● नेव्ही चिल्ड्रन स्कूल, कुलाबा, मुंबई – ४००००५. (नेव्ही एज्युकेशन सोसायटी अंतर्गत CBSE बोर्डाशी संलग्न शाळा) पुढील रिक्त पदांची भरती –
( I) प्रायमरी टीचर (पीआरटी) –
(अ) पीआरटी (जनरल आणि हिंदी)-
पात्रता – पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि बी.एड./ D. EI. Ed किंवा समतुल्य कोर्स किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(ब) पीआरटी (कॉम्प्युटर सायन्स) –
पात्रता – संबंधित विषयातील पदवी/बी.सी.ए. किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (बी.एड. पात्रताधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.)
( II) ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (टीजीटी) –
(अ) टीजीटी (समाजशास्त्र, इंग्लिश आणि गणित) –
पात्रता – ( i) संबंधित विषयातील पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. ( ii) बी.एड. किंवा समतुल्य पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. ( iii) १२ वीच्या स्तरावरदेखील संबंधित विषय अभ्यासलेला असावा. ( iv) संबंधित विषयातील मास्टर्स डिग्री असल्यास आणि/किंवा सीबीएसई शाळांमध्ये शिकविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
(ब) टीजीटी (कॉम्प्युटर सायन्स) –
पात्रता – संबंधित विषयातील पदवी/बी.सी.ए. किमान ५५ टक्के गुण (बी.एड. पात्रताधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल).
(क) TGT (फिनान्शियल लिटरसी आणि मार्केट मॅनेजमेंट) –
पात्रता – पदवी आणि एनएसई सर्टिफिकेट इन फिनान्शियल मार्केट्स ( NCFM) ३ मॉड्युल्ससह किमान ६० टक्के गुण.
( III) पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (पीजीटी)-
(अ) पीजीटी (कॉमर्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इंग्लिश आणि मॅथ्स) (इयत्ता ११ वी व १२ वीसाठी) –
पात्रता – ( i) संबंधित विषयातील मास्टर्स डिग्री किमान ५५ टक्के गुण. ( ii) संबंधित विषयातील बी.एड.पदवी किंवा समतुल्य पदवी किमान५० टक्के गुण. ( iii) संबंधित विषय उमेदवाराने १२ वी आणि पदवीस्तरावर अभ्यासलेला असावा. ( iv) संबंधित विषय सीबीएसई शाळांमध्ये शिकविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा – (दि. १ जुलै २०२५ रोजी) २१ ते ५० वर्षे.
उमेदवाराकडे चांगले व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट संभाषण कौशल्ये आणि हिंदीमध्ये संवाद साधण्याची क्षमता असावी. संगणक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स/ईआरपी सॉफ्टवेअर/एलएमएस पॅकेजेस यांचे कार्यक्षम ज्ञान आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस सॉफ्टवेअरमध्ये पारंगत असावा.
उमेदवार शारीरिक आणि वैद्याकीयदृष्ट्या योग्य असावा. उमेदवाराकडे उच्च नैतिक चारित्र्य असावे.
विहीत नमुन्यातील अर्ज www. ncsmumbai. nesnavy. in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या स्वयंसाक्षांकीत कागदपत्रांसह रजिस्टर्ड पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने एनसीएस, मुंबई येथे अर्जावर दिलेल्या पत्त्यावर दि. २१ मे २०२५ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.
suhaspatil237 @gmail. com