Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023: कल्याण डोंबिवली महानगरपालिके (KDMC) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला आणि पुरुष) पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहू शकतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, मुलाखतीची तारीख आणि मुलाखतीचा पत्ता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२३

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला आणि पुरुष)

एकूण पद संख्या – १३५

शैक्षणिक पात्रता – MBBS, १२ वी पास + GNM कोर्स. शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.

नोकरीचे ठिकाण – कल्याण</strong>

हेही वाचा- बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै.शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे</p>

मुलाखतीची तारीख – ३ नोव्हेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – kdmc.gov.in

पगार –

  • वैद्यकीय अधिकारी – ६० हजार
  • स्टाफ नर्स – २० हजार

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी या (https://drive.google.com/file/d/1jAinqslQBsdHXWBK1c_jGL6DiamKhlx0/view) लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc recruitment 2023 kalyan dombivli municipal corporation recruitment for the posts of medical officer staff nurse jap