● नवी मुंबई महानगरपालिका ं( NMMC) – गट-क व गट-ड मधील विविध पदांची सरळसेवा भरती. एकूण रिक्त पदे – ६२०. ( I) गट-ड मधील पदे –
(१) कक्षसेवक (वॉर्डबॉय) २९ (अजा – ७, विजा-अ – १, भज-ब – २, भज-क – १, इमाव – ८, साशैमाव – ३, आदुघ – ३, खुला – ४).
(२) कक्षसेविका (आया) २८ (अजा – ३, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, विमाप्र – १, इमाव – १५, साशैमाव – ३, आदुघ – ३, खुला – ०).
(३) शवविच्छेदन मदतनीस – ४ (अजा – १, विजा-अ – १, इमाव – १, खुला – १).
पद क्र. १ ते ३ साठी पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि शासकीय/स्थानिय स्वराज्य संस्था/खासगी रुग्णालयातील संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.
( II) गट-क मधील पदे –
(४) लेखा लिपीक – ५८ (अजा – ८, अज – ४, विजा-अ – २, भज-ब – २, भज-क – २, भज-ड – १, विमाप्र – १, इमाव – ६, साशैमाव – ६, आदुघ – ६, खुला – १९).
पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी, टंकलेखनाचे प्रमाणपत्र – मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी – ४० श.प्र.मि.
(५) लिपीक टंकलेखक – १३५ (अजा – १०, अज – १२, विजा-अ – ४, भज-ब – २, भज-क – ५, भज-ड – ४, विमाप्र – १, इमाव – २५, साशैमाव – १४, आदुघ – १४, खुला – ४४).
पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण, टंकलेखनाचे प्रमाणपत्र – मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.
(६) उद्यान सहाय्यक – ४ (अजा – १, अज – १, विजा-अ – १, साशैमाव – १).
पात्रता – बी.एससी. (हॉर्टिकल्चर अॅग्रिकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री) पदवी किंवा बी.एससी. (बॉटनी).
(७) सहाय्यक ग्रंथपाल – ८ (अजा – १, अज – १, विजा-अ – १, इमाव – १, साशैमाव – १, आदुघ – १, खुला – २).
पात्रता – ग्रंथालय शाखेची पदवी (८) शस्त्रक्रियागृह सहाय्यक – १५ (अजा – १, अज – १, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, भज-ड – १, इमाव – ३, साशैमाव – २, आदुघ – २, खुला – २).
पात्रता – १२ वी जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण आणि २ वर्षांचा अनुभव.
(९) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) ५१ (अजा – ७, अज – ३, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – १, विमाप्र – १, इमाव – १०, साशैमाव – ५, आदुघ – ५, खुला – १५).
पात्रता – १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण.
(१०) ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ( ANM) – ३८ (अजा – ८, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – १, इमाव – ४, साशैमाव – ४, आदुघ – ४, खुला – १४)
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि A. N. M. अभ्यासक्रम पूर्ण आणि नर्सिंग काऊन्सिलची नोंदणी.
(११) बायोमेडिकल इंजिनीअर सहाय्यक – ६ (अजा – १, विजा-अ – १, इमाव – १, साशैमाव – १, खुला – २).
पात्रता – १० वी आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेडमधील आयटीआय आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(१२) आरोग्य सहाय्यक (महिला) १२ (अजा – २, अज – १, विजा-अ – १, भज-ब – १, इमाव – २, साशैमाव – १, आदुघ – १, खुला – ३).
पात्रता – १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव.
(१३) औषध निर्माता/औषध निर्माण – १२ (अजा – ३, इमाव – ५, साशैमाव – १, आदुघ – १, खुला – २).
पात्रता – बी.फार्म. पदवी, महाराष्ट्र फार्मसी काऊन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(१४) सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट) ५ (अज – १, विजा-अ – १, इमाव – १, साशैमाव – १, आदुघ – १).
पात्रता – सूक्ष्म जीवशास्त्रातील पदवी आणि किमान १०० खाटांच्या हॉस्पिटल निर्जंतुकीकरण कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(१५) ई.सी.जी. तंत्रज्ञ – ८ (अजा – १, अज – १, विजा-अ – १, इमाव – १, साशैमाव – १, आदुघ – १, खुला – २).
पात्रता – बी.एससी. , ई.सी.जी. टेक्निशियन विषयाचे प्रशिक्षण, संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(१६) सांख्यिकी सहाय्यक – ३ (अज – १, विजा-अ – १, खुला – १).
पात्रता – सांख्यिकी विषयासह पदवी आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(१७) डायलिसिस तंत्रज्ञ – ४ (अजा – १, विजा-अ – १, इमाव – १, साशैमाव – १).
पात्रता – विज्ञान शाखेची पदवी/डी.एम.एल.टी., ६ महिन्यांचा डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण, संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(१८) स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ – १३१ (अजा – १३, अज – १०, विजा-अ – २, भज-क – २, भज-ड – २, विमाप्र – १, इमाव – २९, साशैमाव – १३, आदुघ – १३, खुला – ४६).
पात्रता – बी.एससी. (नर्सिंग) किंवा जीएनएम डिप्लोमा आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आणि महाराष्ट्र नर्सिंग काऊन्सिलची नोंदणी.
(१९) डेंटल हायजिनिस्ट – ३ (अजा – १, विजा-अ – १, खुला – १).
पात्रता – १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण, दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण, संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(२०) वैद्याकिय समाजसेवक – १५ (अजा – ३, विजा-अ – १, भज-ब – १, इमाव – ३, साशैमाव – २, आदुघ – २, खुला – ३).
पात्रता – समाजशास्त्र शाखेची पदवी/एम.एस.डब्ल्यू. (वैद्याकिय समाजसेवक) पदवी आणि २०० रुग्ण खाटा रुग्णालयातील २ वर्षांचा अनुभव.
(२१) कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनीअर) ६ (अजा – १, विजा-अ – १, इमाव – १, साशैमाव – १, खुला – २).
पात्रता – बायोमेडिकल इंजिनीअरिंग पदवी किंवा पदविका आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(२२) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ३५ (अजा – ११, भज-ब – १, भज-ड – २, इमाव – १३, साशैमाव – ४, आदुघ – ४).
पात्रता – सिव्हील इंजिनीअरिंग पदवी.
(२३) ते (३०) बायोमेडिकल इंजिनीअर – १ (खुला), सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी – १ (खुला), आहार तंत्रज्ञ – १ (अजा), नेत्रचिकित्सा सहाय्यक – १ (विजा-अ), पशुधन पर्यवेक्षक – २ (अजा – १, खुला – १), वायरमन – २ (इमाव – १, साशैमाव – १), ध्वनी चालक – १ (खुला).
सर्व पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – (दि. ११ मे २०२५ रोजी) १८ ते ३८ वर्षे
परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – रु. १,०००/-
परीक्षा – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी १०० प्रश्न, एकूण २०० गुण, वेळ २ तास. (मराठी – १०, इंग्रजी – १०, सामान्य ज्ञान – १०, बौद्धिक चाचणी – १०, संबंधित विषय – ६०) परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज www. nmmc. gov. in या संकेतस्थळावर ११ मे २०२५ पर्यंत करावेत.
suhaspatil237 @gmail. com