सुहास पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC) मार्फत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस (सी.ए.पी.एफ.) आणि सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स (एस.एस.एफ.) मध्ये काँस्टेबल (जीडी) व आसाम रायफल्स (एआर) मध्ये रायफलमन (जीडी) पदावर भरती. एकूण रिक्त पदे – २६,१४६ (पुरुष – २३,३४७ आणि महिला – २,७९९). एकूण रिक्त पदांच्या १० टक्के पदे माजी सैनिकांसाठी राखीव आहेत. पात्र माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास या जागा इतर उमेदवारांमधून भरल्या जातील. CAPFs आणि आसाम रायफल्समधील रिक्त पदे ही राज्य/केंद्रशासित प्रदेश निहाय निश्चित केली आहेत. त्यामुळे उमेदवारांना डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करावे लागेल. ररा मधील काँस्टेबल (जीडी) अखिल भारतीय पातळीवर भरली जातील. दिव्यांग उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.

फोर्सनुसार रिक्त पदांचा तपशील –

(१) बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बी.एस.एफ.) – एकूण ६,१७४ पदे.

पुरुष – ५,२११ (अजा – ७३५, अज – ४६७, इमाव – १,०२८, ईडब्ल्यूएस – १,०२५, खुला – १,९५६). महिला – ९६३ (अजा – १३८, अज – ८३, इमाव – १९९, ईडब्ल्यूएस – १८१, खुला – ३६२).

(२) सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सी.आय.एस.एफ.) – एकूण ११,०२५ पदे.

पुरुष – ९,९१३ (अजा – १,५०६, अज – ९७४, इमाव – २,१९६, ईडब्ल्यूएस – १,०८६, खुला – ४,१५१). महिला – १,११२ (अजा – १६४, अज – १०३, इमाव – २४४, ईडब्ल्यूएस – १२५, खुला – ४७६).

(३) सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (सी.आर.पी.एफ.) – एकूण ३,३३७ पदे.

पुरुष – ३,२६६ (अजा – ४६१, अज – २९४, इमाव – ६८८, ईडब्ल्यूएस – ५०९, खुला – १,३१४). महिला – ७१ (अजा – २, अज – १, इमाव – १३, ईडब्ल्यूएस – १०, खुला – ४५).

(४) सीमा सुरक्षा बल (एस.एस.बी.) – एकूण ६३५ पदे.

पुरुष – ५९३ (अजा – १०३, अज – ४५, इमाव – १२५, ईडब्ल्यूएस – ९४, खुला – २२६). महिला – ४२ (अजा – १६, अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – ०, खुला – १९).

(५) इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (आय.टी.बी.पी.) – एकूण ३,१८९ पदे.

पुरुष – २,६९४ (अजा – ३८०, अज – ३०६, इमाव – ५२३, ईडब्ल्यूएस – २८५, खुला – १,२००). महिला – ४९५ (अजा – ७४, अज – ५४, इमाव – ९९, ईडब्ल्यूएस – ३८, खुला – २३०).

(६) सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स (एस.एस.एफ.) – एकूण २९६ पदे.

पुरुष – २२२ (अजा – ३३, अज – १६, इमाव – ६०, ईडब्ल्यूएस – २३, खुला – ९०). महिला – ७४ (अजा – ११, अज – ६, इमाव – २०, ईडब्ल्यूएस – ७, खुला – ३०).

(७) आसाम रायफल्स (ए.आर.) – एकूण १,४९० पदे.

पुरुष – १,४४८ (अजा – ११६, अज – २५२, इमाव – १५६, ईडब्ल्यूएस – २३५, खुला – ६८९). महिला – ४२ (अजा – ३, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १५, खुला – २१).

पात्रता – दि. १ जानेवारी २०२४ रोजी १० वी उत्तीर्ण.

वेतन श्रेणी – सर्व पदांसाठी पे-लेव्हल – ३ (रु. २१,७०० – ६९,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४२,०००/-.

वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०२४ रोजी) १८ ते २३ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी २००१ ते १ जानेवारी २००६ दरम्यानचा असावा.) (इमाव – २६ वर्षेपर्यंत, अजा/ अज – २८ वर्षेपर्यंत) (१० वी उत्तीर्ण प्रमाणपत्रात नोंदविलेली जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल.)

अर्जाचे शुल्क – रु. १००/-. (महिला/ अजा/ अज/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.) अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने दि. १ जानेवारी २०२४ (२३.०० वाजे) पर्यंत भरता येईल.

परीक्षा केंद्र – स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेस्टर्न रिजनमधील गोवा/ महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र – पणजी, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे.

निवड पद्धती – ( i) संगणक आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा (सी.बी.ई.) (फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेतली जाईल.) (तारीख लवकरच कमिशनच्या संकेतस्थळावर जाहीर होईल.) कालावधी – ६० मिनिटे, ८० प्रश्न, १६० गुण. (१) सामान्य बुद्धिमत्ता व कारणे, (२) सामान्य ज्ञान व सामान्य जागरुकता, (३) प्राथमिक गणित, (४) इंग्लिश/ हिंदी. प्रत्येक विषयाचे २० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण असतील. प्रश्नपत्रिका हिंदी/ इंग्रजी भाषांबरोबर मराठी, कोंकणी, कन्नड इ. १३ रिजनल लँग्वेजेसमध्ये असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.

