इंडिया पोस्ट (मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन) देशभरातील ३९ पोस्टल सर्कल्समध्ये ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ४४,२२८. महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण डाक सेवक ब्रँच ऑफिसेसमध्ये ‘ब्रँच पोस्ट मास्टर (BPM)’, ‘असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM)’ च्या एकूण ३,१७० पदांची भरती. (अजा – २८०, अज – २९९, इमाव – ७००, ईडब्ल्यूएस – ४०६ दिव्यांग – ए – ३६, बी – ३८, सी – ३०, डी ई – १६, खुला – १,३६५)

पदनिहाय कामाचे स्वरूप :

mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
TB survey in Satara, 160 teams for TB survey ,
साताऱ्यात क्षयरुग्ण सर्वेक्षणासाठी १६० पथके
Appointments of 23 officers who joined the Indian Administrative Service Mumbai news
भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेल्या २३ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
IAF Agniveervayu Recruitment 2025 Notification out at agnipathvayu cdac in registration begins on January 7
IAF Agniveervayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात नोकरीची संधी! अग्निवीर वायू पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
MPSC recruitment age limit increased by one year Mumbai news
‘एमपीएससी’च्या भरती वयोमर्यादेत एक वर्षाची वाढ; लाखो उमेदवारांना सरकारचा दिलासा
Bharatiya Suvarnakar Samaj carried out census of 1200 houses in Indiranagar
सुवर्णकार समाजाचा नाशिक जिल्ह्यात खानेसुमारीचा संकल्प, शहरातील काही भागात पाच हजार जणांची माहिती संकलित
Chandrapur District Bank Recruitment,
चंद्रपूर जिल्हा बँक पदभरतीसाठी नाशिक, पुण्यात परीक्षा केंद्र; नव्या वादाला तोंड, मुख्यमंत्र्यांना साकडे

(१) ब्रँच पोस्टमास्टर (BPM) : ग्रामीण डाक सेवक ब्रँच पोस्ट ऑफिसचे काम सांभाळणे. इंडिया पोस्ट्स पेमेंट्स बँक (IPPB) चे काम सांभाळणे आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील/ ग्रामपंचायतीमधील पोस्टाचा व्यवसाय सांभाळणे ब्रँच पोस्ट मास्टर हा ग्रामीण डाक सेवक ब्रँच ऑफिसचा प्रमुख असणार.

(२) असिस्टंट ब्रँच मास्टर (ABPM) : स्टॅंप/स्टेशनरी यांची विक्री, एकूण टपालाची वाहतूक व वितरण, कढढइ च्या कामात व पोस्टाच्या इतर कामात ब्रँच पोस्ट मास्टरना मदत करणे.

पात्रता : दि. १२ जुलै २०२४ रोजी सर्व पदांसाठी –

(i) १० वी (एसएससी) उत्तीर्ण (गणित, स्थानिय भाषा आणि इंग्रजी विषयांसह).

(ii) पोस्टल सर्कलसाठी नेमलेली ऑफिशियल लँग्वेज उमेदवारांना अवगत असणे आवश्यक.

महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी ऑफिशियल लँग्वेज मराठी आहे. एकूण रिक्त पदे – ३,०८३ व कोंकणी/मराठीसाठी एकूण रिक्त पदे – ८७. (गोवा राज्यासाठी) कर्नाटक – १,९४० पदांसाठी कन्नड, मध्य प्रदेश – ४,०११ पदांसाठी हिंदी, गुजरात – २,०३४ पदांसाठी गुजराती.

(iii) उमेदवारांनी डिपार्टमेंटल सॉफ्टवेअरवर काम करण्यासाठी कॉम्प्युटर/ लॅपटॉप/ POS/ मोबाइल इ. चालविण्याचे पुरेसे ज्ञान असल्याचे घोषणापत्र Annexure- VI मधील नमुन्यात दाखल करणे आवश्यक आहे.

(ब्रँच पोस्ट मास्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आपल्या कार्यक्षेत्रात ब्रँच पोस्ट ऑफिससाठी निवड झाल्यानंतर व कामास सुरूवात करण्यापूर्वी जागा मिळवून द्यावी लागेल.) BPM पदांवरील उमेदवारांना पोस्टाच्या गावी रहावे लागेल. ABPM/ डाक सेवक पदांवरील उमेदवारांना पोस्ट ऑफिसच्या वितरण अधिकार क्षेत्रात राहणे आवश्यक.

(iv) उमेदवारांना सायकल चालविता येणे बंधनकारक आहे. सायकल ऐवजी स्कूटर/ मोटर सायकल चालविता येत असेल तरी चालेल. यासाठी उमेदवारांनी Annexure- VII मधील घोषणापत्र सादर करणे आवश्यक.

विकलांग कॅटेगरी क्षीण दृष्टी, कर्णबधिर, एक हात, एक पाय, कुष्ठरोग मुक्त, अॅसिड हल्ला बाधित उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. काही पदे विकलांगांसाठी राखीव आहेत.

(v) उमेदवारांनी उपजीविकेसाठी पुरेशी साधनं (Adequate means of livelihood) उपलब्ध असल्याबाबतचं घोषणापत्र Annexure- VIII मध्ये द्यावयाचे आहे.

(vi) तसेच ऑनलाइन अर्जात दिलेली माहिती खरी असल्याबाबतचं घोषणापत्र Annexure- IX मध्ये सादर करावयाचे आहे.

(vii) उमेदवारांनी Annexure- V मध्ये दिलेल्या नमुन्यातील दाखले सादर करणे आवश्यक.

(viii) उमेदवारांनी Annexure- IV मध्ये दिलेल्या नमुन्यातील घोषणापत्र सादर करणे आवश्यक.

