Kamlesh Kamtekar Graphic Designer Become A Autorickshaw Driver : आपल्यातील अनेक जण विविध क्षेत्रांत नोकऱ्या करतात. पण, कित्येकांना त्यासाठी काही अभ्यासक्रमसुद्धा करावे लागतात. हे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी भरपूर पैसेसुद्धा लागतात. अनेक विद्यार्थी आवडीने अशा अभ्यासक्रमासाठी प्रवेश तर घेतात. पण, नंतर त्यांना नोकरी मिळणे कठीण होऊन जाते. मग कंटाळून त्यांच्यातील बरेच जण दुसरा मार्ग निवडतात किंवा मग स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करतात. आज आपण अशाच एका माणसाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना ग्राफिक डिझायनरचा १४ वर्षांचा अनुभव असूनही स्वतःचा व्यवसाय सुरू करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर गोष्ट अशी की, कमलेश कामतेकर (Kamlesh Kamtekar) हे मुंबईत राहतात. त्यांना १४ वर्षांचा ग्राफिक डिझायनरचा अनुभव आहे. एवढ्या वर्षांचा अनुभव असूनही त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. नवीन नोकरी शोधण्यासाठी त्यांनी अनेकदा संघर्ष केला. कंपनीने खर्चात कपात केल्यामुळे त्यांची नोकरी गमावली आणि असिस्टंट क्रिएटिव्ह मॅनेजर म्हणून या पदासाठी नोकरी शोधण्यासाठी ते पाच महिने विविध कंपन्यांना ‘रेझ्युमे’ पाठवत राहिले. पाच महिने उलटूनही त्यांना नवी नोकरी मिळाली नाही. यादरम्यान त्यांनी अनेक मित्रांशी संपर्क साधला. ‘लिंक्डइन’वरही अनेक पदांसाठी अर्ज केले; पण त्यांचे अर्ज सातत्याने नाकारले जात होते आणि याच आव्हानांबद्दल सांगत त्यांनी लिंक्डइन ॲपवर लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा…Success Story: आई-वडिलांचा हरपला आधार! खचून न जाता सुरू ठेवला UPSC चा प्रवास; वाचा, ‘या’ आयएएस अधिकाऱ्याची गोष्ट

पोस्ट नक्की बघा…

ग्राफिक डिझायनर बनला रिक्षाचालक! (फोटो सौजन्य : linkedin )

आता स्वतःचा बिझनेस करायचा

कमलेश कामतेकर (Kamlesh Kamtekar) यांना अनेक कंपन्या, तुमच्या सध्याच्या भूमिकेसाठी आमच्याकडे बजेट नाही किंवा तुमच्या पदासाठी आमच्याकडे जागा (Vacancy) नाही. तर कोणी विचारायचे की, तुम्ही कमी पगाराच्या बजेटमध्ये काम करू शकता का? या प्रकारचा फीडबॅक पाच महिन्यांपासून त्यांना येत होता. या फीडबॅकनंतर त्यांना वाटले की, दुसरीकडे कुठेतरी काम करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करून, त्याच कमी पगारात पैसे का कमवू नयेत? निदान स्वतःची कमाई असेल. मग मी “भाड में जाये नोकरी अब खुदका बिझनेस करेंगे” (खड्ड्यात गेलं सगळं आता स्वतःचा बिझनेस करायचा) असे ठरवले; पण सध्याच्या क्षेत्रात नाही. म्हणजेच त्यांनी स्वतःच्या डिझायनिंग कौशल्यांचा त्याग करून, ऑटोरिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या नवीन व्यवसायासाठी युजर्सचे आशीर्वाद मागत पोस्ट लिहिली.

सोशल मीडियावर ही पोस्ट @Kamlesh Kamtekar (रिक्षाचालक) यांच्या @linkedin ॲपवरून शेअर करण्यात आली आहे. अनेक linkedin युजर्स संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काही जण या प्रसंगावर दुःख व्यक्त करीत आहेत; तर अनेक जण कमलेश कामतेकर यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamlesh kamtekar a graphic designer from mumbai with 14 years of experience decided to become an autorickshaw driver asp