नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्यातील नगरपरिषद/नगर पंचायतीमधील ‘महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा’ अंतर्गत विविध गट-क संवर्गातील रिक्त पदांची भरती-२०२३. एकूण रिक्त पदे – १,७८२. (Advt. No. 01/2023 dt. 11.07.2023)
(१) महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा गट-क
स्वच्छता निरीक्षक (गट-क) (श्रेणी-अ) – ४ पदे; (श्रेणी-ब) – ३१ पदे. पात्रता : (दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी) (१) कोणत्याही शाखेचा पदवीधारक, (२) मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका.
(२) महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा गट-क
(i) अग्निशमन अधिकारी गट-क (श्रेणी-अ) – ८ पदे (अजा – १, अज – १, विजा-अ – १, इमाव – १, आदुघ – १, खुला – ३). पात्रता : ( i) कोणत्याही शाखेतील पदवी, ( ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठय़क्रम, नागपूरमधून उत्तीर्ण.
( ii) अग्निशमन अधिकारी गट-क (श्रेणी-ब) – ४५ पदे. पात्रता : ( i) कोणत्याही शाखेतील पदवी, ( ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठय़क्रम, नागपूरमधून उत्तीर्ण किंवा १ वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्नी प्रतिबंधक अधिकारी पाठय़क्रम उत्तीर्ण.
( iii) अग्निशमन अधिकारी गट-क (श्रेणी-क) – ३१९ पदे (८० पदे नगर परिषद कर्मचारी यांचेसाठी राखीव). पात्रता : १ वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्नी प्रतिबंधक अधिकारी पाठय़क्रम उत्तीर्ण. नगर परिषद/नगर पंचायत कर्मचाऱ्यांसाठी वरील पात्रतेशिवाय नगर परिषदेतील लिडींग फायरमन पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(३) महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट-क – कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट-क (श्रेणी-अ) – २४ पदे; (श्रेणी-ब) – ९३ पदे; (श्रेणी-क) – ४६२ पदे. (११६ पदे नगर परिषद/नगर पंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव.) पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. (नगर परिषद/नगर पंचायत कर्मचाऱ्यांसाठी ( i) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदविका,
( ii) नगर परिषदेतील किंवा नगर पंचायतीमधील कोणत्याही पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.)
(४) महाराष्ट्र नगरपरिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा गट-क – लेखापरीक्षक व लेखापाल गट-क (श्रेणी-अ) – ५ पदे; (श्रेणी-ब) – १५ पदे; (श्रेणी-क) – २२७ पदे. (५७ पदे नगर परिषद /नगर पंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव.) पात्रता : वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्ण. (नगर परिषद/ नगर पंचायत कर्मचाऱ्यांसाठी नगर परिषदेतील किंवा नगर पंचायतीमधील कोणत्याही पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.)
(५) महाराष्ट्र नगरपरिषद सेवा पाणी पुरवठा, जलनिसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा – पाणी पुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता गट-क (श्रेणी-अ) – ४ पदे; (श्रेणी-ब) – ६ पदे; (श्रेणी-क) – ५५ पदे. (१४ पदे नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी राखीव.) पात्रता : यांत्रिकी किंवा पर्यावरण अभियांत्रिकी शाखेतील पदवी. नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी – यांत्रिकी किंवा पर्यावरण अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका आणि पदवीधारकांच्या बाबतीत किमान ३ वर्षांचा व पदविकाधारकाच्या बाबतीत किमान ५ वर्षांचा नगर परिषद किंवा नगर पंचायतीमधील कोणत्याही पदावरील अनुभव आवश्यक.
(६) महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा – संगणक गट-क- संगणक अभियंता (गट-क) (श्रेणी-अ) – २ पदे; (श्रेणी-ब) – २ पदे; (श्रेणी-क) – ४१ पदे. (१० पदे न.प. कर्मचाऱ्यांसाठी राखीव)
(७) महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) (गट-क) – विद्युत अभियंता गट-क (श्रेणी-अ) – ५ पदे; (श्रेणी-ब) – ७ पदे; (श्रेणी-क) – ३६ पदे (९ पदे नगर परिषद कर्मचारी यांच्यासाठी राखीव).
