नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) (भारत सरकारअंतर्गत एक वैधानिक संस्था) ‘सायंटिस्ट-बी’ पदांची GATE स्कोअर आधारित भरती. एकूण रिक्त पदे – ७५.

पदाचे नाव – सायंटिस्ट-बी (जनरल सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस ग्रुप-ए (गॅझेटेड) नॉन-मिनिस्ट्रियल).

Siddhi Kadam Withdraw Mohol
Siddhi Kadam : मोहोळमधून रमेश कदम आणि सिद्धी कदम यांची माघार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राजू खरेंना दिलासा
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
BMC Recruitment 2024 Brihanmumbai Municipal Corporation City Engineer 690 seats check all details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
Samvadini Group, Social Transformation,
शहरबात… कृतीतून बोलणारी ‘संवादिनी’
in navi mumbai cidco Contractor officials faced villagers anger after arriving to start work in Devad on Wednesday
नैना प्रकल्पाचे काम करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना पिटाळले
awareness campaign by fire brigade during diwali
दिवाळीत अग्निशमन दलाकडून जनजागृती मोहिम; सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
Nagpur South West Assembly Constituency 2024 Election Commission accepted 19 applications and rejected 18 applications print politics news
फडणवीसांच्या मतदारसंघातील प्रतिस्पर्धांचे निम्मे अर्ज बाद
Thieves stole cash from women bags on Lakshmi Street crime news Pune news
लक्ष्मी रस्त्यावर चोरट्यांचा सुळसुळाट; महिलांच्या पिशवीतून रोकड चोरी

वेतन श्रेणी – लेव्हल-१० रु. ५६,१०० – १,७७,५००. अंदाजे वेतन दरमहा रु. १,२३,०००/- (मूळ वेतनाच्या २० टक्के स्पेशल सिक्युरिटी अलाऊन्ससह).

(सायंटिस्ट-बी) डिसिप्लिननुसार रिक्त पदांचा तपशील –

(१) इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन – ३५ पदे (अजा – ९, अज – ४, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १२) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी HH साठी राखीव).

पात्रता : (दि. ८ नोव्हेंबर २०२४ रोजी) फर्स्ट क्लास एम.एससी. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स/ अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स/ रेडिओ फिजिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स)

किंवा फर्स्ट क्लास बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अँड इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर/ टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन/ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन/ कम्युनिकेशन ऑप्टिक्स अँड ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल किंवा नेटवर्क/ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी टेक्नॉलॉजी संबंधित फर्स्ट क्लाससह इतर कोणतीही इंजिनीअरिंग पदवी आणि संबंधित GATE स्कोअर (पेपर कोड EC)).

(२) कॉम्प्युटर सायन्स – ३० पदे (अजा – ६, अज – ४, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – २, खुला – १०) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी LD (OA/ OL/ DW/ AAV) साठी राखीव).

पात्रता : फर्स्ट क्लास बी.ई./ बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर/ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इन्फॉर्मेशन इंजिनीअरिंग/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)

किंवा इन्फॉर्मेशन/ डेटा सायन्स टेक्नॉलॉजीसह संबंधित फर्स्ट क्लाससह इतर कोणतीही इंजिनीअरिंग पदवी आणि

(३) जीओ इन्फॉरमॅटिक्स अँड रिमोट सेंसिंग – ५ पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).

पात्रता : फर्स्ट क्लास एम.एस्सी. (जीओइन्फॉरमॅटिक्स/ रिमोट सेंसिंग अँड जीओ इन्फॉरमॅटिक्स) किंवा फर्स्ट क्लास बी.ई./ बी.टेक. (जीओ इन्फॉरमॅटिक्स/ जीओ इन्फॉरमॅटिक्स अँड रिमोट सेंसिंग/ सिव्हिल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन) किंवा फर्स्ट क्लाससह तत्सम इंजिनीअरिंग पदवी.

(४) मॅथेमॅटिक्स – ५ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, खुला – २).

पात्रता : फर्स्ट क्लास एम.एस्सी. (मॅथेमॅटिक्स अप्लाइड मॅथेमॅटिक्स/ मॅथेमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग/ मॅथेमॅटिक्स सायन्सेस) किंवा फर्स्ट क्लाससह तत्सम मास्टर्स डिग्री इन सायन्स किंवा फर्स्ट क्लास बी.ई./ बी.टेक. (मॅथेमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग).

आणि सर्व पदांसाठी संबंधित सब्जेक्ट कोडमधील २०२२/ २०२३/ २०२४ चा GATE स्कोअर आवश्यक.

सर्व पदांसाठी संबंधित पात्रता परीक्षेत सर्व सेमिस्टर्स मिळून किमान ६० टक्के गुण आवश्यक. सदर पदवी CGPA/ CPI बेसिसवर दिली गेली असेल तर ६.७५ CGPA/ CPI आवश्यक.

वयोमर्यादा : (दि. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी) ३० वर्षेपर्यंत (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे).

निवड पद्धती : संबंधित GATE स्कोअरवर आधारित उमेदवार पुढील निवड प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट केले जातील. स्टेज-१ – लेखी परीक्षा (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ( CBT)) (१०० ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न, प्रत्येकी २ गुणांसाठी, एकूण २०० गुण, वेळ १२० मिनिटे). प्रत्येकी चुकीच्या उत्तरासाठी ०.५ गुण वजा केले जातील.

लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम https:// recruit- ndl. nielit. gov. in/ आणि https:// ntro. gov. in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

स्टेज-१ मधील गुणवत्तेनुसार शॉर्टलिस्टेड उमेदवारांना ५० गुणांच्या दिल्ली येथे होणाऱ्या इंटरव्ह्यूकरिता बोलाविले जाईल. (रिक्त पदांच्या ४ पट उमेदवार) स्टेज-१ व स्टेज-२ मध्ये पात्रतेसाठी किमान ५० टक्के गुण आवश्यक अनारक्षित पदांसाठी आणि ४० टक्के गुण आवश्यक आरक्षित पदांसाठी. निवड यादी बनविताना GATE स्कोअरला ५० टक्के वेटेज, स्टेज-१ लेखी परीक्षेसाठी ३० टक्के वेटेज आणि स्टेज-२ इंटरव्ह्यूसाठी २० टक्के वेटेज दिले जाईल.

परीक्षा केंद्र : मुंबई, बेंगलोर, नवी दिल्ली, लखनऊ, कोलकाता, गुवाहाटी.

अर्जाचे शुल्क : रु. २५०/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला उमेदवारांना फी माफ आहे.) ऑनलाइन अर्ज https:// recruit- ndl. nielit. gov. in या वेबसाइटवर ( https:// ntro. gov. in या वेबसाइटवरसुद्धा लिंक उपलब्ध आहे.) दि. ८ नोव्हेंबर २०२४ (१७.३० वाजे)पर्यंत करावेत.