सॉफ्टवेअर (SBU) सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), बंगळुरू (संरक्षण मंत्रालयांतर्गत, भारत सरकारचा उपक्रम)च्या इंदौर, मध्यप्रदेश येथील सॉफ्टवेअर (SBU) सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरमध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर आणि ट्रेनिंग इंजिनीअर’ पदांची तात्पुरत्या स्वरूपात ३ वर्षांसाठी करार पद्धतीने भरती. एकूण रिक्त पदे – ४०.
(I) प्रोजेक्ट इंजिनिअर- I : ५ पदे (अजा – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस् – १, खुला – २).
पात्रता : बी.ई./बी.टेक. (कोणत्याही विषयातील) उत्तीर्ण आणि सॉफ्टवेअर/आयटीमधील २ वर्षांचा अनुभव.
(II) ट्रेनी इंजिनिअर- I : ३५ पदे (अजा – ५, अज – ३, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १५).
पात्रता : बी.ई./बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/आयटी/इन्फॉरमेशन सायन्स) C किंवा Java किंवा Python या प्रोग्रामिंग लँग्वेजेस डेव्हलपमेंटचे ज्ञान असावे.
प्रोजेक्ट इंजिनीअर पदांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील अनुभव असल्यास प्राधान्य राहील.
हेही वाचा >>> रतन टाटा यांची बिझनेस ऑफर नाकारली आणि वर्षभरात कमावले २३०० कोटी रुपये, वाचा जयंती चौहान यांच्या यशाचं सीक्रेट
उमेदवाराकडे इंजिनीअरिंग पदवीच्या सर्व सेमिस्टर्सच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक. CGPA ग्रेडींग गुणांमध्ये रूपांतरित करण्याचा ‘ Conversion Certificate’ अर्जासोबत देणे अनिवार्य.
वयोमर्यादा : (दि. १ डिसेंबर २०२४ रोजी) टेनी इंजिनीअर – २८ वर्षे. प्रोजेक्ट इंजिनीअर – ३२ वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)
ट्रेनी इंजिनिअर पदांवर सुरुवातीला २ वर्षांकरिता नेमणूक दिली जाईल. जी आणखी १ वर्षाने वाढविली जावू शकते.
वेतन : पहिल्या वर्षी रु. ३०,०००/-, दुसऱ्या वर्षी रु. ३५,०००/-, तिसऱ्या वर्षी रु. ४०,०००/-.
प्रोजेक्ट इंजिनीअर पदांवर सुरुवातीला ३ वर्षांसाठी नेमणूक दिली जाईल. जी आणखी १ वर्षाने वाढविली जाईल. त्यांनी ४ वर्षं पूर्ण केल्यानंतर Retention Bonus रु. १ लाख दिला जाईल. प्रोजेक्ट इंजिनीअरसाठी पहिल्या वर्षी रु. ४०,०००/- वेतन दिले जाईल, जे दरवर्षी रु. ५,०००/- ने वाढविले जाईल.
निवड पद्धती : शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. प्रोजेक्ट इंजिनीअर पदांसाठी लेखी परीक्षेतून पर्सोनल इंटरव्ह्यूकरिता उमेदवार रिक्त पदांच्या १:५ या प्रमाणात निवडले जातील. लेखी परीक्षेतील ८५ गुण व इंटरव्ह्यूमधील १५ गुण देऊन अंतिम निवड केली जाईल. ट्रेनी इंजिनीअर पदांची निवड १०० गुणांच्या लेखी परीक्षेतील कामगिरीवर आधारित केली जाईल. उमेदवारांना परीक्षेचे ठिकाण आणि वेळ ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
लेखी परीक्षा/इंटरव्ह्यूकरिता निवडलेल्या उमेदवारांची यादी/अंतिम निवड यादी www.bel-india.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.
अर्जाचे शुल्क : ट्रेनी इंजिनिअर- I रु. १७७/- (रु. १५०/- + १८ जीएस्टी). प्रोजेक्ट इंजिनिअर – रु. ४७२/- (रु. ४००/- + १८ जीएसटी) (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.)
अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने SBI Collect द्वारे भरावयाचे आहे. खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस उमेदवारांनी अर्जाचे शुल्क भरल्यावर एक ‘ SBI Collect reference No.’ जनरेट होईल. तो ऑनलाइन अर्जामध्ये इतर माहिती भरण्यापूर्वी भरणे आवश्यक आहे.
शंकासमाधानासाठी ई-मेल : hrsoftware@bel.co.in फोन नं. ०८०-२२१९७१६०
विस्तृत माहिती www.bel-india.in/careers/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज http://www.bel-india.in या संकेतस्थळावरील लिंकमधून दि. १ जानेवारी २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यावर अॅप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआऊट काढणे आवश्यक. त्यावर पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून अर्जासोबत आवश्यक ती स्वयंसाक्षांकीत कागदपत्रे जोडून पुढील पत्त्यावर दि. १ जानेवारी २०२५ पर्यंत पोहोचतील अशी फक्त साध्या पोस्टाने पाठविणे आवश्यक.
