सुहास पाटील

सेक्शन ऑफिसरसाठी…

काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR), डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, भारत सरकार – CSIR ‘सेक्शन ऑफिसर’ आणि ‘असिस्टंट सेक्शन ऑफिसर’ पदांची थेट भरतीसाठी कंबाईंड अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस एक्झामिन-२०२३ (CASE-२०२३) घेणार आहे. (Advt. No. E- I/ RC/२०२३/१)

IOCL Apprentice Recruitment 2025:
IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये ४५६ अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
Bank Of Maharashtra Recruitment 2025: Application Begins For 172 Posts, No Written Exam how to apply know details
BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
best started fillingats inviting applications for Joint Assistant in electrical department
अखेर बेस्टला मुहूर्त सापडला, विद्युतपुरवठा विभागात भरती सुरू
Job opportunity Massive recruitment at AIIMS career news
नोकरीची संधी: ‘एम्स’मध्ये महाभरती
Artificial Intelligence Might Enable Communication with Animals
‘जंगल मंगल विद्यापीठा’त कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद भरते तेव्हा…
Rohit Pawar , Davos , Industries offices Maharashtra,
उद्योगांची कार्यालये महाराष्ट्रात, मग करारासाठी दावोसला जाण्याची काय गरज – रोहित पवार यांचा प्रश्न

रिक्त पदांचा तपशील : एकूण रिक्त पदे – ४४४.

(१) सेक्शन ऑफिसर (SO) (Gen/ F & A/ S & C) ग्रुप-बी (गॅझेटेड) – एकूण ७६ पदे. वेतन – पे-लेव्हल ८ (रु. ४७,६०० – १,५१,०००) अंदाजे दरमहा रु. ८७,०००/-.

(i) सेक्शन ऑफिसर (जनरल) – २८ पदे (अजा – ४, अज – २, इमाव – ७, ईडब्ल्यूएस- २, खुला – १३).

(ii) सेक्शन ऑफिसर (फिनान्स अ‍ॅण्ड अकाऊंट्स) – २६ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – २, खुला – १३).

(iii) सेक्शन ऑफिसर (स्टोअर्स अ‍ॅण्ड पर्चेस) – २२ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ११).

(२) असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) (Gen/ F & A/ P & S) ग्रुप-बी (नॉन-गॅझेटेड) – एकूण ३६८ पदे. वेतन – पे-लेव्हल ७ (रु. ४४,९०० – १,४२,४००) अंदाजे वेतन दरमहा रु. ८३,०००/-.

(i) असिस्टंट सेक्शन ऑफिसर (जनरल) – २३७ पदे (अजा – ३५, अज – १७, इमाव – ६६, ईडब्ल्यूएस – २३, खुला – ९६).

(ii) असिस्टंट सेक्शन ऑफिसर (फिनान्स अ‍ॅण्ड अकाऊंट्स) – ८३ पदे (अजा – १२, अज – ६, इमाव – २२, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ३५).

(iii) असिस्टंट सेक्शन ऑफिसर (स्टोअर्स अ‍ॅण्ड पर्चेस) – ४८ पदे (अजा – ७, अज – ३, इमाव – १४, ईडब्ल्यूएस – ४, खुला – २०).

पात्रता : सर्व पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : ३३ वर्षेपर्यंत (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे).

उमेदवारांनी SO आणि ASO पदांसाठीचा आणि कॅडर Gen/ F & A/ S & P साठीचा आपला पसंतीक्रम द्यावयाचा आहे. कॅडरनिहाय गुणवत्तेनुसार व पसंतीक्रमानुसार उमेदवारांची निवड केली जाईल. एकूण ४४४ पदांपैकी १९ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहेत. (कॅटेगरी B/ LV – ५, D/ HH – ५, LD – ५, MD – ४)

निवड पद्धती : लेखी परीक्षा – पेपर-१ – जनरल अवेअरनेस १०० ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न (MCQ) आणि इंग्लिश लँग्वेज अ‍ॅण्ड कॉम्प्रिहेन्शन ५० ऑब्जेक्टिव्ह टाई प्रश्न. (प्रत्येकी १ गुण व प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.३३ गुण वजा केले जातील. एकूण १५० प्रश्न, १५० गुण, वेळ २ तास.)

