Indian Army Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आता सुवर्ण संधी आहे. तरुणांसाठी इंडियन आर्मीमध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्हाला सैन्यदलात सामील व्हायचं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. इंडियन आर्मीकडून अनेक पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून रिक्त पदांसाठी एनसीसी कॅडेट्सची नियुक्ती करण्यात येईल. भारतीय सैन्य दलात शॉर्ट सर्व्हिस कमीशन भरतीसाठी अविवाहीत पुरुष आणि महिला उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत.
भरतीबाबत ऑफिशियल नोटिफिकेशन जारी केलं आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट joinindianarmy.nic.in वर अप्लाय करु शकतात. अॅप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी १५ फेब्रुवारी शेवटची तारीख आहे. या भरती अभियानाच्या माध्यमातून एकूण ५५ पदांना भरण्यात येईल. यामध्ये एनसीसीच्या मेल कॅंडिडेट्सची ५० पदांसाठी आणि फिमेल कॅंडिडेटसाठी ५ पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज भरणाऱ्या कॅंडिडेट्सची वयोमर्यादा १ जुलै २०२३ नुसार कमीत कमी 19 वर्षे आणि जास्तीत जास्त (अधिकतम) २५ वर्षांच्या आत असली पाहिजे.
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता
१. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या कॅंडिडेट्सकडे मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा महाविद्यालयीन पदवी असली पाहिजे. यामध्ये सर्व वर्षांच्या नंबर्सनुसार कमीत कमी ५० टक्के असणे आवश्यक आहे.
२. डिग्री कोर्समध्ये अंतिम वर्षात असणारे विद्यार्थीही अर्ज करु शकतात. पण यासाठी एक अट आहे. त्यांच्या डिग्री प्रोग्रामचे पहिले, दुसरे, तिसरे किंवा चौथ्या वर्षात कमीत कमी ५० टक्के टोटल ग्रेड प्वाइंटची सरासरी असली पाहिजे.
३. एनसीसीचे सीनियर डिवीजन/विंगमध्ये कमीत कमी दोन किंवा तीन वर्ष (ज्या पद्धतीने लागू असेल) काम केलेलं पाहिजे.
असं करा अप्लाय
सर्वात आधी आर्मीची ऑफिशियल वेबसाईट joinindianarmy.nic.in वर क्लिक करा.
त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन करुन घ्या आणि अर्ज भरा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
त्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि भविष्यासाठी प्रिंट आऊट काढून घ्या.