टेरिटोरियल आर्मी ( TA), ग्रुप मुख्यालय सदर्न कमांड युनिट्समध्ये ‘इन्फ्रन्ट्री बटालियन (टेरिटोरियल आर्मी)’ भरतीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १२-१८ ऑक्टोबर २०२४ च्या अंकात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सदर्न कमांडमधील देशभरातील १३ टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये दि. ४ नोव्हेंबर २०२४ ते १६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान भरती आयोजित केली जाणार आहे. यातून पुढील पदांची भरती केली जाईल.

(१) सोल्जर (जनरल ड्युटी) ( Soldier (GD)) – ५६६ पदे

Heena Gavit Resigns from BJP
Heena Gavit : भाजपाला मोठा धक्का, हिना गावितांचा पक्षाला रामराम; अक्कलकुव्यात शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray over the project Print politics news
मोठ्या प्रकल्पातील गतिरोधक दूर केले; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Sharad Ponkshe present on the platform of MNS meeting in Thane news
शिंदेचे स्टार प्रचारक शरद पोंक्षे मनसेच्या व्यासपीठावर
candidates Bhayander, Rebellion BJP,
भाईंदरमध्ये १७ उमेदवार रिंगणात, ६ जणांची माघार, भाजपमधील बंडखोरी शमली, गीता जैन यांना ‘फलंदाज’ चिन्ह
Lashkar e Taiba  Pakistani commander Usman killed in an encounter in an anti terror operation
दहशतवादविरोधी मोहिमेत बिस्किटांचा वापर
Analog Space Mission :
Analog Space Mission : भारताची पहिली ॲनालॉग स्पेस मिशन लडाखमध्ये सुरू; इस्रोची ही अंतराळ मोहीम काय आहे?
without helmet officers and employees should be banned from pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : हेल्मेट नसल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेत मज्जाव

(२) सोल्जर (शेफ) – ५४

(३) सोल्जर (हेअर ड्रेसर) – ३०

(४) सोल्जर (क्लर्क) – ३०

(५) सोल्जर (कुक मेस) – २

(६) सोल्जर (Chef Spl.) – ४

(७) सोल्जर ( एफ) – ७

(८) सोल्जर (स्टुअर्ड) – २

(९) सोल्जर (आर्टिझन मेटॅलर्जी) – ४

(१०) सोल्जर (आर्टिझन वूक वर्क) – 

(११) सोल्जर ( ट्रं२ं’ूँ) – ६

(१२) सोल्जर (हाऊस किपर) – ३६

(१३) सोल्जर (वॉशरमन) – ३२

पात्रता : सोल्जर (जनरल ड्युटी) १० वी सरासरी किमान ४५ गुण (प्रत्येक विषयात किमान ३३ गुण).

सोल्जर क्लर्क – १२ वी (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स) सरासरी किमान ६० गुण आणि १२ वीला किमान ५० गुण इंग्लिश आणि गणित/ अकाऊंट्स/ बुक किपिंग विषयात.

सोल्जर ट्रेड्समेन – (ट्रेड्समेन हाऊस किपर आणि मेस किपर पदे वगळता) १० वी उत्तीर्ण (प्रत्येक विषयात किमान ३३ गुण आवश्यक).

सोल्जर ट्रेड्समेन (हाऊस किपर आणि मेस कीपर) ८ वी उत्तीर्ण. (प्रत्येक विषयात किमान ३३ गुण आवश्यक.)

रिक्रूटमेंट झोन- IV मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, राजस्थान या राज्यांचा आणि केंद्रशासित प्रदेश – दादरा नगरहवेली, दमणदीव, लक्षद्विप आणि पुदुचेरी यांचा समावेश होतो.

उमेदवार रिक्रूटमेंट झोन- IV अंतर्गत येणाऱ्या राज्यांतील रहिवासी असावा.

वयोमर्यादा : भरतीच्या दिनांकास १८-४२ वर्षे.

शारीरिक मापदंड : उंची – १६० सें.मी., छाती – ७७८२ सें.मी., वजन – आर्मी मेडिकल स्टँडर्डप्रमाणे उंची आणि वय यांच्या प्रमाणात.

शारीरिक मापदंडात सूट – (१) सैनिक, माजी सैनिक, War Widow, माजी सैनिकांची विधवा यांचा मुलगा किंवा War Widow यांचा दत्तक मुलगा/जावई यांना उंचीत, वजनात आणि छातीमध्ये सूट दिली जाईल.