पेपर-२ – जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग अ‍ॅण्ड मेंटल अ‍ॅबिलिटी – २०० MCQ (प्रत्येकी १ गुण व प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.३३ गुण वजा केले जातील. एकूण २०० प्रश्न, २०० गुण, वेळ २ तास ३० मिनिटे.)

पेपर-३ – इंग्लिश/हिंदी – डिस्क्रिप्टिव्ह पेपर – निबंध लेखन (Essay) – २ प्रश्न, १०० गुण, सारांश लेखन (Precis) – १ प्रश्न, ३० गुण आणि लेटर/ अ‍ॅप्लिकेशन रायटिंग – १ प्रश्न, २० गुण – एकूण १५० गुण, वेळ २ तास.

इंटरव्ह्यूसाठी १०० गुण फक्त सेक्शन ऑफिसर (Gen/ F & A/ S & P) पदांसाठी जे उमेदवार पेपर-१ व पेपर-२ मध्ये किमान पात्रतेचे गुण मिळवतील, त्यांना पेपर-३ साठी बोलाविण्यात येईल.

पेपर-१, पेपर-२ व पेपर-३ मधील ५०० गुणांपैकी पात्रतेसाठीचे किमान गुण मिळालेले उमेदवारांना इंटरव्ह्यूकरिता बोलाविण्यात येईल.

फक्त सेक्शन ऑफिसर पदांसाठी, अंतिम निवडीसाठी ६०० गुणांपैकी मिळविलेली गुणवत्ता विचारात घेतली जाईल.

ASO पदांची निवड पेपर-१, पेपर-२ व पेपर-३ मधील एकत्रित गुणवत्तेनुसार.

कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा झाल्यानंतर CSIR च्या वेबसाईटवर उमेदवारांना उत्तरतालिका (Answer Keys) उपलब्ध करून देण्यात येतील. प्रत्येक प्रश्नास रु. १००/- पेमेंट करून उमेदवारांना हरकती नोंदविता येतील.

परीक्षा केंद्र : पुढील शहरांत असतील. पेपर-१ व पेपर-२ साठी पुणे, नागपूर, अहमदाबाद, बेंगलुरू, भोपाळ, हैदराबाद इ. देशभरातील १९ शहरे.

स्टेज-२ – पेपर-३ आणि ASO पदांसाठी उढळ परीक्षा केंद्र शहरे – पुणे, बेंगळूरु, भोपाळ, हैदराबाद इ. देशभरातील ११ शहरे.

उमेदवारांना CSIR मधील नेमणुकीच्या ठिकाणी उपलब्धतेनुसार अकोमोडेशन दिले जाईल.

या पदांसाठी New Pension Scheme लागू आहे. शंकासमाधानासाठी हेल्पलाईन नं. ०७९६९०४९९५५ (९.०० ते १८.०० वाजे)पर्यंत संपर्क साधावा.

अर्जाचे शुल्क : रु. ५००/- (खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस) (अजा/ अज/ महिला/ दिव्यांग/माजी सैनिक/ सीएसआयआर खाते अंतर्गत कर्मचारी यांना फी माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज https:// www. csir. res. in/ या संकेतस्थळावर दि. १२ जानेवारी २०२४ (१७.०० वाजे) पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जासोबत स्कॅन करून फोटोग्राफ (५० केबी पेक्षा कमी) आणि सिग्नेचर (५० केबी पेक्षा कमी) पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने करावी.

इंटेलिजन्स ब्युरोमधील संधी

इंटेलिजन्स ब्युरो (IB) (गृह मंत्रालय, भारत सरकार) मध्ये ‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड- II/ Technical (ACIO- II/ Tech)’ पदांची GATE स्कोअर आधारित भरती. एकूण रिक्त पदे – २२६. वेतन श्रेणी – लेव्हल-७ (४४,९०० – १,४२,०००) अंदाजे वेतन दरमहा रु. ९१,८००/-.

