Success Story: लहानपणी आपण अनेक स्वप्न पाहतो, मोठं झाल्यावर काय व्हायचं हेसुद्धा ठरवून मोकळे होतो. पण, जसजसं आपण मोठे होत जातो, त्याप्रमाणे आपल्या स्वप्नांमध्येही बदल होत जातो. यातच प्रत्येक मुलांचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न असते. बऱ्याच लोकांच्या मनात खेळ इतका रुजलेला असतो की, ते पुन्हा शिक्षणाकडे जाण्याचा विचारही करत नाहीत किंवा नोकरी करण्याचाही विचार मनातून काढून टाकतात. पण, काही जण याला अपवाद असतात. तर आज आपण एका खास व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी क्रिकेटपटू ते महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी असा अनोखा प्रवास केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी यांचे नाव कार्तिक मधिरा असे आहे. कार्तिक मधिरा यांना भारतीय टीमचे स्टार क्रिकेटर बनायचे होते. पण, नंतर त्यांनी यूपीएससीचा अभ्यास करून भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) अधिकारी म्हणून रुजू झाले. हैदराबादमध्ये जन्मलेले कार्तिक मधिरा अंडर-१३, अंडर-१५, अंडर-१७, अंडर-१९ आणि विद्यापीठस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळले होते. प्रवास अगदीच उत्तम सुरू होता, पण तितक्यात एक वेगळं वळण त्यांच्या आयुष्याला आलं. काही वैयक्तिक कारणे आणि दुखापतीमुळे त्यांना क्रिकेटमधून शैक्षणिक क्षेत्रात जाण्याचा निर्णय घ्यावा लागला.

हेही वाचा…Success Story: एकेकाळी नव्हतं राहायला घर; दगड फोडण्याचंही केलं काम; पाहा IAS अधिकार राम यांचा प्रेरणादायी प्रवास

भारतीय पोलिस सेवेत रुजू होण्यापूर्वी कार्तिक मधिरा यांनी जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (JNTU) मधून संगणक विज्ञान इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली. नंतर त्यांनी सहा महिने नोकरी केली, पण त्यानंतर त्यांना नागरी सेवांबद्दलची आवड लक्षात आली. मग त्यांनी अभ्यास करण्यास सुरुवात केली. पहिल्या तीन यूपीएससी प्रयत्नांमध्ये ते अपयशी ठरले, पण त्यांनी हार मानली नाही आणि यूपीएससी २०१९ च्या परीक्षेत चौथ्या प्रयत्नात कार्तिक मधिरा यांनी ऑल इंडिया रँक (AIR) 103 मिळवले व नंतर आयपीएस बनले. परंतु, खेळावरील त्यांचे प्रेम कधीही कमी झाले नाही. त्यांना सध्या महाराष्ट्र कॅडरमध्ये नियुक्त करण्यात आले आहे आणि ते लोणावळ्यात एएसपी म्हणून कार्यरत आहेत. तुम्ही आतापर्यंत आयएएस, आयपीएस अधिकारी यांच्या प्रेरणादायी कथा ऐकल्या असतील. पण, ही गोष्ट थोडी वेगळी आहे, कारण त्यांनी क्रिक्रेटपटू ते आयपीएस अधिकारी असा आगळावेगळा प्रवास केला आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karthik madhira man who quit cricket due to injury but then went on to work in the indian police service ips must read inspiring journey asp