(२) उत्कृष्ट खेळाडू यांना उंची, छातीमध्ये ३ सें.मी. ची सूट आणि वजनात ३ कि.ग्रॅ. ची सूट.

ट्रेड टेस्ट – सोल्जर क्लर्क – इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट

ट्रेड्समन – संबंधित ट्रेडमधील कार्यक्षमता.

टॅटू – ट्रायबल क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांना त्यांच्या प्रथा/परंपरेप्रमाणे शरीरावरील कोणत्याही भागावर काढलेले कायमस्वरूपी टॅटू चालू शकतात. त्यासाठी त्यांनी Annexure- B आणि Annexure- C मधील नमुन्याप्रमाणे सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक.

शारीरिक क्षमता चाचणी – १०० गुणांसाठी.

(अ) १ मैल धावणे –

१८ ते ३० वर्षांपर्यंत –

५ मि. ३० सेकंदांपर्यंत – ६० गुण

५ मि. ३१ सेकंद ते ५ मि. ४५ सेकंद – ४० गुण

५ मि. ४६ सेकंद आणि जास्त – फेल

३१ ते ४२ वर्षांपर्यंत

६ मि. १५ सेकंदांपर्यंत – ६० गुण

६ मि. १६ सेकंद ते ६ मि. ३० सेकंद – ४० गुण

६ मि. ३१ सेकंद आणि जास्त – फेल

(ब) पुलअप्स –

१८ ते ३० वर्षे ३१ ते ४२ वर्षे गुण

१० आणि जास्त ९ आणि जास्त -४०

९ ८ – ३३

८ ७ – २७

७ ६ – २१

६ ५ – १६

५ किंवा ४ किंवा फेल

५ पेक्षा कमी ४ पेक्षा कमी

(क) बॅलन्स आणि ९ फूट खंदक (Ditch) – या टेस्ट फक्त पात्रता स्वरूपाच्या आहेत. सोल्जर क्लर्क पदासाठी १ मैल धावणे आणि पुलअप्स टेस्ट्स पात्रता स्वरूपाच्या आहेत.

लेखी परीक्षा – फिजिकल आणि मेडिकल टेस्ट उत्तीर्ण उमेदवारांची लेखी परीक्षा होईल.

(अ) सोल्जर जनरल ड्युटी आणि ट्रेड्समन – जनरल नॉलेज – २० प्रश्न, जनरल सायन्स – १५ प्रश्न, इलेमेंटरी मॅथ्स – १५ प्रश्न, प्रत्येकी २ गुणांसाठी एकूण ५० प्रश्न, १०० गुण. (किमान ३२ गुण आवश्यक)

(ब) सोल्जर क्लर्क – जनरल नॉलेज आणि जनरल सायन्स – १० प्रश्न, इलेमेंटरी मॅथ्स आणि कॉम्प्युटर सायन्स – १५ प्रश्न, जनरल इंग्लिश – २५ प्रश्न; प्रत्येकी २ गुण, एकूण ५० प्रश्न (किमान ४० गुण आवश्यक) १०० गुण.

(क) चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

लेखी परीक्षा ( CEE) ची तारीख फिजिकल/ मेडिकल एक्झामिनेशन पास करणाऱया उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल. त्यानंतर स्क्रीनिंग/ अॅप्टिट्यूड टेस्ट (सोल्जर जनरल ड्युटी होम आणि हेल्थ युनिट्स (ज्यात १६२ इन्फ्रन्ट्री बटॅलियन (TA) JAK LI चा समावेश आहे.) घेतली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी शारीरिक क्षमता चाचणी, मेडिकल टेस्ट, ट्रेड टेस्ट (लागू असल्यास) लेखी परीक्षा आणि स्क्रीनिंग/ अॅप्टिट्यूड टेस्ट पास करणाऱ्या उमेदवारांमधून बनविली जाईल.

उमेदवारांनी भरतीसाठी येताना मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या साक्षांकीत केलेल्या प्रतींचे दोन संच तसेच २० पासपोर्ट आकाराचे फोटोग्राफ घेवून हजर रहावयाचे आहे.