न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीत ‘असिस्टंट’ची ५०० रिक्त पदे
न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) (भारत सरकारचा उपक्रम), मुंबई. ५०० असिस्टंट (क्लास III कॅडर) पदांची भरती. (Ref. No. CORP. HRM/ Asstt/२०२४ १६.१२.२०२४)
पदाचे नाव – असिस्टंट (क्लास III कॅडर). एकूण रिक्त पदे – ५०० (अजा – ९१, अज – ५१, इमाव – ४८, ईडब्ल्यूएस – ५०, खुला – २६०)
राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशिल (कंसात स्थानिय भाषा दिलेली आहे.) – महाराष्ट्र (मराठी) – १०५ पदे (अजा – २३, अज – ८, इमाव – १, ईडब्ल्यूएस- ११, खुला – ६२) (५ पदे दिव्यांगसाठी राखीव) (कॅटेगरी VI – २, HI – १, OC – १, ID/ MD – १); गोवा (कोंकणी) – ८ पदे (इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५); गुजरात (गुजराती) – ५० पदे. कर्नाटक (कन्नड) – ५० पदे; मध्य प्रदेश (हिंदी) – ४० पदे; राजस्थान – १५ पदे (हिंदी); उत्तर प्रदेश – २४ पदे (हिंदी); उत्तराखंड – ४ पदे (हिंदी) इ.
पात्रता : (दि. १ डिसेंबर २०२४ रोजी) कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. (उमेदवार १० वी/१२ वी/पदवी स्तरावर इंग्रजी विषयात उत्तीर्ण असावा. तसेच प्रादेशिक भाषा अवगत असावी. (लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक.))
वयोमर्यादा : (दि. १ डिसेंबर २०२४ रोजी) २१ ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे) (पुनर्विवाह न केलेल्या विधवा/घटस्फोटित/कायद्याने विभक्त महिला – ५ वर्षे; NIACL चे कर्मचारी – ५ वर्षे).
वेतन : बेसिक पे रु. २२,४०५/-, अंदाजे दरमहा वेतन रु. ४०,०००/-.
निवड पद्धती : टियर-१ प्रीलिमिनरी ऑनलाइन एक्झामिनेशन – ऑब्जेक्टिव्ह टाईप १०० गुणांसाठी (इंग्लिश लँग्वेज – ३० गुण, रिझनिंग अॅबिलिटी – ३५ गुण, न्यूमरिकल अॅबिलिटी – ३५ प्रश्न, प्रत्येकी वेळ २० मिनिटे, एकूण वेळ १ तास.)
टियर-२ मेन एक्झामिनेशन – ऑब्जेक्टिव्ह टेस्ट २५० गुणांसाठी आणि डिस्क्रीप्टिव्ह टेस्ट ३० गुणांसाठी.
ऑब्जेक्टिव्ह टेस्ट – २०० गुण, वेळ २ तास. (रिझनिंग – ४० प्रश्न, ५० गुण, वेळ ३० मिनिटे; इंग्लिश लँग्वेज – ४० प्रश्न, ५० गुण, वेळ ३० मिनिटे; जनरल अवेअरनेस – ४० प्रश्न, ५० गुण, वेळ १५ मिनिटे; न्यूमरिकल अॅबिलिटी – ४० प्रश्न, ५० गुण, वेळ ३० मिनिटे; कॉम्प्युटर नॉलेज – ४० प्रश्न, ५० गुण, वेळ १५ मिनिटे)
रिजनल लँग्वेज टेस्ट (डिस्क्रीप्टिव्ह टेस्ट) फक्त पात्रता स्वरूपाची असेल.
ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपरमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.
अंतिम निवड – स्थानिय भाषेच्या पेपरमध्ये उत्तीर्ण उमेदवारांची निवड यादी वैद्याकिय तपासणीनंतर ऑनलाइन मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल.
टियर-१ – पूर्व परीक्षा केंद्र – महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/नवी मुंबई/ ठाणे/ MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी.
प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग – अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग उमेदवारांना प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंगकरिता ऑनलाइन अर्ज करताना तशी नोंद करावी लागेल.
प्रोबेशन कालावधी ६ महिन्यांचा असेल जो आणखीन वाढविला जावू शकतो.
अर्जाचे शुल्क :- अजा/अज/दिव्यांग रु. १००/- इतर उमेदवारांना रु. ८५०/-.
ऑनलाइन अॅप्लिकेशन रजिस्ट्रेशन https://www.newindia.co.in (Recruitment Section) या संकेतस्थळावर १ जानेवारी २०२५ पर्यंत करावे.
टियर-१ परीक्षा २७ जानेवारी २०२५ रोजी घेतली जाईल. टियर-२ मुख्य परीक्षा २ मार्च २०२५ रोजी घेतली जाईल.