डिसिप्लिननुसार रिक्त पदांचा तपशील –

(१) ACIO- II/ Tech कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी – ७९ पदे (अजा – ११, अज – ३, इमाव – २५, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ३२).

(२) ACIO- II/ Tech इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन – १४७ पदे (अजा – १८, अज – ६, इमाव – ४६, ईडब्ल्यूएस – १६, खुला – ६१).

पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन (GATE Code EC) किंवा कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (GATE Code CS) विषयातील GATE २०२१ किंवा २०२२ किंवा २०२३ चा व्हॅलिड स्कोअर.

आणि (i) बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेली कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर इंजिनीअरिंग किंवा कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग)

किंवा (ii) एम.एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) किंवा एम.एस्सी. (फिजिक्स – इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयासह) किंवा ट. उ. अ.

वयोमर्यादा : (दि. १२ जानेवारी २०२४ रोजी) १८-२७ वर्षे. कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज/ गुणवान खेळाडू – ५ वर्षे. (कमाल वयोमर्यादा – पुनर्विवाह न केलेल्या विधवा/ परित्यक्ता/ घटस्फोटीत महिला – खुला गट – ३५ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे)

निवड पद्धती : उमेदवारांना ऑनलाईन अर्जात GATE २०२१, २०२२, २०२३ यापैकी सर्वोत्तम गुण दाखवू शकतात. १,००० GATE स्कोअर असलेल्या उमेदवारांना (रिक्त पदांच्या १० पट) इंटरह्यूसाठी निवडले जाईल.

इंटरव्ह्यू : १७५ गुण. संबंधित क्षेत्रातील विषयाचे ज्ञान आणि कम्युनिकेशन स्किलमधील उमेदवारांचे विशेष गुण (Traits) तपासण्यासाठी इंटरव्ह्यू घेतला जाईल.

इंटरव्ह्यूमध्ये सायकोमेट्रिक/अ‍ॅप्टिट्यूड टेस्टचा समावेश असेल. इंटरव्ह्यू दिल्ली येथे घेतले जातील. इंटरव्ह्यूचा दिनांक आणि वेळ उमेदवारांना ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. अंतिम निवड यादी उमेदवाराचे GATE परीक्षेतील आणि इंटरव्ह्यूमधील गुण एकत्रित करून बनविली जाईल.

ऑनलाइन अर्जासोबत रंगीत फोटोग्राफ (३.५ बाय ४.५ सें.मी. (उंची)) (५०-१०० KB); सिग्नेचर ईमेज (५०-१०० KB) स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक.

अर्जाचे शुल्क : सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना भरती प्रक्रिया शुल्क रु. १००/- भरणे अनिवार्य. खुला प्रवर्ग, इमाव, ईडब्ल्यूएस उमेदवारांनी याशिवाय परीक्षा शुल्क रु. १००/- भरणे अनिवार्य आहे. माजी सैनिक ज्यांना केंद्र सरकारमध्ये नियमित नोकरी मिळाली आहे, त्यांनी रु. १००/-+रु. १००/- भरणे अनिवार्य आहे. SBI चलान दि. १२ जानेवारी २०२४ पर्यंत जनरेट केले असेल तर ते बँकेत दि. १६ जानेवारी २०२४ पर्यंत जमा करता येईल.

शंकासमाधानासाठी अ‍ॅप्लिकेशन पोर्टलवर उपलब्ध हेल्प डेस्क टॅबवर लॉगइन करून संपर्क साधा किंवा फोन नं. ७३५३९४५५५३ वर संपर्क साधा. सोमवार ते शनिवार १०.०० ते १८.०० वाजेदरम्यान.

ऑनलाइन अर्ज www. mha. gov. in किंवा www. ncs. gov. in या संकेतस्थळावर दि. १२ जानेवारी २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत. (Step- I – Registration, Step- II – Re- login and select category completion of Application Form)

suhassitaram@yahoo.com

Story img Loader