सुहास पाटील

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांतील ‘स्टेनोग्राफर’ पदांच्या भरतीसाठी ‘स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ आणि ‘डी’ एक्झामिनेशन २०२४’ दि. २६ जुलै २०२४ रोजी जाहीर झाली आहे. अंदाजे रिक्त पदे – २००६. या परीक्षेतून केंद्र सरकारच्या विविध ६७ विभागांत स्टेनोग्राफर्स ग्रेड ‘सी’ आणि ग्रेड ‘डी’ पदांची भरती केली जाते. (जसे की मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स/ डिफेन्स/ रेल्वे/ कल्चर/ कॉर्पोरेट अफेअर्स/ अॅग्रिकल्चर/ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया/ सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल (CAT) /सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स (CBIC) इ.) CAT मध्ये फक्त इंग्रजी स्टेनोग्राफर्स निवडले जातात. व्हीएच/ एचएच/ ओएच/ इतर कॅटेगरीतील दिव्यांग उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (बीआरओ)मधील स्टेनोग्राफर ग्रेड ‘डी’ पदांसाठी फक्त पुरुष उमेदवार पात्र आहेत.)

Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Decision to increase maximum age limit by one year for recruitment to various posts of MPSC
‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…
IAF Agniveervayu Recruitment 2025 Notification out at agnipathvayu cdac in registration begins on January 7
IAF Agniveervayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात नोकरीची संधी! अग्निवीर वायू पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
Job Opportunity Opportunities in the Navy career news
नोकरीची संधी: नौदलात संधी
NTA recruitment 2024 Multiple vacancies with salaries up to Rs 60000
NTA recruitment 2024 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये नोकरीची संधी! ६०,००० रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार, तातडीने करा अर्ज
Loksarra career Job opportunity Recruitment of Apprentices at RCF
नोकरीची संधी: ‘आरसीएफ’मध्ये ‘अॅप्रेंटिस’ भरती
BSF Recruitment 2024
BSF Recruitment 2024 : कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय मिळवा सैन्यात नोकरी! ८५,००० रुपये प्रति महिना मिळेल पगार

वयोमर्यादा : (दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी) स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ – १८ ते ३० वर्षे, स्टेनोग्राफर ग्रेड ‘डी’ – १८ ते २७ वर्षे

(कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षेपर्यंत; अजा/ अज – ५ वर्षेपर्यंत; दिव्यांग – खुला – १०, इमाव – १३, अजा/ अज – १५ वर्षेपर्यंत) (विधवा/ घटस्फोटीत/ परित्यक्ता पुनर्विवाह न केलेल्या महिला उमेदवारांसाठी वयाची अट – खुला गट – ३५ वर्षेपर्यंत, अजा/ अज – ४० वर्षेपर्यंत).

पात्रता : (दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी) इ. १२ वी उत्तीर्ण.

अर्जाचे शुल्क : रु. १००/-. (महिला/ अजा/ अज/ दिव्यांग/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.) फक्त ऑनलाइन पद्धतीने फी दि. १८ ऑगस्ट २०२४ (२३.०० वाजे) पर्यंत भरता येईल.

परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, पणजी इ.

परीक्षा पद्धती : कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०२४ मध्ये घेतली जाईल. (१) संगणकावर आधारित परीक्षा (CBE) (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची) (MCQ) (पार्ट-१ जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग – ५० प्रश्न/ ५० गुण; पार्ट-२ जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न/ ५० गुण; पार्ट-३ इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन – १०० प्रश्न/१०० गुण; एकूण २०० प्रश्न, २०० गुण, वेळ २ तास). प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. संगणकावर आधारित परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार कॅटेगरीनुसार स्टेनोग्राफी स्किल टेस्टसाठी निवडले जातील. CBE मधील पात्रतेसाठी कॅटेगरीनुसार किमान गुणांची अट अशाप्रकारे आहे – खुला गट – ३० टक्के, इमाव/ ईडब्ल्यूएस् – २५ टक्के, अजा/ अज/ दिव्यांग/ माजी सैनिक इ. – २० टक्के.