एन्सीसी ‘सी’ सर्टिफिकेट धारकांना ८ गुण, एन्सीसी ‘बी’ सर्टिफिकेट धारकांना ४.८ गुण व एन्सीसी ‘ए’ सर्टिफिकेट धारकांना ३.२ गुण अधिकचे दिले जातील. ऑनलाईन अर्जात तशी नोंद करणे आवश्यक. CBE मधील कामगिरीनुसार उमेदवार PET साठी शॉर्टलिस्ट केले जातील.

( ii) शारीरिक क्षमता चाचणी (पी.ई.टी.) – पुरुष – ५ कि.मी. अंतर २४ मिनिटांत धावणे आणि १.६ कि.मी. अंतर ७ मिनिटांत धावणे. महिला – १.६ कि.मी. अंतर ८ १/२ मिनिटांत धावणे आणि ८०० मी. अंतर ५ मिनिटांत धावणे.

( iii) शारीरिक मापदंड चाचणी (पी.एस्.टी.) – उंची – पुरुष – १७० सें.मी. (अज – १६२.५ सें.मी.), महिला – १५७ सें.मी. (अज – १५० सें.मी.) (नक्षलग्रस्त जिह्यातील (गडचिरोली आणि गोंदिया) अज उमेदवारांसाठी उंची १६० सें.मी. (पुरुष), १४७.५ सें.मी. महिला) (छाती – पुरुष – ८० ते ८५ सें.मी. (अज – ७६ ते ८१ सें.मी.) नक्षलग्रस्त जिह्यांची यादी Annexure- XII मध्ये उपलब्ध आहे.

उंची व छातीच्या मोजमापात सूट मागणाऱया उमेदवारांना (अनुसूचित जमातीचे उमेदवार वगळता) वेबसाईटवरील जाहिरातीमधील Annexure- IX प्रमाणे सर्टिफिकेट सादर करावे लागेल. अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सादर करावे.

( iv) वैद्याकीय तपासणी – डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन (डी.एम.ई.)/रिह्यू मेडिकल एक्झामिनेशन (आर.एम.ई.) दृष्टी – चष्म्याशिवाय – दूरची दृष्टी – चांगला डोळा – ६/६, खराब डोळा ६/९. वैद्याकीय तपासणी/ पीईटी/ पीएसटी फक्त पात्रता स्वरूपाची असेल.

( ५) कागदपत्र पडताळणी नंतर अंतिम निवड सीबीईमधील गुणवत्तेनुसार कॅटेगरीनिहाय केली जाईल.

शंकासमाधानासाठी हेल्पलाईन नंबर ०११-२६१६०२५५ वर संपर्क साधावा. CT ( GD) निवडीची विस्तृत माहिती http:// crpf. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज कसा करावा याची माहिती जाहिरातीमधील Annexure- I आणि Annexure- II मध्ये दिलेली आहे.

रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो (३.५ सें.मी. बाय ४.५ सें.मी. उंची) JPEG Format मध्ये स्कॅन करून (२० केबी ते ५० केबी). फोटो जाहिरात प्रसिद्धी दि. २४ नोव्हेंबर २०२३ च्या ३ महिने अगोदर काढलेला नसावा. तसेच स्कॅण्ड् सिग्नेचर (JPEG Format १० to २० KB (इमेज डायमेन्शन ४.०० बाय २.०० सें.मी. (उंची))) अपलोड करणे आवश्यक.

CBE चे अॅडमिट कार्ड SSC रिजनल ऑफिसच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतील. (महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी SSC वेस्टर्न रिजनल ऑफिसची वेबसाईट आहे www. sscwr. net) मोबाईल नं. ०९८६९७३०७००, ०७७३८४२२७०५. SET/ PST/ DME/ RME साठीचे अॅडमिशन सर्टिफिकेट CRPF च्या http:// crpf. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जातील.

ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना वेगवेगळ्या सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेससाठी पसंतीक्रम द्यावा लागेल. B. S. F. ( A), CISF (B), CRPF ( C), SSB ( D), ITBP ( E), AR ( F), SSF ( H)

ऑनलाइन अर्ज https:// ssc. nic. in ( One time Registration & gt; Filling of Online Application) ( Latest Notification Tab Section & gt; Apply & gt; Constable- GD in CAPFs, SSF Rifleman ( GD) in Assam Riffles २०२४) वर दि. ३१ डिसेंबर २०२३ (२३.०० वाजे)पर्यंत करावेत.

पूर्ण भरलेल्या ऑनलाइन अर्जात काही बदल करावयाच्या असल्यास window for Application Form Correction दि. ४ ते ६ जानेवारी २०२४ (२३.०० वाजे)पर्यंत उपलब्ध असेल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity staff selection commission secretariat security force rifleman recruitment to the post amy
Show comments