वयोमर्यादा : दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते ४० वर्षे. (इमाव – ४३ वर्षेपर्यंत; अजा/ अज – ४५ वर्षेपर्यंत; (विकलांग उमेदवार – खुला गट – ५० वर्षेपर्यंत, इमाव – ५३ वर्षेपर्यंत, अजा/ अज – ५५ वर्षेपर्यंत). ईडब्ल्यूएस उमेदवारांना वयात कोणतीही सूट नाही याची नोंद घ्यावी.

टाईम रिलेटेड कंटीन्यूइटी अलाऊन्स (TRCA) महागाई भत्ता : ब्रँच पोस्ट मास्टर्स (BPM) यांना दरमहा रु. १२,००० – २९,३८० व ABPM/ डाक सेवक यांना रु. १०,००० – २४,४७० TRCA दिले जातील. उमेदवार भारत सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या महागाई भत्ता मिळण्यास पात्र असतील.

अर्जाचे शुल्क : रु. १००/- (खुलागट, इमाव, ईडब्ल्यूएस). (निवडलेल्या डिव्हिजनमधील सर्व पदांच्या पसंतीसाठी) महिला/ अजा/ अज/ विकलांग उमेदवारांना शुल्क माफ आहे.

निवड पद्धती : इ. १० वी (एसएससी) मधील गुणवत्तेनुसार आणि उमेदवारांनी पदांसाठी दिलेल्या पसंतीक्रमाप्रमाणे निवड केली जाईल. समान गुण असल्यास जन्म तारखेनुसार (वयाने मोठा), अज-ट्रान्सवुमन, अज-महिला, अजा-ट्रान्सवुमन, अजा-महिला, इमाव-ट्रान्सवुमन, इमाव-महिला, ईडब्ल्यूएस्-ट्रान्सवुमन, ईडब्ल्यूएस-महिला, खुलागट-ट्रान्सवुमन, खुलागट-महिला, अज-ट्रान्समेल, अज-पुरुष, अजा-ट्रान्समेल, अजा-पुरुष, इमाव-ट्रान्समेल, इमाव-पुरुष, ईडब्ल्यूएस-ट्रान्समेल, ईडब्ल्यूएस-पुरुष, खुलागट-ट्रान्समेल, खुलागट-पुरुष या क्रमाने प्राधान्य दिले जाईल. अंतरिम निवड यादीनुसार उमेदवारांना (Annexure- IX मध्ये नमूद केलेले) हमीपत्र सादर करावे लागेल. त्यानंतर उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले जाईल. निवड प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण केली जाईल.

उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही प्राधान्य देण्यात येणार नाही.

उमेदवार रजिस्ट्रेशन नंबर आणि OTP देवून अर्ज करण्यासाठी फक्त एकच डिव्हिजन निवडू शकतात. https:// indiapostgdsonline. gov. in वेबसाईटच्या होमपेजवर ‘ru Maharashtra’ वर क्लिक करून डिव्हिजन निवडल्यानंतर त्या डिव्हिजनमधील पात्र पदांची यादी ‘ View Posts’ वर क्लिक केल्यावर स्क्रीनवर डिस्प्ले होईल, त्यानुसार उमेदवारांनी पदांचा पसंतीक्रम द्यावयाचा आहे. ज्या पदासाठी उमेदवाराने पसंतीक्रम दिलेला नाही त्या पदासाठी त्याचा विचार केला जाणार नाही.

निवडलेल्या फक्त एका डिव्हिजनमधील एक किंवा अधिक पदासाठी उमेदवार अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले नाव https:// indiapostgdsonline. gov. in या पोर्टलवर रजिस्टर करावयाचे आहे. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. (१) फोटो (jpg/ jpeg format upto 50 kb), (२) सही (सिग्नेचर) (jpg/ jpeg format upto 20 kb).

ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर ३ दिवस म्हणजे ६ ते ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्जात काही बदल करावयाचा असल्यास Correction Window उपलब्ध असेल.

ऑनलाईन अर्ज https:// indiapostgdsonline. gov. in/ या संकेतस्थळावर दि. ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत करावेत. रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा याचा तपशील इंडिया पोस्टच्या वेबसाईटवरील जाहिरातीमधील Annexure- II मध्ये उपलब्ध आहे.

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत डिव्हिजन्समधील रिक्त पदे : अहमदनगर – ६६, अकोला – ६५, अमरावती – ७३, औरंगाबाद – ३७, बीड – २२, बारामती – ५४, भुसावळ – ३६, बुलढाणा – ३८, चंद्रपूर – ४१५, धुळे – ११२, गोवा – ७६, जळगाव – ५२, कोल्हापूर – ७८, कराड – ८२, मालेगाव – ६५, नागपूर ग्रामीण – २७९, नांदेड – ५२, नाशिक – २१, नवी मुंबई – ५०, उस्मानाबाद – ९२, पालघर – ७८, परभणी – ५७, पुणे ग्रामीण – १२२, रायगड – १५२, सातारा – ७४, श्रीरामपूर – ६२, ठाणे – ७६, वर्धा – ५९, यवतमाळ – ११९, रत्नागिरी – २१६, सांगली – ११०, पुणे शहर पश्चिम – ६, पुणे शहर पूर्व – २१, पंढरपूर – ६६, फटर इट ऊठ मिरज – २, फटर छ ऊठ भुसावळ – २, सिंधुदुर्ग – १०३, सोलापूर – ४९, मुंबई शहर उत्तर पश्चिम – १०, मुंबई शहर दक्षिण – १, नागपूर शहर – ५.

Story img Loader