लाखो विद्यार्थ्यांपैकी काहीच JEE पास होऊन भारतातील प्रतिष्ठित IIT संस्थांमध्ये प्रवेश घेतात. परंतु, काही विद्यार्थी त्यांच्या कष्ट, समर्पण आणि IIT नंतर मिळवलेल्या यशामुळे इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणा बनतात. कंदर्प खंडवाला हा अशाच एका विद्यार्थ्यांपैकी आहे ज्याने केवळ कठोर मेहनत आणि निर्धाराने आपलं असंच नशीब घडवलं.

मुंबईचा रहिवासी असलेल्या कंदर्पने JEE मध्ये १३वा रॅंक मिळवला आणि IIT बॉम्बे मध्ये प्रवेश घेतला. तो एक हुशार विद्यार्थी होता आणि त्याने आपल्या शहरात दहावीची CBSE बोर्ड परीक्षा ९८.६ टक्के गुणांसह उत्तीर्ण केली होती. कंदर्पचा उद्देश २०११ च्या JEE मध्ये टॉप १० विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवण्याचा होता, परंतु त्याने तेरावे स्थान मिळवले.

mumbai university Late Hall Ticket for m a m com and m sc students caused chaos at exam centers
‘आयडॉल’च्या परीक्षा प्रवेशपत्रावरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम, मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, परीक्षा केंद्रांवर संभ्रमाचे वातावरण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mumbai police latest news in marathi
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
sbi education loan Study abroad
परदेशात शिक्षण घ्यायचे; पण पैशांची अडचण येतेय? मग SBI च्या शैक्षणिक कर्जाचा ‘हा’ पर्याय एकदा घ्या जाणून
kartik aaryan got degree after 10 years
Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”
wardha school students attendance biometric
प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवर लगाम!; शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी नसल्यास…
Mahatma Gandhi Laxman Shastri Joshi British Railways
तर्कतीर्थ विचार: महात्मा गांधींच्या सहवासात…

हेही वाचा… शौचालय साफ करून पूर्ण केलं शिक्षण, २० व्या वयातच सुटली नवऱ्याची साथ; वाचा SBI अधिकारी प्रतीक्षा तोंडवळकर यांचा संघर्षमय प्रवास

IIT बॉम्बे येथून पदवी

JEE पास केल्यानंतर, कंदर्पला IIT बॉम्बे मध्ये प्रवेश मिळाला. त्याने कंप्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग मध्ये B.Tech केलं आणि नंतर UC San Diego येथून ह्यूमन-कंप्युटर इंटरॅक्शनमध्ये (Human-Computer Interaction) मास्टर ऑफ सायंस (Master of Science- M.S.) पूर्ण केलं. कंप्युटर सायन्समध्ये त्याची आवड होती आणि जरी त्याचे दोन्ही पालक वैद्यकीय क्षेत्रात असले तरी त्याने JEE च्या तयारीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले.

हेही वाचा… शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा

चॅन झुकरबर्ग उपक्रम

सध्या कंदर्प चॅन झुकरबर्ग उपक्रमाशी संबंधित आहे. हेच ते ठिकाण आहे जिथे त्याने सायन्स आणि इमेजिंगमध्ये सीनियर UX रिसर्चर म्हणून काम केलं. कंदर्पने आपली करिअरची सुरूवात Google मध्ये UX रिसर्चर म्हणून इंटर्न म्हणून केली आणि नंतर MathWorks मध्ये काम केलं. MathWorksमध्ये त्याची भूमिका होती MATLAB साठी यूझर रिसर्च आणि डिझाइन करणे, हे वैज्ञानिक आणि अभियंते वापरत असलेले एक सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे.

कंदर्प खंडवालाची शाळेत उत्तीर्ण होण्यापासून ते अत्याधुनिक संशोधनात करिअर घडवण्यापर्यंतचा हा प्रवास एक उदाहरण आहे, जे दाखवते की आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी ठराविक निर्धार आणि लक्ष केंद्रित करणे किती महत्त्वाचे आहे.

Story img Loader