मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या नॉन-क्रिमी लेअर गटाच्या युवक-युवतींसाठी पूर्ण वेळ, अनिवासी, नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेश (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)), पुणे (नियोजन विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) व एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर, इंडो जर्मन टूल रुम (IGTR), औरंगाबाद (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्याम मंत्रालयांतर्गत भारत सरकारची संस्था) यांच्याद्वारे पुढील कोर्सेससाठी एकूण प्रवेश – ४२५.

(I) १० वी उत्तीर्ण पात्रता असलेले सर्टिफिकेट कोर्सेस (NSQF लेव्हल-४, ३.५, ३) –

Ladki Bahin Yojana
Maharashtra News Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Congress complains against BJP advertisement Election Commission explanation of inquiry Print politics news
भाजपच्या जाहिरातीविरोधात काँग्रेसची तक्रार; चौकशी करण्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
Sanjay Raut
Sanjay Raut : “महायुतीला जिंकवण्यासाठी पोलीस व गुंडांच्या बैठका”, राऊतांचे आरोप; यादी देण्यास तयार, वरिष्ठ अधिकाऱ्याला म्हणाले, “सरकार बदलल्यावर…”
Protest against recovery drive of Sangli District Bank
सांगली जिल्हा बँकेच्या वसुली मोहीम विरोधात आंदोलन
Vivek Phansalkar has additional charge of the post of Director General
मुंबई : विवेक फणसळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार
महाराष्ट्रातील तो फॉर्म्युला बिहारमध्येही चालणार? भाजपा नितीश कुमार यांना का सांभाळून ठेवतंय? (फोटो सौजन्य पीटीआय )
महाराष्ट्रात जे घडलंय, ते बिहारमध्येही घडणार? भाजपासाठी नितीश कुमार इतके महत्वाचे का?
Congress leader Rahul Gandhi accused Adani in the joint meeting of India alliance
संविधानामुळेच अदानींना रोखण्यात यश; ‘इंडिया’ आघाडीच्या संयुक्त सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप

(१) सर्टिफिकेट कोर्स इन CNC टर्निंग मिलिंग – औरंगाबाद येथे २५ जागा (कालावधी १२ महिने).

(२) ज्युनियर टेक्निशियन टूल अँड डायमेकर (कंडेन्स्ड् कोर्स इन टूल अँड डायमेकिंग) – कालावधी – १२ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.

(३) असिस्टंट ऑपरेटर CNC टर्निंग – टूल रुम (सर्टिफिकेट कोर्स इन CNC टर्निंग) – कालावधी – ६ महिने, प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५, वाळुंज – २५.

(४) असिस्टंट ऑपरेटर CNC मिलिंग – टूल रुम (सर्टिफिकेट कोर्स इन CNC मिलिंग) – कालावधी – ६ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५, वाळुंज – २५.

(II) आयटीआय उत्तीर्ण (टर्नर/ फिटर/ मशिनिस्ट/ ग्राईंडर/ टूल अँड डाय मेकर) पात्रता असलेले कोर्सेस (NSQF लेव्हल-५, ४)

(५) अॅडव्हान्स्ड् सर्टिफिकेट कोर्स इन CNC मशिनिंग – औरंगाबाद २५ जागा (कालावधी १२ महिने).

(६) सर्टिफिकेट कोर्स इन CNC मशिनिंग – औरंगाबाद २५ (कालावधी ६ महिने).

(III) आयटीआय उत्तीर्ण (फिटर/ इलेक्ट्रिशियन/ MMTM/ MMTR/ इलेक्ट्रिकल/ वायरमन) पात्रता असलेले कोर्सेस (NSQF लेव्हल-५)

(७) अॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटेनन्स – औरंगाबाद – २५ (कालावधी – १२ महिने).

(IV) डिग्री/डिप्लोमा (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग) पात्रता असलेले कोर्सेस (NSQF Level ६) –

(८) पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड CAD/ CAM – औरंगाबाद – २५, कोल्हापूर – २५, नागपूर – २५, पुणे – २५ (कालावधी १२ महिने).

(९) पोस्ट डिप्लोमा इन टूल अँड डाय मॅन्युफॅक्चरिंग – औरंगाबाद – २५ (कालावधी १२ महिने).

(V) डिग्री/डिप्लोमा (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग) पात्रता असलेले कोर्सेस (NSQF Level ४.५, , ६) उत्तीर्ण/अंतिम परीक्षेस बसणारे –

(१०) ज्युनियर डिझायनर CAD/ CAM (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन CAD/ CAM) – नागपूर – २५, कोल्हापूर – २५. (कालावधी ६ महिने).

(११) ज्युनियर डिझायनर टूल (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन टूल डिझाईन) औरंगाबाद – २५, कोल्हापूर – २५, नागपूर – २५, वाळुज – २५, पुणे – २५ जागा (कालावधी ६ महिने).

(१२) टेक्निकल सुपरवायझर कॉम्प्युटर एडेड इंजिनीअरिंग (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर एडेड टूल इंजिनीअरिंग) – औरंगाबाद – २५, नागपूर, २५, पुणे – २५, कोल्हापूर – २५, वाळुंज – २५ (कालावधी – ६ महिने).

