इंडिया पोस्ट (मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन) देशभरातील ३९ पोस्टल सर्कल्समध्ये ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांची भरती. एकूण रिक्त पदे – २१,४१३.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत येणाऱया ग्रामीण डाक सेवक ब्रँच ऑफिसेसमध्ये ‘ब्रँच पोस्ट मास्टर (BPM)’, ‘असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM)’ च्या एकूण १,४९८ पदांची भरती. (अजा – १३७, अज – १३४, इमाव – ३२८, ईडब्ल्यूएस् – १४९, दिव्यांग – ए – १५, बी – २१, सी – १७, डी ई – १, खुला – ६९६)

पदनिहाय कामाचे स्वरूप : (१) ब्रँच पोस्टमास्टर ( BPM) – ग्रामीण डाक सेवक ब्रँच पोस्ट ऑफिसचे काम सांभाळणे. इंडिया पोस्ट्स पेमेंट्स बँक ( IPPB) चे काम सांभाळणे आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱया गावातील/ग्रामपंचायतीमधील पोस्टाचा व्यवसाय सांभाळणे ब्रँच पोस्ट मास्टर हा ग्रामीण डाक सेवक ब्रँच ऑफिसचा प्रमुख असणार.

(२) असिस्टंट ब्रँच मास्टर ( ABPM) – स्टॅंप/ स्टेशनरी यांची विक्री, एकूण टपालाची वाहतूक व वितरण, IPPB च्या कामात व पोस्टाच्या इतर कामात ब्रँच पोस्ट मास्टरना मदत करणे.

(३) डाक सेवक – लाइन सब ऑफिसेस, हेड पोस्ट ऑफिसेस आणि रेल्वे मेल सर्व्हिसेस ऑफिसेस इ. मध्ये काम करावे लागेल.

पात्रता : दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्व पदांसाठी – ( i) १० वी (एस्एस्सी) उत्तीर्ण (गणित, स्थानिय भाषा आणि इंग्रजी विषयांसह).

(ii) पोस्टल सर्कलसाठी नेमलेली ऑफिशियल लँग्वेज उमेदवारांना अवगत असणे आवश्यक.

(iii) उमेदवारांनी डिपार्टमेंटल सॉफ्टवेअरवर काम करण्यासाठी कॉम्प्युटर/ लॅपटॉप/ POS/ मोबाईल इ. चालविण्याचे पुरेसे ज्ञान असल्याचे घोषणापत्र दाखल करणे आवश्यक आहे.

(iv) उमेदवारांना सायकल चालविता येणे बंधनकारक आहे. सायकल ऐवजी स्कूटर/मोटर सायकल चालविता येत असेल तरी चालणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करण्याच्या रोजी १८ ते ४० वर्षे.

टाईम रिलेटेड कंटीन्यूइटी अलाऊन्स (TRCA) महागाई भत्ता – ब्रँच पोस्ट मास्टर्स ( BPM) यांना दरमहा रु. १२,००० – २९,३८० व ABPM/डाक सेवक यांना रु. १०,००० – २४,४७० TRCA दिले जातील. उमेदवार भारत सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या महागाई भत्ता मिळण्यास पात्र असतील. अर्जाचे शुल्क : रु. १००/-

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले नाव https:// indiapostgdsonline. gov. in या पोर्टलवर रजिस्टर करावयाचे आहे.

ऑनलाइन अर्ज https:// indiapostgdsonline. gov. in/ या संकेतस्थळावर दि. ३ मार्च २०२५ पर्यंत करावेत.

suhaspatil237 @gmail. com