नवोदय विद्यालय समिती ( NVS) (भारत सरकार, शिक्षण मंत्रालयांतर्गत एक स्वायत्त संस्था) नॉन-टिचिंग पदांची भरती मोहीम २०२४. NVS अंतर्गत देशभरातील ६५० जवाहर नवोदय विद्यालयांत तसेच NVS चे मुख्यालय, ८ रिजनल ऑफिसेस, ७ नवोदय लिडरशिप इन्स्टिट्यूट्समध्ये पुढील नॉन-टिचिंग पदांची भरती.
( I) ग्रुप-बी मधील पदे –
(१) फिमेल स्टाफ नर्स – १२१ पदे (अजा – १०, अज – २, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – १२, खुला – ८५) (५ पदे दिव्यांग कॅटेगरी OH – २, VH – २, इतर – १ पदे राखीव). पात्रता – ( i) बी.एससी. (नर्सिंग)/पोस्ट बी.एससी. (नर्सिंग), ( ii) स्टेट नर्सिंग काऊन्सिलकडे रजिस्टर्ड नर्स किंवा नर्स मिडवाईफ, (iii) किमान ५० खाटांच्या हॉस्पिटलमधील २ वर्षांचा अनुभव.
(२) असिस्टंट सेक्शन ऑफिसर – ५ पदे (इमाव – १, खुला – ४). पात्रता – (i) पदवी उत्तीर्ण, (ii) अॅडमिनिस्ट्रेशन, फिनान्शियल मॅटर्स संबंधित कामाचा सरकारी/ निमसरकारी/ स्वायत्त संस्था कार्यालयातील ३ वर्षांचा अनुभव.
(३) ऑडिट असिस्टंट – १२ पदे (अजा – २, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८). पात्रता – बी.कॉम. इष्ट पात्रता – सरकारी/निमसरकारी/स्वायत्त संस्थांमधील अकाऊंट्स कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
हेही वाचा : UPSC ची तयारी :विज्ञान आणि तंत्रज्ञान
(४) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर – ४ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – २). पात्रता – ( i) पदव्युत्तर पदवी, ( ii) हिंदीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून हिंदी भाषांतर डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स किंवा सरकारी/ निमसरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामधील २ वर्षांचा भाषांतर करण्याचा अनुभव.
(५) लीगल असिस्टंट – १ पद (खुला). पात्रता – ( i) कायदा विषयातील पदवी, ( ii) सरकारी/स्वायत्त संस्था/ PSU मधील लीगल केसेस संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
( II) ग्रुप-सी मधील पदे –
(६) स्टेनोग्राफर – २३ पदे (अजा – ४, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – २, खुला – १४) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी VH – १, HH – १ साठी राखीव) (२ पदे माजी सैनिकांसाठी राखीव). पात्रता – ( i) १२ वी उत्तीर्ण, ( ii) स्किल टेस्ट निकष – डिक्टेशन १० मिनिटांसाठी ८० श.प्र.मि., ट्रान्सक्रिप्शन – कॉम्प्युटरवर ५० मिनिटे (इंग्लिश)/६५ मिनिटे (हिंदी).
(७) कॉम्प्युटर ऑपरेटर – २ पदे (खुला). पात्रता – बी.सी.ए./बी.एससी. (कॉम्प्युटर सायन्स/आयटी) किंवा बी.ई./बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/आयटी).
(८) कॅटरिंग सुपरवायझर – ७८ पदे (अजा – १०, अज – ४, इमाव – १३, ईडब्ल्यूएस् – ७, खुला – ४४) (४ पदे दिव्यांग कॅटेगरी OH, HH, VH, इतर साठी प्रत्येकी १ पद राखीव)
(७ पदे माजी सैनिकांसाठी राखीव). पात्रता – हॉटेल मॅनेजमेंटमधील पदवी किंवा कॅटरिंगमधील ट्रेड प्रोफिशियन्सी सर्टिफिकेटसह १० वर्षांची डिफेन्स सर्व्हिस.
(९) ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट (मुख्यालय/रिजनल ऑफिससेससाठी) – २१ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – २, खुला – १३) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी OH – १, HH – १ साठी राखीव).
हेही वाचा : NLC Recruitment 2024 : NLC इंडिया लिमिटेडमध्ये होणार ‘या’ पदांवर मोठी भरती! पाहा माहिती
(१०) ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट (JNV मधील पदे) – ३६० पदे (अजा – ६७, अज – २६, इमाव – ८६, ईडब्ल्यूएस – ३६, खुला – १४५) (१५ पदे दिव्यांग कॅटेगरी OH – ४, VH – ४, HH – ४, इतर – ३ साठी राखीव) (३६ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).
पद क्र. ९ व १० साठी पात्रता – ( i) १२ वी उत्तीर्ण, ( ii) इंग्रजी टायपिंग स्पीड ३० श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग स्पीड – २५ श.प्र.मि. किंवा सेक्रेटरियल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंट या व्होकेशनल विषयासह १२ वी उत्तीर्ण. इष्ट पात्रता – (१) १२ वीला कॉम्प्युटर ऑपरेशन आणि डेटा एन्ट्रीचे ज्ञान मिळविले असावे किंवा ६ महिन्यांचा कॉम्प्युटर्स डिप्लोमा किंवा शालेय स्तरावरील कॉम्प्युटर लिटरसी सर्टिफिकेट, (२) अकाऊंट्स/अॅडमिनिस्ट्रेशन संबंधित कामाचा सरकारी/निमसरकारी/स्वायत्त संस्थांमधील अनुभव.
