant Manager (JAM) Grade- O – २०२५-२६’-; Apply Online)

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity recruitment for officer posts at idbi bank career news amy