मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (MRVC) (भारत सरकार, रेल्वे मंत्रालयांतर्गत एक सार्वजनिक उपक्रम) (Advt. No. MRVC/ E/ PE/१/२०२४ dt. १४.११.२०२४) ‘प्रोजेक्ट इंजिनिअर (सिव्हील)’ पदांची करार पद्धतीने भरती.

पदाचे नाव : ‘प्रोजेक्ट इंजिनिअर (सिव्हील)’ २० पदे (अजा – ५, अज – २, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ७).

job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
KTCL Goa Bharti 2024 Job Opportunity in KTCL Recruitment
KTCL Goa Bharti 2024 : KTCLमध्ये नोकरीची संधी! कंडक्टरच्या ७० पदांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

पात्रता : (दि. १३ डिसेंबर २०२४ रोजी) सिव्हील इंजिनिअरींग किंवा समतूल्य पदवी किमान सरासरी ७० गुणांसह उत्तीर्ण. CGPA/ OGPA/ CPI/ DGPA मधील स्कोअरचे युनिव्हर्सिटीच्या निकषांप्रमाणे टक्केवारीत रूपांतर करणे.

सिव्हील इंजिनिअरींग/ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी असल्यास अतिरिक्त फायदा दिला जाईल.

अनुभव : संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा : (दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी) ३० वर्षेपर्यंत (इमाव – ३३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३५ वर्षेपर्यंत).

वेतन : एकत्रित वेतन दरमहा रु. ८४,०७०/-.

रजा : नैमित्तिक रजा – ८ दिवस, RH – २ दिवस, Half Pay Leave – २० दिवस प्रतीवर्ष, विशेष रजा – १२ दिवस प्रती वर्ष.

सुरुवातीला उमेदवारांना १ वर्षासाठी नेमणूक दिली जाईल. १ वर्षाची समाधानकारक कामगिरी पाहून कराराचा कालावधी १ वर्षानी वाढवून त्यांना ‘सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदावर नेमणूक दिली जाईल.

निवड पद्धती : प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना (रिक्त पदांच्या १:५ प्रमाणात) कागदपत्र पडताळणी आणि परस्पर संवाद (Interaction) साठी बोलाविण्यात येईल. इंटरह्यूमधील गुण, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव लक्षात घेऊन उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्जाचा विहीत नमुना https:// mrvc. indianrailways. gov. in या संकेतस्थळावरील जाहिरातीमधील Annexure- I मध्ये उपलब्ध आहे.

विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेल्या अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे : शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा (१० वीचे प्रमाणपत्र/जन्माचा दाखला), आधारकार्ड/ पॅनकार्डची प्रत, जातीचा दाखला अजा/अजसाठी Annexure- II व इमावसाठी Annexure- III मधील नमुन्याप्रमाण; Annexure- IV मधील नमुन्यातील EWS दाखला ; अनुभवाचा दाखला; सरकारी खात्यात/ PSUs/स्वायत्त संस्थांमध्ये कार्यरत असल्यास ना हरकत दाखला (NOC); चारित्र्याचा दाखला (राजपत्रित अधिकारी/ कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला)

आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रतींसह विहीत नमुन्यातील अर्जाची प्रत career@mrvc.gov.in या ई-मेल आयडीवर मेलद्वारे दि. १३ डिसेंबर २०२४ पर्यंत पाठवावेत.