सुहास पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी, खडकवासला, पुणेमध्ये ग्रुप-सी पदांची सरळसेवा भरती. एकूण रिक्त पदे – १९८.

(१) लोवर डिव्हीजन क्लर्क – १६ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ६) (३ पदे दिव्यांग (कॅटेगरी HH, OH, MD साठी प्रत्येकी १ पद) साठी राखीव आणि २ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).
पात्रता – (ए) १२ वी उत्तीर्ण, (बी) स्किल टेस्ट – टायपिंग स्पीड इंग्रजी ३५ श.प्र.मि. (१०,५०० KDPH) किंवा हिंदी ३० श.प्र.मि. (९,००० KDPH).
(२) मल्टि टास्कींग स्टाफ – ऑफिस अॅण्ड ट्रेनिंग ( MTS- O & T) – १५१ पदे (अजा – १, अज – ५, इमाव – ५२, ईडब्ल्यूएस – १५, खुला – ७८) (७ पदे दिव्यांग कॅटेगरी २ – VI ( LV), १ – HH, १ – OH ( OL/ OA), ३ – MD साठी राखीव) (१६ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).
पात्रता – १० वी उत्तीर्ण.
(३) स्टेनोग्राफर ग्रेड- II – १ पद (खुला).
पात्रता – (ए) १२ वी उत्तीर्ण, (बी) स्किल टेस्ट – कालावधी ( i) १० मिनिटे डिक्टेशन ८० श.प्र.मि. (ii) ट्रान्सक्रिप्शन इंग्लिश ५० मिनिटे किंवा हिंदी ६५ मिनिटे.
(४) ड्राफ्ट्समन – २ पदे (खुला).
पात्रता – (ए) १२ वी उत्तीर्ण, (बी) मान्यताप्राप्त संस्थेकडील २ वर्षं कालावधीचा ड्राफ्ट्समनशिपमधील डिप्लोमा किंवा (ए) ड्राफ्ट्समन ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट आणि २ वर्षांचा संबंधित ट्रेडमधील कामाचा अनुभव.

आणखी वाचा-IAF Agniveervayu Recruitment 2024 : अग्निवीर वायू भरतीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ, लवकर करा अर्ज

(५) सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड- II – १ पद (खुला).
पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(६) कुक – १४ पदे (अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – २, खुला – १०) (१ पद माजी सैनिकांसाठी राखीव).
पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा मान्यताप्राप्त संस्थेतील २ वर्षांचा अनुभव
किंवा कुक ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट आणि संबंधित कामाचा मान्यताप्राप्त संस्थेतील अनुभव.
(७) कॉम्पोझिटर-कम-प्रिंटर – १ पद (खुला).
पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेतील संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(८) सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर (ओजी) – ३ पदे (अज – १, खुला – २).
पात्रता – (ए) १२ वी उत्तीर्ण, (बी) अवजड वाहन चालविण्याचा परवाना, ( iii) मान्यताप्राप्त संस्थेतील कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(९) कारपेंटर – २ पदे (खुला).
पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेतील कामाचा २ वर्षांचा अनुभव.
किंवा कारपेंटर ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट आणि मान्यताप्राप्त संस्थेतील कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(१०) फायरमन – २ पदे (खुला).
पात्रता – (ए) १० वी उत्तीर्ण, (बी) अवजड ( HMV) वाहन चालविण्याचा परवाना, (सी) किमान ६ महिने कालावधीचा फायर फायटिंग अॅप्लायन्सेस, फर्स्ट एड आणि टेलर फायर पंप्सचा वापर आणि देखभाल करण्याचा अनुभव, (डी) शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि अति कष्टाची कामे करण्यास सक्षम असावा. त्यास शारीरिक क्षमता चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.
(११) टेक्निकल अटेंडंट-बेकर अॅण्ड कन्फेक्शनर – १ पद (खुला).
(१२) टेक्निकल अटेंडंट-सायकल रिपेअरर – २ पदे (खुला).
(१३) टेक्निकल अटेंडंट-प्रिंटिंग मशिन ऑपरेटर – १ पद (खुला).
(१४) टेक्निकल अटेंडंट-बूट रिपेअरर – १ पद (खुला).
पद क्र. ११ ते १४ साठी पात्रता – संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण किंवा १० वी उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा – पद क्र. १, ३, ४, ८ व १० साठी १८ ते २७ वर्षे; इतर पदांसाठी १८-२५ वर्षे. (फक्त राखीव पदांसाठी कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे); (दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत सूट – खुला प्रवर्ग – १० वर्षे, इमाव – १३ वर्षे, अजा/अज – १५ वर्षे)

आणखी वाचा-SSC Bharti 2024: कर्मचारी निवड आयोग अंतर्गत १२१ पदांची भरती! जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

इमाव उमेदवारांनी Annexure-१ आणि नॉन-क्रिमी लेयर दाखला व अजा/अज उमेदवारांनी Annexure-२ नमुन्यातील जातीचा दाखला सादर करणे आवश्यक.
निवड पद्धती – उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हता परीक्षेतील गुणवत्तेनुसार रिक्त पदांच्या १० पट उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील. लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार स्किल टेस्टसाठी रिक्त पदांच्या ४ पट उमेदवार निवडले जातील.

लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजन्स अॅण्ड रिझनिंग, न्यूमरिकल अॅप्टिट्यूड, जनरल इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस संबंधित ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न हिंदी/ इंग्रजी भाषेत विचारले जातील. लेखी परीक्षेसाठी काळ्या शाईचे बॉलपेन वापरणे अनिवार्य. स्किल/ ट्रेड टेस्ट फक्त पात्रता स्वरूपाची असेल. यात उमेदवारांचे संबंधित ट्रेडमधील कौशल्य तपासले जाईल. स्किल/ ट्रेड टेस्टमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाणार.

शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना ई-मेल/एसएमएसद्वारे भरती प्रक्रियेसाठी सूचित केले जाईल. त्यांनी दिलेल्या तारखेला नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीच्या कोंढवा गेट येथे हजर रहावे. शॉर्ट लिस्टेड उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटआऊट, अॅडमिट कार्ड (ज्यावर रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटविलेला असावा.) ओळखपत्र आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती घेवून कागदपत्र पडताळणीसाठी हजर रहावे.

ऑनलाइन अर्ज https:// www. ndacivrect. gov. in या संकेतस्थळावर दि. १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करावेत.