सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी आता एक सुवर्ण संधी आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागात निघालेल्या सरकारी नोकरीच्या भरतीची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. इंडियन नेवीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर नेवल अपार्टमेंट डिपोनुसार ट्रेड्समॅन स्कील्डचे २४८ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी सुरुवातीच्या तारखेपासून २८ व्या दिवसांपर्यंत किंवा त्याआधी नोंदणी करु शकतात. यासाठी उमेदवाराला २०५ रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे.
CAPF Recruitment 2023 Notification : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सीएपीएएफ मेडिकल अधिकारी भरती २०२३ साठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. त्यांच्या वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवार नोटिफिकेशन तपासू शकतात. सीएपीएफची अधिकृत वेबसाईट म्हणजेच capf.gov.in वर ऑनलाईन अर्ज भरू शकता. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (बीएसएफ, सीआरपीएफ, आईटीबीपी, एसएसबी) आणि असम रायफल्स, गृह मंत्रालयात मेडिकल ऑफिसर,सुपर स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर, स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसरच्या पदांसाठी सीएपीएफ भरती २०२३ नुसार २९७ वॅकेन्सी जारी करण्यात आल्या आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु होईल. अर्ज फक्त ऑनलाईन माध्यमातूनच स्विकारले जातील. सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती २०२३ साठी अर्ज करण्याची तारीख १६ मार्च २०२३ आहे.
SGPGIMS Sarkari Naukari : संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SGPGIMS),लखनऊने स्टाफ नर्सच्या पदासाठी SGPGIMS भरती २०२३ ची घोषणा केली आहे. उमेदवार SGPGIMS च्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच Cdn.tcsion.com वर ऑनलाईन अर्ज करु शकतात. SGPGIMS लखनऊ भरती २०२३ नुसार 1974 स्टाफ नर्सच्या पदांना भरायचं आहे. अर्ज करण्याच प्रक्रिया १० फेब्रुवारी २०२३ पासून सुरु झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख १ मार्च २०२३ आहे. कंप्यूटर बेस्ड टेस्ट २२ मार्चला आयोजित करण्यात येणार आहे.
RRB Recruitment 2023 : रेल्वे मंत्रालयाने देशभरात ग्रुप डी आणि ग्रुप सी च्या पदांसाठी 298973 जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत खासदार प्रमोद तिवारी यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना दिलीय.