Karagruh Police Bharti 2023: राज्यातील कारागृह विभागात लवकरच मोठी भरती करण्यात येणार आहे. या विभागात जवळपास दोन हजार पदे रिक्त आहेत. यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत असल्याने ही रिक्त पदे लवकरच भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्यातील कारागृहाचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली. त्यामुळे जे उमेदवार पोलिस विभागात काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी नोकरीची ही मोठी संधी आहे. सध्या राज्य कारगृह विभागात तब्बल ५ हजार कर्मचारी कार्यरत असले तरीही २ हजार पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर येणारा कामाचा ताण पडत असल्यामुळे ही भरती केली जाणार आहे.

कारागृह आणि आरोग्य कर्मचारी भरती –

job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Challenges facing by political parties in Maharashtra state assembly elections 2024
लक्षवेधी लढत : प्रतिष्ठा, अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई
KTCL Goa Bharti 2024 Job Opportunity in KTCL Recruitment
KTCL Goa Bharti 2024 : KTCLमध्ये नोकरीची संधी! कंडक्टरच्या ७० पदांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज
Solapur District Bank Scam, Solapur District Bank,
सोलापूर जिल्हा बँक घोटाळा, निकालाने ऐन प्रचारात खळबळ; दिलीप सोपल, मोहिते पिता-पुत्र, शिंदे बंधू, साळुंखेंच्या अडचणीत वाढ

कारागृह कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांची संख्या नवीन भरती प्रक्रिया मध्ये अधिक ठेवण्यात आली आहे. मागील वर्षभरात विविध आजारांनी १२० कैद्यांचा मृत्यू झाला होता. यावर्षी हे प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी कैद्यांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.

हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी; AWPO मध्ये २५० जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

कारागृह विभागाकडे १२०० संगणकाची मागणी –

गुप्ता म्हणाले, पालघर आणि अहमदनगर येथे नवीन कारागृह बनविण्यात येणार आहेत. शिवाय आणखी २ नवीन कारागृह विभाग बनवण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे. उद्योजक सायरस पूनावला यांनी येरवडा आणि कोल्हापूर येथील कारागृहातील १० हजार कैद्यांना रोज गरम पाणी देण्याचे प्रस्ताव स्वीकारला आहे. तसेच राज्यातील कारागृह विभागाकडे १२०० संगणकाची मागणी आली असून ती लवकर पूर्ण केली जाणार आहे.

हेही पाहा- मुंबईमध्ये सरकारी नोकरीसाठी भरती जाहीर; MIDC अंतर्गत रिक्त पदांसाठी कसा कराल अर्ज

कारागृहात १२ हजार ड्रोन लावले जाणार –

दरम्यान, राज्यातील १२ कारागृहातसुरक्षा मजबूत करण्यासाठी ड्रोन लावण्यात येणार आहेत. राज्यातील कारागृहाच्या आतील परिसर तसेच कारागृह शेती परिसर विस्तीर्ण असून या परिसरातील कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे व सुरक्षा व्यवस्था बळकट राखण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याचं गुप्ता यांनी सांगितलं.