Best Acting Schools In India : फिल्म इंडस्ट्रीत एंट्री करायची असेल किंवा अन्य कोणत्या माध्यमातून अभिनयाचे कौशल्य दाखवयाचे असेल, तर पहिल्यांदा याचं शिक्षण घ्या. भारतात अनेक अॅक्टिंग स्कूल आहे, जिथे तुम्ही अभिनय क्षेत्राशी संबंधीत शिक्षण घेऊ शकता. प्रत्येक शाळेत पात्रता निकष, शुल्क, कोर्ससाठी उपलब्ध जागा, कोर्स ड्युरेशन वेगवेगळं असतं. अशाप्रकारच्या काही टॉप इन्स्टिट्यूटबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. या इन्स्टिट्यूटमध्ये प्रेवश घेण्याआधी तुमच्यात अभिनय करण्याची कला असणे अत्यंत आवश्यक आहे. फिल्म इंडस्ट्रितील स्टारडम पाहून प्रवेश घेणे चुकीचे ठरू शकते.
फिल्म अॅंड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे
या इन्स्टिट्यूटला FTII या नावाने ओळखलं जातं. या इन्स्टिट्यूटची स्थापना १९७१ मध्ये झाली आहे. हे इन्स्टिट्यूट याआधी दिल्लीत होतं. इथे एकून ११२ सीट्स आहेत. उमेदवार या जागांसाठी अप्लाय करु शकतात. इथे अॅक्टिंगपासून, डायरेक्शनपर्यंत अनेक गोष्टी शिकवल्या जातात. कोर्सची फी एक लाखापासून दीड लाखापर्यंत आहे. तसंच कोर्सचं ड्युरेशन दोन ते तीन वर्षांपर्यंत आहे. हा कोर्स अनेक सेमिस्टरने विभागला गेला आहे. कोर्सनुसार वेगवेगळं शिक्षण देण्यात येतं. येथील एल्युमिनाईमध्ये ओम पुरी,डॅनी,जया बच्चन, मुकेश खन्ना, स्मिता पाटील, प्रकाश झा, जॉन अब्राहम, नसीरुद्दीन शाह यांचा समावेश आहे.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली
या इन्स्टिट्यूटला NSD दिल्ली असं म्हणतात. ही संस्था मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येते. इथे ट्रेंनिंगच्यावेळी विद्यार्थ्यांना अभिनय करावं लागतं. त्यांनी केलेली नाटकं नंतर लोकांपर्यंत पोहोचवली जातात. डिप्लोमा इन ड्रामॅटिक आर्ट्सचा कोर्स इथे करु शकता. यामध्ये वर्ल्ड ड्रामा, थिएटर म्यूजिक, योग, क्लासिकल इंडियन ड्रामा, अशा क्षेत्रात स्पेशलायजेशन करु शकता. येथील एल्युमिनाईमध्ये आशुतोष राणा,पीयूश मिश्रा, पंकज त्रिपाठी, राजपाल यादव, इरफान खान, नीना गुप्ता यांचा समावेश आहे.
सत्यजीत रे फिल्म अॅंड टेलीव्हिजन, कोलकाता
या इन्स्टिट्यूटला SRFTI नावाने ओळखलं जातं. इथे सिनेमॅटोग्राफीपासून, स्क्रीनप्ले, एडिटिंग, एनिमेशन सिनेमा, प्रोडक्शन, अशाप्रकारचे कोर्स करु शकता. या इन्स्टिट्यूटमध्ये मर्यादीत सीट्स आहेत आणि कोर्सचा कालावधी दोन ते तीन वर्षांचा आहे. येथील एल्युमिनाईमध्ये विपिन विजय,नम्रता राव, कनु भेल यांचा समावेश आहे. इथे प्रवेश घेण्यासाठी पूर्ण परीक्षा द्यावी लागते. याबाबतची माहिती दरवर्षी लीडिंग न्यूजपेपरमध्ये प्रकाशित केली जाते. याशिवाय या इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर जाऊनही अधिक माहिती मिळवू शकता. कोर्सची फी, कोर्सचं ड्युरेशन, सीट्स याबाबत अधिकृत माहिती वेबसाईटवर मिळू शकते.