टेरिटोरियल आर्मी ही एक स्वयंसेवी संस्था असून येथे अर्धवट वचनबद्धता असते. टेरिटोरियल आर्मीमध्ये सुरूवातीला ७ वर्षांसाठी नेमणूक दिली जाते. करार कालावधी पात्रतेचे निकष आणि ळअ यांची गरज पाहून वाढविला जाईल. कोणत्याही प्रकारचे पेन्शन मिळत नाही.

निवडलेल्या उमेदवारांना नॉमिनेटेड सेंटर्सवर ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल.

उमेदवारांनी आपण ज्या जिह्यात राहतोय त्या झोन (झोन IV) मधील सेंटरवर नेमून दिलेल्या तारखेला सकाळी ५.०० वाजता हजर रहावयाचे आहे.

क्षेत्रानुसार भरतीचे वेळापत्रक –

(I) सेंटर – कोल्हापूर (महाराष्ट्र).

ठिकाण – शिवाजी युनिव्हर्सिटी स्टेडियम, कोल्हापूर, महाराष्ट्र.

TA युनिटस – १०१ Infantry Battalion ( TA) MARATHA LI आणि १०९ Infantry Battalion ( TA) MRATHA LI

भरली जाणारी रिक्त पदे – सोल्जर (जनरल ड्युटी) ५४, सोल्जर ट्रेड्समन (क्लर्कसह) २४.

दि. १० नोव्हेंबर २०२४ (सकाळी ५.०० वाजता) महाराष्ट्र राज्यातील जिल्हे – अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, धाराशीव, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ.

दि. ११ नोव्हेंबर २०२४ अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजी नगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदूरबार, सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे.

दि. १२ नोव्हेंबर २०२४ मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि नाशिक.

दि. १३ नोव्हेंबर २०२४ प्रलंबित केसेसची कागदपत्र पडताळणी, ट्रेड, मेडिकल टेस्ट इ.

कागदपत्र पडताळणी, ट्रेड टेस्ट्स, मेडिकल टेस्ट्स इ. नेमून दिलेल्या दिवशीच शारीरिक क्षमता चाचणी बरोबरच घेतल्या जातील.

( II) सेंटर – कोईम्बतूर (तामिळनाडू)

ठिकाण – PRS ग्राऊंड, कोईम्बतूर (तामिळनाडू).

ळअ युनिट्स -११० इन्फ्रन्ट्री बटालियन ( TA) मद्रास; ११७ इन्फ्रन्ट्री बटालियन ( TA) The Guards; १२२ इन्फ्रन्ट्री बटालियन ( TA) मद्रास.

भरली जाणारी रिक्त पदे – सोल्जर (जीडी) १७४, सोल्जर (ट्रेड्समन क्लर्कसह) ५०

महाराष्ट्र आणि राजस्थान राज्यातील उमेदवारांसाठी ६ नोव्हेंबर २०२४ (५.०० वाजता).

( III) सेंटर – बेळगावी (कर्नाटक).

ठिकाण – राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ग्राऊंड, बेळगावी (कर्नाटक).

युनिट्स – १०६ इन्फ्रन्ट्री बटालियन ( TA) PARA; ११५ इन्फ्रन्ट्री बटालियन ( TA) महार; १२५ इन्फ्रन्ट्री बटालियन ( TA) THE GUARDS.

रिक्त पदे – सोल्जर (जीडी) २५७ आणि सोल्जर (ट्रेड्समन क्लर्कसह) ५३.

११ नोव्हेंबर २०२४ अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदूरबार, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया.

१२ नोव्हेंबर २०२४ मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, हिंगोली, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, धाराशिव, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ.

( IV) सेंटर – देवळाली (महाराष्ट्र).

ठिकाण – देवाळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड स्टेडियम, देवळाली, नाशिक.

युनिट्स – ११६ इन्फ्रन्ट्री बटालियन (TA) PARA; ११८ इन्फ्रन्ट्री बटालियन (TA) ग्रेनेडिअर्स; १२३ इन्फ्रन्ट्री बटालियन (TA) ग्रेनेडिअर्स.

रिक्त पदे – सोल्जर (जीडी) ८१, सोल्जर (ट्रेड्समेन क्लर्कसह) ५७.

दि. १० नोव्हेंबर २०२४ अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, धाराशीव, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ.

दि. ११ नोव्हेंबर २०२४ अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजी नगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदूरबार, सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे.

दि. १२ नोव्हेंबर २०२४ मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि नाशिक.