(८) महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) गट-क – स्थापत्य अभियंता गट-क (श्रेणी-अ) – २५ पदे; (श्रेणी-ब) – १३४ पदे; (श्रेणी-क) – २३२ पदे (५८ पदे नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी राखीव).
पद क्र. ६ ते ८ साठी पात्रता : संबंधित अभियांत्रिकी शाखेतील पदवी. न.प. कर्मचाऱ्यांसाठी संबंधित अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका आणि पदवीधारकांच्या बाबतीत किमान ३ वर्षांचा व पदविकाधारकाच्या बाबतीत किमान ५ वर्षांचा नगर परिषद किंवा नगर पंचायतीमधील कोणत्याही पदावरील अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा : (दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी) सर्व कॅटेगरीजसाठी किमान २१ वर्षे पूर्ण.
कमाल वयोमर्यादा : खुला – ४० वर्षे; मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ/ दिव्यांग/ नगरपरिषद/नगर पंचायत कर्मचारी – ४५ वर्षे; पदवीधर अंशकालीन – ५५ वर्षे.
महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा संवर्ग – गट-क, श्रेणी-अ, ब व क संवर्ग करिता उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत पुढीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक. उंची – पुरुष – १६५ सें.मी., महिला – १६२ सें.मी.
छाती – पुरुष – ८१-८६ सें.मी. वजन – पुरुष/महिला – ५० कि.ग्रॅ. दृष्टी – (पुरुष/ महिला)
गट-क मधील स्वच्छता निरीक्षक सेवा वगळता सर्व पदांसाठी एम.एस.सी.आय.टी परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
निवड पद्धती : महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवेसाठी संवर्गनिहाय पुढीलप्रमाणे स्वतंत्र बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन पद्धतीने परीक्षा (कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट) घेण्यात येईल. दोन्ही पेपर्स एकाच वेळी घेण्यात येतील.
पेपर-१ – ६० प्रश्न, १२० गुण, वेळ ७० मिनिटे. (मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी त्याचा अभ्यासक्रम सर्व पदांसाठी समान असेल.)
पेपर-२ – ४० प्रश्न, ८० गुण, वेळ ५० मिनिटे (संबंधित संवर्गासाठी आवश्यक असणारे विशेष ज्ञान/विषय ज्ञानाशी संबंधित प्रश्न) एकूण १०० प्रश्न, २०० गुण, एकूण वेळ १२० मिनिटे. पेपर-१ मध्ये किमान ४५टक्के गुण प्राप्त करणारम्या उमेदवारांचे पेपर-२ तपासला जाईल. पेपर-२ मध्येसुद्धा किमान ४५टक्के गुण आवश्यक.

निवड सूची तयार करताना प्राप्त गुणांच्या आधारे प्रथम श्रेणी-अ त्यानंतर श्रेणी-ब व शेवटी श्रेणी-क मधील सर्वसाधारण उमेदवारांमधून भरण्यात येणारम्या पदासाठी व त्यानंतर नगर पालिका कर्मचाऱ्यांमधून भरावयाच्या श्रेणी-क मधील राखीव २५टक्के जागेवासाठी स्वतंत्र निवड सूची तयार करण्यात येतील.
परीक्षा केंद्र : अर्जामध्ये दिलेले पर्याय यातून ३ परीक्षा केंद्रांसाठी उमेदवाराने पसंतीक्रम देणे आवश्यक.
परीक्षा शुल्क : खुला – रु. १,०००/-, मागासवर्गीय व इतर – रु. ४००/-.
ऑनलाइन अर्ज https:// mahadma. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर दि. २० ऑगस्ट २०२३ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत. (ऑनलाइन खाते उघडणे-; आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे-; परीक्षा शुल्काचा भरणा करणे)
सुहास पाटील

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity recruitment of vacancies maharashtra municipal council state service municipal council administration directorate amy
Show comments