स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ‘स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर्स’च्या एकूण १,५११ पदांची नियमित स्वरूपात भरती. (Advt. No. CRPD/ SCO/२०२४-२५/१५) रिक्त पदांचा तपशील –

(१) असिस्टंट मॅनेजर (सिस्टीम्स) ( JMGS- I) – ७९८ पदे (अजा – १२१, अज – ६७, इमाव – २१२, ईडब्ल्यूएस – ७८, खुला – ३२०) (३२ पदे दिव्यांग (कॅटेगरी VI, HI, LD, D E साठी प्रत्येकी ८) साठी राखीव)

Chandrapur District Bank recruitment case interviews due to fear of administrator appointment
प्रशासक नियुक्तीच्या भीतीपोटी युद्धपातळीवर मुलाखती, चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Bank Of Baroda Specialist Officer Recruitment 2025: Registration Window To Close Soon, Salary Up To Rs 1.35 Lakh
Bank Job: बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती; १.३५ लाखापर्यंत मिळणार पगार; कसा अर्ज कराल जाणून घ्या
ITBP Recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : ‘आयटीबीपी’त ५१ पदे रिक्त
principal posts , Reservation , MPSC,
अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर एमपीएससीने आरक्षण काढून टाकले, आता सर्व पदे खुल्या वर्गासाठी
Chandrapur district bank recruitment
चंद्रपूर : जिल्हा बँक नोकर भरती; खासगी बाऊन्सर लावून मुलाखती अन्‌‌ शंभर कोटींचा…
mpsc result latest marathi news
‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी
Job Opportunity Recruitment at State Bank
नोकरीची संधी: स्टेट बँकेत भरती

पात्रता : (दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी) B.E./ B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/ सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग) उमेदवारांकडे पुढील विषयासंबंधित सर्टिफिकेशन्स असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल. (१) Oracle/ Hadoop/ Java/ Dot Net, (२) इन्फ्रा सपोर्ट क्लाऊड ऑपरेशन Microsoft/ Oracle/ Networking Infrastructure/ Visualization and Cloud इ.

अनुभव : आवश्यक नाही. स्पेसिफिक स्किल्स आवश्यक नाही.

वेतन श्रेणी : रु. ४८,४८० ८५,९२० (मूळ वेतन अधिक डी.ए., एचआरए, सीसीए, पीएफ, कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन फंड इ.)

कामाचे ठिकाण : नवी मुंबई/मुंबई.

वयोमर्यादा : (दि. ३० जून २०२४ रोजी) २१ – ३० वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/ १३/ १५ वर्षे).

कामाचे स्वरूप : आवश्यकतेनुसार बँकेने नेमून दिलेले रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, अॅक्टिविटीज, की इंटरअॅक्शन्स.

निवड पद्धती : ऑनलाईन लेखी परीक्षा नोव्हेंबर २०२४ मध्ये घेतली जाईल. कॉल लेटर बँकेच्या वेबसाईटवर अपलोड केले जातील व तसे उमेदवारांना एसएमएस आणि ई-मेलद्वारे सूचित केले जाईल.

परीक्षा केंद्र : छत्रपती संभाजी नगर, मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई/ एमएमआर, नागपूर, पुणे, पणजी इ.

लेखी परीक्षेत ( i) जनरल अॅप्टिट्यूड (फक्त पात्रता स्वरूपाची यातील गुण गुणवत्ता यादी बनविताना विचारात घेतले जात नाहीत.) (टेस्ट ऑफ रिझनिंग – १५ प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – १५ प्रश्न, इंग्लिश लँग्वेज – २० प्रश्न, प्रत्येकी १ गुणासाठी एकूण ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ४५ मिनिटे)

(ii) प्रोफेशनल नॉलेज (जनरल आयटी नॉलेज) – ६० प्रश्न, १०० गुण, वेळ ७५ मिनिटे. (i) सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट – २० प्रश्न, ३३ गुण, ( ii) इन्फ्रा सपोर्ट – २० प्रश्न, ३३ गुण, (iii) नेटवर्कींग – १० प्रश्न, १७ गुण, (iv) क्लाऊड ऑपरेशन्स – १० प्रश्न, १७ गुण. एकूण ६० प्रश्न, १०० गुणांसाठी वेळ ७५ मिनिटे. प्रोफेशनल नॉलेज पेपरमधील गुणवत्तेनुसार उमेदवार २५ गुणांसाठीच्या इंटरह्यूकरिता निवडले जातील. अंतिम निवड करताना प्रोफेशनल नॉलेज पेपरमधील गुणांना ७० वेटेज व इंटरव्ह्यूमधील गुणांना ३० वेटेज दिले जाईल.

अर्ज कसा करावा : उमेदवारांनी https:// bank. sbi/ web/ careers/ current- openings वेबसाईटवरील लिंकवर आपले नाव रजिस्टर करावे. रजिस्ट्रेशननंतर उमेदवारांना सिस्टीम जनरेटेड ऑनलाईन अर्जाची प्रिंटआऊट काढण्यासाठी सूचित केले जाईल.

अर्जाचे शुल्क : खुला/ ईडब्ल्यूएस/ इमाव – रु. ७५०/-. (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना अर्जाचे शुल्क (इंटिमेशन चार्जेससह) माफ आहे.) फी पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर ई-रिसिप्ट आणि अॅप्लिकेशन फॉर्म (ज्यावर अर्ज दाखल केल्याचा दिनांक प्रिंट केलेला असेल.) जनरेट होईल, त्याची उमेदवारांनी प्रिंट काढून घ्यावी. ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.

ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे ४ ऑक्टोबर २०२४. असिस्टंट मॅनेजर (सिस्टीम्स) पदांशिवाय डेप्युटी मॅनेजरची एकूण ७१३ पदे किमान ४ वर्षं अनुभव असलेल्या उमेदवारांमधून भरली जाणार आहेत. याची विस्तृत माहिती SBI च्या वेबसाईटवरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

Story img Loader