महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/ कोकण/ नागपूर/ नाशिक/ छत्रपती संभाजीनगर/ अमरावती विभागातील गट-ब च्या एकूण २८९ पदांची भरती.
(१) रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित) – एकूण २६१ पदे
पात्रता : (दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी) स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञानमधील ३ वर्षांची पदविका किंवा तत्सम अर्हता.
(२) उच्च श्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित) एकूण ९ पदे
पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि लघुलेखनाचा वेग किमान १२० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
(३) निम्न श्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित) – एकूण १९ पदे
पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि लघुलेखनाचा वेग किमान १० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
वयोमर्यादा : (दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी) १८ वर्षे पूर्ण ते ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
कमाल वयोमर्यादेत सूट – मागासवर्गीय, खेळाडू, आदुघ, साशैमाप्रसाठी – ५ वर्षे; अनाथ व दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे.
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – रु. १,०००/-; राखीव प्रवर्ग – रु. ९००/-; याशिवाय बँकिंग चार्जेस आणि त्यावरील देय कर भरावा लागेल.
वेतन स्तर : रचना सहायक व निम्नश्रेणी लघुलेखक पदांसाठी – एस-१४ रु. ३८,६०० १,२२,८००. (अधिक नियमानुसार भत्ते)
उच्च श्रेणी लघुलेखक – एस-१५ रु. ४१,८०० १,३२,३०० (अधिक नियमानुसार भत्ते).
निवड पद्धती : रचना सहायक पदांसाठी ऑनलाइन परीक्षा (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची) २०० गुणांची वेळ २ तास (प्रत्येकी २ गुणांचा १ प्रश्न याप्रमाणे १०० प्रश्न) प्रश्नपत्रिका एकूण ५ गटांत विभागलेली असेल. (१) तांत्रिक प्रश्नांसाठी ८० गुण (वेळ ४८ मिनिटे), (२) मराठी, (३) इंग्रजी, (४) सामान्य ज्ञान, (५) बैद्धिक चाचणीसाठी प्रत्येक विषयास ३० गुण असे १२० गुण. (वेळ प्रत्येकी १८ मिनिटे)
उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक पदांसाठी – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाइन परीक्षा १२० गुणांची (प्रत्येक २ गुणांचा एक प्रश्न असे ६० प्रश्न वेळ ९० मिनिटे. प्रश्नपत्रिका ४ गटांत विभागलेली असेल. प्रत्येक गटास वेळ २२.३० मिनिटे.) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास ३० गुण.
उमेदवारास प्रश्नपत्रिकेत नमूद केल्यानुसारच्या गटनिहाय विशिष्ट क्रमाने प्रश्न सोडविणे अनिवार्य राहील.
ऑनलाईन परीक्षेत किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणाऱया उमेदवारांची गुणांनुसार शिफारस केली जाईल.
परीक्षा केंद्र : पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, अमरावती, नाशिक, मुंबई.
परीक्षेचा अभ्यासक्रम www. dtp. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ या लिंकवर उपलब्ध आहे.
अराखीव महिलांकरिता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव तसेच मागासवर्गीय महिलांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱयाचे प्रमाणपत्र (नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र) सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे.
शिफारस झालेल्या उमेदवारांनी कागदपत्र छाननीच्या वेळी मूळ प्रमाणपत्र आणि त्यांच्या साक्षांकीत छायाप्रती दोन प्रतीत सादर करणे बंधनकारक आहे. (www. dtp. maharashtra. gov. in यावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ या लिंकवरील पॅरा २६ मध्ये दिल्याप्रमाणे)
निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील कोकण-१, कोकण-२, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर विभागात नियुक्ती देण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज www. dtp. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर दि. २९ ऑगस्ट २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत. (नोंदणी/ नवीन खाते निर्माण करणे; प्रोफाईल निर्मिती/ प्रोफाईल अद्यायावत करणे ; अर्ज सादरीकरण; ऑनलाइन परीक्षा शुल्क भरणे; छायाचित्र व स्वाक्षरी (तसेच जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी, शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण, वयोमर्यादा शिथिलीकरण संबंधित वैध प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती स्कॅन करून अपलोड करणे.