सुहास पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बँकेतील संधी

इंडिया एक्झिम बँक ( India Exim Bank) – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागास वर्ग ( NCL) उमेदवारांची ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांवर भरतीसाठी स्पेशल रिक्रूटमेंट ड्राईव्ह. ( Advt. No. HRM/ MT & M/ SRD/२०२३-२४/०२) एकूण रिक्त पदे – १५.

(१) मॅनेजमेंट ट्रेनी ( MT) – १२ पदे (अजा – ४, अज – ५, इमाव – ३).

पात्रता : पदवी सरासरी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि किमान २ वर्षं कालावधीचा पूर्ण वेळ M. B. A./ P. G. D. B. A. फिनान्स स्पेशलायझेशन किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा चार्टर्ड अकाऊंटंट ( CA) पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. ज्यांचा निकाल १ जून २०२४ पर्यंत लागण्याची अपेक्षा आहे. उमेदवारांकडे excellent communication skills आणि कॉम्प्युटर आणि इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी वापरण्याचे कौशल्य अवगत असावे.

(२) मॅनेजर ( MM- II) – ३ पदे (अज – २, इमाव – १).

पात्रता : पदवी सरासरी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि किमान २ वर्षं कालावधीचा पूर्ण वेळ M. B. A./ P. G. D. B. A. फिनान्स स्पेशलायझेशन किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा चार्टर्ड अकाऊंटंट (CA).

अनुभव : ऑफिसर स्केल- क किंवा समतूल्य पदावरील कामाचा किमान ४ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा : १ जानेवारी २०२४ रोजी मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी – इमाव – ३१ वर्षे; अजा/ अज – ३३ वर्षे; दिव्यांग – इमाव – ४१ वर्षे, अजा/ अज – ४३ वर्षे. मॅनेजर पदांसाठी – इमाव – ३७ वर्षे; अजा/अज – ३९ वर्षे.

निवड पद्धती : ऑनलाइन टेस्ट (ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचे प्रश्न) आणि इंटरव्ह्यू. ऑनलाइन टेस्टची निश्चित तारीख आणि वेळ उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल. अंतिम निवड यादी बनविताना डिस्क्रीप्टिव्ह पेपरमधील १०० पैकी गुणांना ८० टक्के वेटेज आणि इंटरह्यूमधील १०० पैकी गुणांना २० टक्के वेटेज दिले जाईल. इंटरव्ह्यूला सामोरे जाण्यापूर्वी उमेदवारांना सायकोमेट्रिक टेस्ट द्यावी लागेल. ज्यासाठी गुण दिले जाणार नाहीत. ऑनलाइन टेस्ट अंदाजे जानेवारी २०२४ मध्ये आयोजित केली जाईल. इंटरव्ह्यू मुंबई आणि/ किंवा नवी दिल्ली येथे जानेवारी/ फेब्रुवारी २०२४ मध्ये होतील.

ऑनलाइन टेस्टसाठीची केंद्र : मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे/ MMR Region, नागपूर, अहमदाबाद, बेंगळूरु, हैदराबाद, भोपाळ इ.

अर्जाचे शुल्क : इमाव – रु. ६००/-, अजा/ अज/ दिव्यांग/ महिला – रु. १००/-. (फक्त इंटिमेशन चार्जेस)

ऑनलाइन टेस्ट : (ए) ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टाईप (पात्रता स्वरूपाची) MCQ (१) रिझनिंग अ‍ॅण्ड क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड, (२) इंग्लिश लँग्वेज, (३) कॉम्प्युटर नॉलेज/ अॅप्टिट्यूड, (४) फिनान्शियल अवेअरनेस (बँकिंग इंडस्ट्री निगडीत), (५) डेटा अॅनालिसिस अॅण्ड इंटरप्रिटेशन यावर प्रत्येकी २० प्रश्न, एकूण १०० प्रश्न, प्रत्येकी १ गुण, एकूण १०० गुण, वेळ ८० मिनिटे.

ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ साठी ५ ऑप्शन्स असतील. चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.

(बी) डिस्क्रीप्टिव्ह पेपर (यातील गुण इंटरव्ह्यूकरिता उमेदवार निवडण्यासाठी वापरले जातील.)

(१) इंग्लिश पेपर निबंध लेखन १ प्रश्न, १५ गुण, पत्रलेखन – १ प्रश्न, १० गुण, एकूण २५ गुण.

(२) प्रोफेशनल नॉलेज – ५ प्रश्न, प्रत्येकी १५ गुणांसाठी, एकूण गुण – ७५. १ अधिक २ साठी एकूण १०० प्रश्न/ १०० गुण, वेळ १०० मिनिटे.

ऑब्जेक्टिव्ह टेस्टमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांचाच डिस्क्रीप्टिव्ह पेपर तपासला जाईल. रिक्त पदांच्या १:५ प्रमाणात उमेदवार इंटरह्यूसाठी डिस्क्रीप्टिव्ह पेपरमधील गुणवत्तेनुसार निवडले जातील.

१ वर्ष कालावधीची ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर मॅनेजमेंट ट्रेनीजना ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड/स्केलवरील डेप्युटी मॅनेजर पदावर कायम केले जाईल. ट्रेनिंग दरम्यान स्टायपेंड असेल रु. ५५,०००/- दरमहा. डेप्युटी मॅनेजर पदांसाठी वेतन रु. १७ लाख प्रतिवर्ष (CTS).

सदर भरतीविषयी विस्तृत माहिती https:// www. eximbankindia. in/ careers या वेबसाईटवरील जाहिरातीमध्ये आणि शुद्धीपत्रकामध्ये उपलब्ध आहे.

ऑनलाइन अर्ज https:// ibpsonline. ibps. in/ iebmtctnovst/ या लिंकमधून दि. १५ जानेवारी २०२४ पर्यंत करावेत. ऑनलाइन रजिस्ट्रेशननंतर उमेदवारांनी सिस्टीम जनरेटेड ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन फॉर्मची आणि ई-रिसिप्टची (ज्यात फी भरल्याची माहिती असेल.) प्रिंटआऊट घ्यावी.

suhassitaram@yahoo.com

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity recruitment to the posts of management trainee special recruitment drive amy
Show comments