सुहास पाटील
केंद्र सरकारमध्ये किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांना हिंदी/ इंग्रजीसोबत मराठी माध्यमातून परीक्षा देऊन नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी या लेखाचा उर्वरीत भाग…
ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवाराचा Live photograph capture करण्यासाठी अॅप्लिकेशन Module तसे डिझाईन केले आहे. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवाराला कॉम्प्युटरवर सूचित केले जाईल तेव्हा उमेदवाराने कॅमेऱ्यासमोर (डोळ्यांच्या रेषेत कॅमेरा असावा) बसून चष्मा न घालता Live Photograph capture केला जाईल. फोटो देताना मागील बॅकग्राऊंड प्लेन असावे व चांगला प्रकाशमान असावा. परीक्षेला जाताना उमेदवाराने आपले अलिकडच्या काळात काढलेले दोन पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटोग्राफ आणि एक आयडी (ओळखपत्र) प्रूफ सोबत घेणे आवश्यक. ऑनलाइन अर्जासोबत ( JPEG Format (१०-२० KB) Image dimension ६.० cm. width x २.० cm height signature) स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक.
पात्र उमेदवारांना CBE साठी अॅडमिशन सर्टिफिकेट (AC) स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या रिजनल ऑफिसच्या वेबसाईटवर उपलब्ध केला जाईल. महाराष्ट्रातील उमेदवारांनी आपले अॅडमिट सर्टिफिकेट SSC (WR), मुंबईच्या www. sscwr. net या संकेतस्थळावरून डाऊनलोड करावेत. फोन नंबर ९८६९७३०७००/ ७७३८४२२७०५.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज अंतिम तारखेच्या खूप अगोदर करणे आवश्यक, शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नये.
राज्यांसाठीचा पसंतीक्रम : ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना पदांसाठी नेमणूक हव्या असलेल्या पद आणि राज्याचा केंद्रशासित प्रदेश / कॅडर कंट्रोल अॅथॉरिटी (CCAs) साठीचा पसंतीक्रम द्यावयाचा आहे. Annexure XIV/ XV/ XVI प्रमाणे हवालदार पदांसाठी CBIC CCAs च्या टेरिटोलियल ज्युरिस्डिक्शन कोड नंबर आणि हवालदारची रिक्त पदे यांचा तपशील-
(१) मुंबई CGST अंतर्गत येणारे जिल्हे – मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड (महाराष्ट्रातील पुणे CGST आणि नागपूर CGST कमिशनरेट वगळता इतर CGST कमशिनरेट्स) (कोड नं. ४७) – ३०४ पदे.
(२) पुणे CGST अंतर्गत येणारे जिल्हे – पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर (महाराष्ट्रातील पुणे उॅरळ अंतर्गत येणारी कमिशनरेट्स) (कोड नं. ४९) – ९ पदे.
(३) नागपूर CGST अंतर्गत येणारे जिल्हे – नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलाढाणा, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड (महाराष्ट्रातील नागपूर CGST अंतर्गत येणारी कमिशनरेट्स) (कोड नं. ४८) – ० पदे.
(४) वडोदरा CGST (गुजरात, दादरा नगर हवेली, दमण आणि दिव) (कोड नं. ५०) – ५५० पदे.
(५) गोवा CGST (गोवा राज्यातील CCA) (कोड नं. ४६) – १३ पदे.
(६) गोवा कस्टम्स (अंतर्गत येणारी कस्टम्स कमिशनरेट्स) (कोड नं. ५१) – १८ पदे.
(७) मुंबई कस्टम्स (महाराष्ट्र राज्यातील नागपूर CGST CCA वगळता कोड नंबर ५२) – २३ पदे.
(८) CBN डायरेक्टोरेट (मुख्यालय ग्वालियर, नीमच (मध्य प्रदेश), लखनौ (यू.पी.) कोटा (राजस्थान) येथील ब्रँच ऑफिसेस) (कोड नं. ७०) – २६९ पदे.
(९) डायरेक्टोरेट जनरल ऑफ परफॉरमन्स मॅनेजमेंट (DGPM) (सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश) (कोड नं. ७१) – १८२ पदे.
MTS पदांसाठी राज्य निहाय कोड नंबर (रिक्त पदांचा तपशील उपलब्ध नाही.)
MTS Maharashtra (कोड नंबर ५६) (झोन WR)
MTS Goa (कोड नंबर ५४) (झोन WR)
MTS Gujarat (कोड नंबर ५५), MTS Andhrapradesh (कोड नंबर ६१)
MTS Telangana (कोड नंबर ६३) (झोन SR)
MTS Karnataka (कोड नंबर ६७) (झोन KKR)
MTS all India (कोड नंबर ७२)
SSC च्या वेबसाईटवरील MTS परीक्षेच्या जाहिरातीमधील दिलेल्या नमुन्यातील दाखले अजा/अजच्या उमेदवारांनी Annexure- VII, इमावच्या उमेदवारांनी Annexure- IX, ईडब्ल्यूएसच्या उमेदवारांनी Annexure- X प्रमाणे सादर करावे.
ऑनलाइन अर्ज https:// ssc. gov. in या संकेतस्थळावर दि. ३१ जुलै २०२४ (२३.०० वाजे) पर्यंत करावेत.
(स्टेज- I – One Time Registration – Annexure- III मधील सूचनांचे पालन करा. (SSC च्या जुन्या वेबसाईटवर केलेले रजिस्ट्रेशन चालणार नाही.) स्टेज- II – ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी Annexure- IV मधील सूचनांचे पालन करा. (After Registration; login with your ‘Registration Number’ and Password; click Apply link in Multi Tasking ( Non- Technical) Staff and Havaldar ( CBIC & CBN) Examination-2024 under ‘Latest Notification’)
सबमिट केलेल्या ऑनलाइन अर्जामध्ये काही करेक्शन्स करावयाचे असल्यास दि. १६ ते १७ ऑगस्ट २०२४ (२३.०० वाजे)पर्यंत आवश्यक ती फी भरून करता येईल. त्यासाठी ‘Window for Application Form Correction’ उपलब्ध करून दिली जाईल.