(२) स्टेनोग्राफी स्किल टेस्ट (फक्त पात्रता स्वरूपाची आहे) : १० मिनिटांचे डिक्टेशन (हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील उमेदवाराने अर्जात नमूद केल्याप्रमाणे) – स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ पदांसाठी १०० श.प्र.मि. वेगाने आणि स्टेनोग्राफर ‘डी’ पदांसाठी ८० श.प्र.मि. वेगाने दिले जाईल. ट्रान्सक्रिप्शनसाठी कालावधी – स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ (इंग्लिश) – ४० मिनिटे, (हिंदी) – ५५ मिनिटे; स्टेनोग्राफार ग्रेड ‘डी’ (इंग्लिश) – ५० मिनिटे, हिंदी – ६५ मिनिटे. स्टेनोग्राफी स्किल टेस्ट स्टाफ सिलेक्शनच्या वेस्टर्न रिजनच्या कार्यालयात किंवा इतर सेंटर्सवर घेतली जाईल. SSC वेस्टर्न रिजन कार्यालयाचा पत्ता – पहिला मजला, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे रोड, मुंबई – ४०० ०२०. वेबसाईट www. sscwr. net

जे उमेदवार स्किल टेस्टमध्ये पात्र ठरतील त्यांचा CBE मधील गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी विचार केला जाईल.

अंतिम निवड आणि नेमणूकीसाठी मंत्रालय/खात्यांचे वाटप उमेदवारांच्या उइए मधील कामगिरीवर आधारित आणि उमेदवारांनी ऑनलाईन सादर केलेल्या मंत्रालये/खात्यांसाठीच्या पसंती क्रमानुसार केली जाईल.

बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) मधील पदांसाठी पसंती देताना उमेदवारांनी ध्यानात ठेवावे की, BRO मधील पदांसाठी शारीरिक मापदंड (उंची – १५७ सें.मी., छाती – ७५-८० सें.मी., वजन ५० कि.ग्रॅ.), शारीरिक क्षमता चाचणी ( PET) (१ मैल अंतर १० मिनिटांत धावणे) आणि वैद्याकिय मापदंड यांचे नियम कडक आहेत. ते आपण पूर्ण करू शकतो की नाही हे पाहूनच उमेदवारांनी इफड साठीचा पसंतीक्रम द्यावा.)

ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवाराचा Live Photograph caputre करण्यासाठी अॅप्लिकेशन मॉड्युल तसे डिझाइन करण्यात आले आहे, त्यासाठी उमेदवारांना तसे सूचित केले जाईल, तेव्हा उमेदवाराने कॅमेऱ्यासमोर (डोळ्यांच्या रेषेत कॅमेरा असावा.) बसून चष्मा न घालता Live Photograph capture केला जाईल. फोटो देताना मागील बॅकग्राऊंड प्लेन असावे व चांगला प्रकाशमान असावे. परीक्षेला जाताना उमेदवाराने आपल्या अलिकडच्या काळात काढलेल्या पासपोर्ट आकाराच्या रंगीत फोटोग्राफच्या दोन प्रती आणि एक आयडी (ओळखपत्र) पुरावा सोबत घेणे आवश्यक.

ऑनलाइन अर्जासोबत JPEG Format (10 kb to 20 kb) मध्ये स्कॅन केलेली (६ सें.मी. रुंदी × २ सें.मी. उंची) आकाराच्या कागदावर केलेली सिग्नेचर स्कॅन करून अपलोड करावयाची आहे.

अजा/अज (Annexure- VII)/ इमाव (Annexure- IX)/ ईडब्ल्यूएस् (Annexure- X)/ माजी सैनिक/ दिव्यांगसाठीचे आरक्षण मागणाऱ्या उमेदवारांकडे जाहिरातीत दिलेल्या नमुन्यातील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सर्व परीक्षांसाठी अॅडमिशन सर्टिफिकेट्स (कॉल लेटर) संबंधित रिजनल ऑफिसच्या www. sscwr. net या संकेतस्थळावर उपलब्ध केली जातील.

ऑनलाइन अर्जात काही सुधारणा/ बदल करावयाचा असल्यास Window for Application Form Correction दि. २७ व २८ ऑगस्ट २०२४(२३.०० वाजे) पर्यंत उपलब्ध असेल.

अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संकेतस्थळावरील जाहिरातीत अनेश्चर- ककक आणि अनेश्चर- कश् मध्ये उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज https:// ssc. gov. in या संकेतस्थळावर दि. १७ ऑगस्ट २०२४ (२३.०० वाजे) पर्यंत करता येतील. (पार्ट-१ वन टाईम रजिस्ट्रेशन, पार्ट-२ ऑनलाइन अॅप्लिकेशन भरणे.) ऑनलाइन अर्ज भरण्याविषयी शंकासमाधानासाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर १८००३०९३०६३.

Story img Loader