(११) इलेक्ट्रिशियन कम प्लंबर – १२८ पदे (अजा – २३, अज – ३, इमाव – १५, ईडब्ल्यूएस – १२, खुला – ७५) (६ पदे दिव्यांग कॅटेगरी OH – ३, HH – २, इतर – १ साठी राखीव)
(१२ पदे माजी सैनिकांसाठी राखीव). पात्रता – ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) इलेक्ट्रिशियन/ वायरमन ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट, ( iii) इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन/ वायरिंग/ प्लंबिंग कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(१२) लॅब अटेंडंट – १६१ पदे (अजा – २८, अज – १०, इमाव – ३१, ईडब्ल्यूएस – १६, खुला – ७६) (७ पदे दिव्यांग कॅटेगरी OH – २, VH – १, HH – २, इतर – २ साठी राखीव) (१६ पदे माजी सैनिकांसाठी राखीव). पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि लॅबोरेटरी टेक्निक्समधील डिप्लोमा/ सर्टिफिकेट किंवा १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण.
(१३) मेस हेल्पर – ४४२ पदे (अजा – १०६, अज – ३३, इमाव – ४३, ईडब्ल्यूएस – ४४, खुला – २१६) (१८ पदे दिव्यांग कॅटेगरी OH – ४, VH – ४, HH – ६, इतर – ४ साठी राखीव) (४४ पदे माजी सैनिकांसाठी राखीव). पात्रता – ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) सरकारी निवासी संस्थेच्या मेसमधील/ स्कूल मेसमधील कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव, ( iii) NVS ची स्किल टेस्ट उत्तीर्ण करावी लागेल.
(१४) मल्टि टास्किंग स्टाफ (मुख्यालय/ रिजनल ऑफिसेसकरिता) – १४ पदे (अजा – २, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ११). पात्रता – १० वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा – पद क्र. ०१, ०५, ०८ – ३५ वर्षेपर्यंत; पद क्र. ०२ – ३३ वर्षेपर्यंत; पद क्र. ०३, ०७, १३ ते १४ – ३० वर्षेपर्यंत; पद क्र. ०४ – ३२ वर्षेपर्यंत; पद क्र. ०६, ०९, १० – २७ वर्षेपर्यंत; पद क्र. ११ – ४० वर्षेपर्यंत.
कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; (दिव्यांग – खुला – १० वर्षे, इमाव – १३ वर्षे, अजा/अज – १५ वर्षे).
वेतन श्रेणी – पद क्र. ०१ – पे-लेव्हल – ७ अंदाजे वेतन दरमहा रु. ७८,०००/-; पद क्र. ०२ ते ०५ – पे-लेव्हल – ६ अंदाजे वेतन दरमहा रु. ६२,०००/-; पद क्र. ०६ ते ०८ – पे-लेव्हल – ४ अंदाजे वेतन दरमहा रु. ४४,०००/-; पद क्र. ०९, १०, ११ – पे-लेव्हल – २ अंदाजे वेतन दरमहा रु. ३२,०००/-; पद क्र. १२ ते १४ – पे-लेव्हल – १ अंदाजे वेतन दरमहा रु. ३०,०००/-.
पोस्ट कोड – ०२ ते ०७, ०९ आणि १४ वरील पदे मुख्यालय/ रिजनल ऑफिसेसमधील आहेत.
पोस्ट कोड – ०१,०८, १० ते १३ वरील पदे जवाहर नवोदय विद्यालयमधील आहेत.
निवड पद्धती – पोस्ट कोड ०१ ते ०४, ०७, १२ आणि १४ साठी उमेदवारांची निवड स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेवर आधारित केली जाईल. पोस्ट कोड ०५ साठी उमेदवारांची निवड स्पर्धा परीक्षा आणि इंटरह्यू यातील एकत्रित गुणवत्तेनुसार केली जाईल. पोस्ट कोड ०६, ०८ ते ११ व १३ साठी स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेनुसार आधारित उमेदवार ट्रेड टेस्ट/ स्किल टेस्टसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील. ट्रेड टेस्ट/ स्किल टेस्टमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल.
अर्जाचे शुल्क – फीमेल स्टाफ नर्स – रु. १,०००/- रु. ५००/-, प्रोसेसिंग फी एकूण रु. १,५००/- खुला/ इमाव/ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी. अजा/ अज/ दिव्यांग – फक्त प्रोसेसिंग फी रु. ५००/- भरावी लागेल.
इतर पदांसाठी – खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस – रु. ५००/- अर्जाचे शुल्क रु. ५००/- प्रोसेसिंग फी. एकूण रु. १,०००/-; अजा/ अज/दिव्यांग – रु. ५००/- फक्त प्रोसेसिंग फी भरावी लागेल.
ऑनलाइन अर्ज http://www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक या संकेतस्थळावर केव्हा उपलब्ध करून देण्यात येईल हे उमेदवारांनी वेळोवेळी वेबसाईट फॉलो करून तपासून पहावी.