(१३) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन CNC टेक्नॉलॉजी – औरंगाबाद – २५, वाळुज – २५ (कालावधी – ६ महिने).

(VI) डिग्री/डिप्लोमा (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग) पात्रता असलेले कोर्सेस –

(१४) पोस्ट डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स – औरंगाबाद – २५ (कालावधी १२ महिने) (NSQF Level ६).

(१५) सिनियर टेक्निशियन मेकॅट्रॉनिक्स (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन मेकॅट्रॉनिक्स) – औरंगाबाद – २५ जागा (कालावधी ६ महिने) (NSQF Level ४.५).

(१६) सिनियर टेक्निशियन मेंटेनन्स अँड ऑटोमेशन (अॅडव्हान्स डिप्लोमा इन मशिन मेंटेनन्स अँड ऑटोमेशन) – औरंगाबाद – २५ (कालावधी ६ महिने) (NSQF Level ४.५).

(VII) डिग्री (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग) पात्रता असलेले कोर्स (अंतिम परीक्षेस बसणारे उमेदवारसुद्धा पात्र आहेत.) –

(१७) प्रोसेस डिझायनर ऑटोमेशन (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन ऑटोमेशन अँड प्रोसेस कंट्रोल) (NSQF Level ५.५) – औरंगाबाद – २५ (कालावधी – ६ महिने).

(VIII) डिग्री/डिप्लोमा सिव्हील इंजिनीअरिंग पात्रता असलेले कोर्स –

(१८) फ्रंट लाईन ज्युनियर सुपरवायझर कन्स्ट्रक्शन अॅडव्हान्स डिप्लोमा इन स्ट्रक्चरल डिझाईन अँड अॅनालिसिस – प्रवेश क्षमता – १०० (औरंगाबाद – २५, कोल्हापूर – २५, पुणे – २५, नागपूर – २५) (कालावधी ६ महिने) (NSQF Level ४.५).

अ.क्र. १० ते १३, १५ व १६ वरील कोर्सेससाठी संबंधित डिग्री/डिप्लोमाच्या अंतिम परीक्षेस बसणारे उमेदवारसुद्धा पात्र आहेत.

वरील सर्व कौशल्य विकास प्रशिक्षण हे निशुल्क असून ते आयजीटीआर, औरंगाबाद या राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकारच्या संस्थेद्वारे औरंगाबाद व या संस्थेच्या पुणे, नागपूर, कोल्हापूर व वाळुज उपकेंद्रात देण्यात येईल.

सदर प्रशिक्षण हे अनिवासी (non- residential) असून प्रशिक्षणा दरम्यान राहणे व जेवण्याची व्यवस्था प्रशिक्षणार्थ्यास स्व-खर्चाने करावी लागेल.

वयाची अट : १८ ते ३५ वर्षे.

हेही वाचा >>> करिअर मंत्र

निवड पद्धती : प्राप्त अर्जांमधून निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करून निवडक उमेदवारांना पात्रता प्रवेश परीक्षा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

उमेदवारांनी ज्या प्रशिक्षण केंद्राची निवड केली आहे. त्याच प्रशिक्षण केंद्रावर त्यांची पात्रता प्रवेश परीक्षा, मुलाखत व कागदपत्र पडताळणी दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात येईल. पात्रता प्रवेश परीक्षा इंग्रजी, गणित व सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित राहील.

प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी आय्जीर्टीआ व अमृतच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. http://www.igtr-aur.org

प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवारांस प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षण मध्येच सोडून जाता येणार नाही.

उमेदवारास नॉन-क्रिमी लेयर सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे.

ज्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र नसेल अशा उमेदवारांची जात ही शाळा/ महाविद्यालय सोडल्याच्या दाखल्यावरून (T. C./ L. C.) ग्राह्य धरण्यात येईल.

अर्जासोबत जोडावयाची/अपलोड करावयाची कागदपत्रे : (१) विहीत नमुन्यातील व फोटोसहित पूर्ण भरलेला अर्ज, (२) विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र, (३) प्रशिक्षणानुसार आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्र (१० वी, १२ वी, आयटीआय डिप्लोमा, डिग्री इ.), (३) जातीचे प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला, (४) जातीचे प्रमाणपत्र नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र (कुणबी प्रवर्गासाठी), (५) ईडब्ल्यूएस/एसईबीसी व नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र (मराठा प्रवर्गासाठी), (६) जन्म दाखला, (७) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र, (८) आधारकार्ड, (९) स्वत:चा फोटो, (१०) स्वत:ची सही, (११) मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट.

ज्या उमेदवारांना आयजीटीआर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर व वाळुज यापैकी जिथे प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांनी त्याच सेंटरच्या खाली दिलेल्या QR Code किंवा संस्थेच्या http://www.igtr-aur.org या संकेतस्थळावर दि. २८ डिसेंबर २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत. प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख ६ जानेवारी २०२५ आहे.

Story img Loader